ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आध्यात्मिक शिकवण विचार, उच्चार आणि आचार यांमध्ये उतरवल्यानेच विवेक आणि ज्ञान प्राप्त होते. निव्वळ पुस्तकी ज्ञान निरर्थक आहे. "
प्रकरण पाच
प्रेम साई अवतार
प्रेम साई अवतारामध्ये केवळ प्रेमा आणि राजाच नव्हे, तर माझ्या कुटुंबातील ज्यांनी वियोगाचे दुःख अनुभवले आहे ते सर्व आपल्या कुटुंबियांबरोबर आनंदाने एकत्र राहतील. निरंतर भगवद्भावात राहिल्यामुळे तसेच स्वामींशी आणि माझ्याशी असलेल्या सामीप्यामुळे ते पुढील जन्मात आमचे निकटवर्तीय असतील. कुटुंबातील कोणीही देहधारी परमेश्वराच्या सहवासाचा परमानंद पूर्णपणे लुटला नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा येत आहोत. प्रेम साई अवतारात आम्ही प्रत्यक्ष परमेश्वरासोबत राहत आहोत हे आहाला माहीत असेल. माझे आजी आजोबा, आई वडील, काका, मामा आणि त्यांचे कुटुंब स्वामींबरोबर राहण्यासाठी पुन्हा येतील व तेव्हा कोणाचाही वियोग होणार नाही. हे प्रतिबिंब, प्रतिक्रिया आणि प्रतिध्वनी तत्व आहे. पुढील अवतारात जन्म घेणाऱ्या माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या उदाहरणाद्वारे स्वामींनी हे तत्व दर्शवले आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम