ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
जन्मदिन संदेश
वसंतामृतवाणी
आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या तत्वांचे अनुसरण करावे ह्या विषयी भगवान श्री सत्यसाई बाबांनी त्यांच्या संदेह निवारिणी ह्या पुस्तकामध्ये थोडक्यात दिले आहे.
मनुष्याने जीवनामध्ये अनुसरण करावीत अशी काही महत्त्वाची तत्त्व मी खाली देत आहे.
१. प्रेम हा जीवनाचा श्वास आहे असा विश्वास बाळगा.
२. प्रेम हाच परमात्मा आहे जो सर्व गोष्टींकडे समत्वाने पाहतो.
३. प्रत्येकामध्ये तो एकच परमात्मा प्रेमरूपामध्ये विद्यमान आहे.
४. ज्यांना परमानंद प्राप्त करण्याची इच्छा आहे त्यांनी इंद्रियसुखांचा पाठपुरावा करू नये.
५. जीवनदायी श्वासासारखे सत्याचे अनुसरण करावे. जसे मृत शरीर काही तासातच कुजते व शरीराला दुर्गंध सुटते तसे सत्याविना जीवन हे जीवनासाठी अयोग्य असेल व दुर्गंधीने भरलेले असेल.
६. सत्याहून अधिक श्रेष्ठ असे काहीही नाही . सत्याहून अधिक मूल्यवान असे काहीही नाही. सत्याहून अधिक मधुर असे काहीही नाही. सत्य शाश्वत आहे.
७. सत्य हाच परमेश्वर, जो तुमचे सर्वांपासून संरक्षण करतो. सत्याहून अधिक श्रेष्ठ असा कोणीही रक्षणकर्ता नाही. सत्यस्वरूप परमेश्वर सत्यवाक आणि प्रेमाने ओथंबलेले हृदय असणाऱ्यांना त्याचा धर्म प्रदान करतो.
८. सर्व जीवांना प्रेम आणि करुणा द्या. निःस्वार्थ जीवन जगा.
९. प्रत्येकाने इंद्रिय नियंत्रण करणे सद्गुणांची जोपासना करणे आणि अनासक्त वृत्ती अंगी बाणवणे आवश्यक आहे.
१०. करू नयेत अशा ४ गोष्टी - परनिंदा करणे इतरांमधील चुका अथवा दोष दर्शवणे, एखाद्याच्या अनुपस्थितीत त्याची निंदा करणे. वायफट बडबड करणे.
११. देहाद्वारे केलेली ५ पातके - हत्या, चोरी, लबाडी, अमली पदार्थांचे व्यसन मांसाहार ज्यांना उदात्त जीवन जगायचे आहे त्यांनी ह्या सर्व गोष्टी टाळल्या पाहिजेत.
१२. ८ प्रकारची मानसिक पातके - काम (इच्छा), क्रोध, लोभ , मोह, मद , मत्सर , सुरवासीनता आणि द्वेष . इतरांचा उत्कर्ष पाहून त्यांचा मत्सर करू नका व इतरांना त्रास देऊ नका.
१३. इतरांच्या आनंदात आपण आनंद मानला पाहिजे.
१४. रंजल्या गांजल्यांविषयी मनामध्ये करुणा बाळगा व त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांना मदत करा. असे केल्याने भगवानांप्रती प्रेम वृद्धींगत होते.
१५. केवळ सबूरी मनुष्याला आवश्यक तेवढी शक्ती प्रदान करते.
१६. ज्यांना आनंदी राहण्याची इच्छा आहे त्यांनी नेहमी सत्कर्म केली पाहिजेत.
१७. मनुष्याने प्रेमाने क्रोधावर, विवेकाने आसक्तीवर, सत्याने असत्यावर, मंगलाने अमंगलावर आणि दानाने लोभावर विजय मिळवला पाहिजे.
१८. दुर्जनांच्या अपशब्दांना प्रतिउत्तर देऊ नका. त्यांच्यापासून दूर राहा. त्यांच्याशी संपर्क ठेवू नका. हे तुमच्यासाठी हितकारक आहे.
१९. तुमच्या अहंकाराचा त्याग करा. नेहमी सत् संगतीत राहा.
२०. जो मनुष्य काही राष्ट्रांना आपल्या अधिपत्यांखाली ठेवतो त्याची राजा म्हणून प्रशंसा केली जाते तथापि जो आपल्या इंद्रियांना नियंत्रणाखाली ठेवतो त्याची विश्वेश्वर म्हणून प्रशंसा केली जाते.
२१. मनुष्याने केलेल्या चांगल्या वाईट कर्मांचे परिणाम त्याच्यापर्यंत निश्चित पणे पोहोचतात. त्यामध्ये काहीही बदल होऊ शकत नाही.
२२. मनामध्ये कुविचार येता क्षणीच त्याचा समूळ नाश करा अन्यथा तुमचे जीवन नरक बनून जाईल.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा