ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपल्या मार्गात अनेक अडथळे आले तरी आपण आपला धर्म (स्वधर्म), सदाचरण याच्याशी निष्ठवंत राहिले पाहिजे."
भाग - नववा
आत्मगीते
थकले मी आता, निसटला पुन्हा तो माझ्या हातून
संघर्ष माझा पाहून, सागराने बांधिल्या त्याच्या हस्त लहरी
झाले सारे शांत, स्तब्ध
त्या नितळ पाण्यात शोध घेता घेता
अवचित पाहिले मी माझेच प्रतिबिंब
कोण आहे ती ? ती मी आहे ?
नाही ! नाही !
कोठे गेले माझे काळेभोर कुरळे केस ?
रंग कोणी फसला त्यावर सफेद ?
दृष्टी वळविता मी आकाशात
दर्शवित होते कालचक्र, सन दोन हजार आठ
स्मरण झाले मज
किनाऱ्यावर आले मी त्यावेळी होते सन एकोणीसशे एकसष्ट
पाहता पाहता सरली वर्षे सत्तेचाळीस
पुन्हा दृष्टीस पडला माझ्या तो नीलकृष्ण मासा
समीप आला तो, माझ्या समोर
ओंजळीत घेतले मी त्यास
परि पुन्हा निसटला तो माझ्या पकडीतून
प्रतीक्षा ! अजून किती प्रतीक्षा ?
*
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा