ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जर आपण मनाची परमेश्वराशी गाठ बांधली तर ते नियंत्रणात येईल आणि फलस्वरूप विश्वातील कोणतीही गोष्ट आपल्याला स्पर्श करणार नाही."
सूत्र दुसरे
अनुभूती
वसंता - मी प्रेमसूत्र लिहिते आहे. प्लीज, मला तुम्ही अनुभवाबद्दल काही सांगा ना.
स्वामी - अनुभवांची अनुभूती घ्यायलाच हवी. अनुभवाशिवाय पुर्णम् अपूर्ण आहे. तुला वाटतं की मी तुझा अनुभव घ्यायला हवा. म्हणून मी दुसरा अवतार घेणार आहे. आता तू जे काही अनुभवते आहेस , ते मी पुढील अवतारात अनुभवेन. तू म्हणतेस की मी तुझ्यासाठी काहीही केले नाही. परंतु भविष्यात होणाऱ्या अवताराबद्दल कोण लिहू शकेल ? मी तुला सांगतो आणि तू लिहितोस. 'प्रेमा' चा फोटो कसा आला ? हे सर्व तुझ्या अपरिमित प्रेमामुळेच घडले आहे. महान ऋषिमुनींनी नाडीग्रंथ लिहिले असतील परंतु त्यांनी 'प्रेमा' चा फोटो दिला का ? तू कोण आहेस हे त्यांनी दर्शविले नाही का ? तू अवतारकार्यासाठी आली आहेस. तथापि तुला ह्याची जाणीव नसल्यामुळे तू एखाद्या बालकासारखी रडतेस.
वसंता - स्वामी, मग मी काय करू ? स्वामी सगळं माहीत आहे, तरी मला हे असह्य होतंय. मला तुम्ही हवे आहात.
स्वामी- जोपर्यंत आपण एकत्र राहत नाही तोपर्यंत तुझ्या प्रेमाला समाधान मिळणार नाही. प्रेमाला अनुभवण्याची गरज असते. अनुभवानेच ते तृप्त होते. अनुभव घेण्यासाठी नातेसंबंध आणि नात्यांचा अधिकार असणे अत्यावश्यक आहे.
वसंता - स्वामी,आता मला समजले.
ध्यान समाप्त
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा