ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
मोती अकरावा
निर्मितीचे कारण
जर विवाह कामावर आधारित असेल तर संतती मायेच्या बंधनात जन्म घेते व त्या जीवाला पुन्हा पुन्हा जन्म मृत्युच्या चक्रात ढकलले जाते. मानव खालच्या पातळीवर येतो. तथापि, जर आपण प्रथम कामाचे शुद्धीकरण केले आणि नंतर विवाह केला तर दिव्य संतती जन्मास येते. ही नवनिर्मिती आहे. हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी स्वामी आणि मी आलो आहोत. आम्ही आमच्या भावांद्वारे कामदहन करत आहोत.
कामदहन कसे करावे ? विवाहपूर्व काळात मनुष्याने आपली इंद्रिये व मन स्वैरपणे भटकू देऊ नये. तरुण स्त्री आणि पुरुषांनी आत्मसंयम राखावा. त्यांनी भारतीय संस्कृतीचे पालन करावे. ब्रम्हचार्याचे पालन करावे. हेच कामदहन आहे. अशा पद्धतीने जीवन जगून त्यांनतर गृहस्थाश्रमात पाऊल टाकावे, विवाह करावा म्हणजे ज्ञान संतती जन्मास येईल.
कलियुगात अज्ञानामधून संतती जन्मास येते याउलट सत्ययुगात ज्ञानामधून संतती जन्मास येते.
जर आपली वर्तणूक योग्य नसेल तर आपल्या मुलांमध्ये नैतिक मूल्यांचा अभाव असेल. आपल्या भावांचे प्रतिबिंब, प्रतिक्रिया आणि प्रतिध्वनी आपल्याकडे परत येतात. त्यापासून आपली सुटका होत नाही. जेव्हा आपली वर्तवणूक आणि भाव शुद्ध नसतात तेव्हा त्याचा परिणाम मुलांवर होऊन त्यांच्यामध्ये पशुवृत्ती दिसून येते.
जर आपण आपली पंचेंद्रिये ईश्वराभिमुख करून जीवन व्यतीत केलेत. केवळ परमेश्वरप्राप्ती हेच जीवनाचे ध्येय ठरवून ध्येयप्राप्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत तर सत्ययुग जन्मास येईल.
संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' The Establishment Of Prema ह्या पुस्तकातून
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा