ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
सुविचार
" सत्य मनाला निर्मल बनवते. सत्य वचन ही अंतर्शुद्धी आहे.
सूत्र दुसरे
अनुभूती
' पुन्हा गीत गोविंदम ' या पुस्तकामध्ये मी लिहिले आहे-मला तुमच्या ब्रशवरची पेस्ट होऊ दे.
मला तुमच्या स्नानाचे जल होऊ दे.
मला तुमच्या देहावर लावायची चंदनाची उटी होऊ दे.
मला तुमच्या केसांचे तेल होऊ दे.
मला तुमचे कपाळ विभूषित करणारे विभूती कुमकुम होऊ दे.
मला तुमच्या डोळ्यातील दृष्टी होऊ दे, तुमच्या हृदयातील प्रेम होऊ दे.
मला तुमच्या आत्म्याचा आत्मा होऊ दे.
मला सूर्यापासून तुमचे रक्षण करणारी छाया होऊ दे.
मला पावसापासून तुमचे रक्षण करणारा तुमचा आसरा होऊ दे.
मला थंडीतील उब होऊ दे. तुमच्या पायातील वहाण होऊ दे.
दिवसरात्र मी तुमच्या अवतीभवतीच असू दे.
प्रत्येक क्षण तुम्हाला निरखेन, तुमची सेवा करेन, तुमच्या गरजा ओळखेन.
आणि तुमच्या चरणांशी माझे प्रेम पूर्णपणे समर्पित करेन.
तुमच्यासाठी विविध रुचकर पदार्थ बनवेन.
तुमच्या आवडीचे पदार्थ करून तुम्हाला वाढेन.
माझ्या मुखातून तुम्हाला हवे असलेले शब्दच उच्चारले जातील.
हे परमेश्वरा,
छोट्या छोट्या गोष्टींमधून तू माझ्या प्रेमाची व पावित्र्याची अनुभूती घ्यायला हवीस.
आगामी युगात येणारा अवतार व त्याची पत्नी त्यांचे हे दिव्य प्रेम आहे. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. देहाद्वारे केलेल्या प्रत्येक कृतीमधून प्रेम अनुभवले जाईल. केवळ त्यानंतरच प्रेमाची पूर्ण तृप्ती होईल. आगामी युगात केवळ अनुभव घेण्यासाठी मी व स्वामी परत अवतरणार आहोत.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा