सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

कृष्ण जन्माष्टमी संदेश


स्वामींनी २००३ मध्ये कृष्णजन्माष्टमीला दिलेला संदेश 
कृष्णाचा जन्म बंदीगृहामध्ये झाला. कंसाच्या हुकुमानुसार बंदिगृहाच्या सर्व रक्षकांना अत्यंत दक्ष राहण्याच्या सूचना  दिल्या गेल्या असूनही त्यांना निद्रेने घेरले. कृष्णाच्या जन्मवेळी फक्त वसुदेव आणि देवकी जागृत होते. दृष्ट कंसाकडून नवजात बालकास असणाऱ्या धोक्याच्या भीतीने वसुदेवाने बालकास सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे ठरवले. त्याने हळुवारपणे बालकास कपड्यांमध्ये गुंडाळले आणि एका टोपलीमध्ये ठेवून, ती टोपली डोक्यावर धरून तो बंदीगृहाच्या बाहेर आला. बंदीवासाचे सर्व दरवाजे आपोआप उघडले. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. वसुदेवाने बालकाच्या रक्षणासाठी प्रार्थना केली. कृष्णाच्या दैवी संकल्पाने एक विशाल सर्प तेथे प्रकट झाला व वासुदेवाच्या मागोमाग जाऊन, मुसळधार पावसापासून बालकाचे रक्षण करण्यासाठी त्याच्या मस्तकावर आपला फणा धरला. वसुदेव, यमुनेच्या पलीकडच्या तीरावर असलेल्या यशोदेच्या घरी पोहोचला. तिने नुकताच एका बालीकेला जन्म दिला होता. तिच्या पतीसह सर्वजण गाढ निद्रेत होते. वसुदेवाने हळुच दिव्य बालकास, कृष्णास यशोदेच्या बाजूला ठेवले आणि तिच्या नवजात बालिकेस उचलून तो त्वरेने बंदीगृहात परतला.
 
*    *    *

परमेश्वराचे मार्ग कोणीही जाणू शकत नाही. वसुदेवालाही, तो काय करतोय ह्याचे पूर्ण आकलन नव्हते. त्याने कृष्णाला यशोदेच्या घरी नेले व बालीकेस त्याच्या बरोबर घेऊन आला. त्याने हे कार्य जणु काही तंद्रीत केल्यासारखे केले. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या Beyond the Upanishadas ह्या पुस्तकातून. 


जय साईराम    

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

    " आपल्या भक्तिची गुणवत्ता म्हणजे आपल्या मनोदशेचे थेट प्रतिबिंबच होय." 

३ 

मन आणि विषय 

          मानाच कार्य कस चालत ? आपण एक उदाहरण पाहूया. काल मी जेव्हा ' मन आणि विषय ' याविषयी बोलत होते, मी कान्हांना म्हटले, ' माझ्यासाठी एका शब्दाचा उच्चार करा. ' शब्द होता ' ट्रान्सेन्डेंटल ' त्यांनी तो शब्द उच्चारला आणि मी म्हटले, " काय म्हणालात ... डेंटल ... डेंटल ?" मी 'डेंटल' म्हटल्याबरोबर निर्मलानी त्यांचा दात दाखवून म्हटले, " काल माझा दात दुखत होता. " मग सर्वजण आपआपल्या दातांविषयी बोलायला लागले. कान्हा म्हणाले, " डॉ लंबोदरन हे आपले डेंटिस्ट आहेत. " मी म्हणाले, " त्यांचे वडीलही डेंटिस्ट आहेत."
          याप्रमाणे, डेंटिस्ट आणि दात यावर जणूकाही न संपणार संभाषण सुरु झाले. एका शब्दापासून आमच्या सर्वांच्या मनानी अनेक विचार निर्माण केले. त्यांना आपली दातदुखी आठवली. 'मी कोणत्या डॉक्टरकडे गेले होते, मी काय औषध घेतले, कोणत्या दिवशी ही घटना घडली, कोणत्या वर्षी '. सर्वांनी त्यांच्या जीवनात घडलेल्या अनेक गोष्टींना उजाळा द्यायला सुरुवात केली.        

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

   " दिखाऊ कर्मकांडापेक्षा अंतर्भक्ती अधिक परिणामकारक आहे. " 
३ 

मन आणि विषय 

          सर्वजण म्हणतात ' मी आणि माझे.' 'मी ' हे मानाच मूळ आणि ' माझे ' हे विषयाच मूळ आहे. माणूस म्हणतो, ' माझा नवरा, माझी बायको, माझी संपत्ती, माझा व्यवसाय, माझे गाडी, माझे शहर.' अशारितीने तो 'माझे ' ची लांबच लांब साखळी निर्माण करतो. हे ' माझे ' अनेक 'विषय' जवळ बाळगते. म्हणून मन सतत त्याचा पाठपुरवा करण्यासाठी धावत असत. हे कधी संपेल का ? मनाला जे दिसत ते हव असत. इच्छांचा 'मी' बनतो. इच्छांचे विचार होतात. मन या अनेक विचारांचे गाठोडेच आहे. 
           हे मन म्हणजे 'मी' ; 'मी' देह दर्शवतो. मन सतत त्याला दिसणाऱ्या वस्तू आणि लोकांच्या मागे धावत असत. जन्मोजन्मी ते धावतच राहत. हा न संपणारा प्रवास आहे.
 
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प - ४४ 

परमेश्वर आपल्या शोधात येतो 

          १२ एप्रिल २०११ रोजी स्वामींनी एक कागद दिला त्यावर प्रेमसाई आणि अम्मा ह्यांच्यामधील संवाद लिहिलेला होता. १३ एप्रिल २०११ च्या ध्यानात अम्मांनी स्वामींनी विचारले. 
वसंता - स्वामी, तुम्ही पुन्हा प्रेमसाई आणि अम्मा ह्यांच्यामधील संवाद दिलात. आपण पूर्वीच ह्याविषयी लिहिले आहे. मग पुन्हा का दिला ?
स्वामी - कसा तुझा प्रत्येक भाव रूप धारण करतो हे ह्यातून दर्शवले जाते. लहानपणापासून तू नेहमी ' तोडा आणि जोडा ' ही साधना करतेस. तू एखादे टेबल, खुर्ची वा स्तंभ पाहिलास तू त्या वस्तू परमेश्वरशी जोडतेस. अशा तऱ्हेने सर्व परमेश्वर होऊन जातो. तू सर्वांना परमेश्वर बनवतेस. जर तुझा एखाद्या दगडावर पाय पडला तर तो दगडही तुझ्यासाठी परमेश्वर असतो. सर्व वस्तू परमेश्वर आहेत. जे तू खातेस तो भगवंत, खाण्याची क्रियाही भगवंत, जे तू पितेस तो ही भगवंतच. वाळूचा प्रत्येक कण, प्रत्येक दगडही भगवंत तू सर्व भगवंतमयम् बनवतेस. हे सर्व भक्त विजयम मधील भक्तांच्या कथांसारखे आहे. सखुबाई सारखे तू म्हणतेस, परमेश्वर स्वतः तुझा पती बनून आला पाहिजे. गोरा कुंभार आणि रामदास ह्यांच्याकडे जसा परमेश्वर दास बनून आला हे ही त्यासारखेच आहे. सर्व नात्यांमध्ये तुला परमेश्वराला पाहायचे आहे, तो सर्व रूपांमध्ये येतो. मी पुढील अवतारात तुझ्याबरोबर येईन आणि अखंड विनवियोग ४० वर्षे तुझ्याबरोबर राहिन. तुझ्या सर्व इच्छा मी पुऱ्या करेन. आपण एकत्रच लहानाचे मोठे होऊ, एकत्र खेळू, पिऊ, झोपू, सर्व इच्छांची परिपूर्ती होईल. उर्वरीत ३० वर्षे अवतार कार्यासाठी असतील. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' Who is in Swami's heart ' ह्या पुस्तकातून. 

जय साईराम         

रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " जर आपण रात्रंदिवस आपले भाव परमेश्वराला अर्पण केले तर ते २४ तास परमेश्वराच्या पूजेसमान ठरेल.  
३ 
मन आणि विषय 

           मनाचे काय ? मन म्हणजे विचारांचे गाठोडे. विचारांचे मूळ कुठे आहे ? ते कुठून येतात ? याची जर मीमांसा केली तर असा निष्कर्ष निघेल की  'मी ' हेच मनाचे मूळ आहे. हा ' मी ' कोण ? ' मी ' हा नाव आणि रूप दर्शवतो. नाव आणि रूप म्हणजे काय ? त्याचा अर्थ ' देह . आजही माणूस ' मी देही आहे ' असे म्हणत देह आणि रुपाला पुष्टी देत आहे. 
          आपण मनाचे मूळ शोधले, तसेच आता ' विषय ' बघू या. ' विषय ' म्हणजे काय ? विषयाच मूळ काय ? त्याचा उगम कुठे होतो ? आपण चिंतन करू या. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
      " अनंत अवकाशाला कोण मर्यादा घालणार? अमर्याद महासागराला कोण बंधन घालणार ? त्याचप्रमाणे सर्वव्यापी प्रेमाला कोणत्याही मर्यादा व बंधने नाहीत."
मन आणि विषय 

तारीख ५ डिसेंबर २००८

          मी स्वामींचे पुस्तक, ' मनोनिग्रह करा आणि मनोविजयी व्हा.' हे पुस्तक उघडले आणि ९ व्या पानावरील खालील ओळी वाचल्या. स्वामी म्हणतात, 

          "Even the highly educated do not make any effort to understand this. If you ask them 'What is mind?' they say, ' It does not matter.' 

If you ask,
'What is matter?' they say, ' Never mind.'
मी यावर चिंतन केले ... 
मन म्हणजे काय ?
विषय म्हणजे काय?
मन हृदयापासून वेगळे कसे ?
         शरीराच्या डाव्या बाजूस भौतिक हृदय असते. उजव्या बाजूस आध्यात्मिक हृदय असते. इथे परमेश्वर तांदळाच्या दाण्याच्या अग्रावर राहील इतका सूक्ष्म निळ्या प्रकाशरूपात वास करतो. शरीराचे व्यवहार नीट चालण्यासाठी भौतिक हृदय सहाय्यभूत असते. ते रक्त शुद्ध करून संपूर्ण शरीरात खेळवते. आध्यात्मिक हृदय मनाच शुद्धीकरण करून माणसांच्या जन्मसिद्ध हक्क ' मुक्ती ' मिळवून देण्यास मदत करते. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " मनाची जडणघडण अशी करायला हवी की त्याला कोणीही अथवा कोणतीही गोष्ट स्पर्श करणार नाही. "

परमेश्वर आणि कर्मकायदा 


           व्हरांड्यात आल्याबरोबर आमची नजर टेबलावर पडली. त्यावर काहीतरी लिहिले होते. अक्षरे आणि अंकांच्या ४ रांगा होत्या. सर्वात वरच्या रांगेत लिहिले होते ... 

F7.1 5 son pp

       February 7.5th Is the point start from son's house to Puttaparthi.

E S E o 8 E o 

       Each Second Enjoy Oneness, 8 Letter Lord, Every moment Poornam.

8 S S N E B 

       8 letter Lord releases Shiv Sutra No Enmity Barrier.

S 8 

       Sacrifice 8 people in fire.


          मी स्वामींना काही पुरावा द्यायला सांगितले होते. स्वामींनी हा संदेश लिहिला आणि स्पष्टीकरणही दिले. 

          दुसऱ्या दिवशी सकाळी, टेबलावर संदेश लिहिलेल्या ठिकाणी अमृत साक्षात् झाले. मी म्हणाले, " स्वामींनी आपल्याला त्या सर्वांना यज्ञात आहुती द्यायला सांगितले. आपण ते केल्याबरोबर स्वामींनी हा संदेश लिहिला आणि अमृतही दिले. स्वामींनी आशिर्वाद दिले !"

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 


उर्वरित प्रकरण पुढील भागात 

जय साईराम 

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
 
सुविचार 

" देहभाव गळून पडल्यावर सत्याचा साक्षात्कार होत. "
 

परमेश्वर आणि कर्मकायदा 

            मी डोळे उघडले आणि माझ्या लक्षात आले की यागशाळेत नेलेल्या स्वामींच्या पादुका पीठावर विभूती साक्षात् झाली होती. आम्ही यज्ञ सुरु केला. प्रत्येकाने त्यांनी बनवलेली प्रतिकृती अग्नीत टाकली. मी सजवून फ्रेम केलेली सर्व काव्यांची अग्नीत आहुती दिली. नंतर आम्ही शांतीयज्ञ केला, भजने म्हटली आणि आरती केली, आम्ही शुद्धसत्वमध्ये परत आल्यावर बघितले तर स्वामींच्या पादुकांवर अमृत साक्षात् झाले होते. सर्वांनी पादुकांवरील. अमृताचा प्रसाद घेतला.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" त्याग ही सत्याची गुरुकिल्ली आहे. "

परमेश्वर आणि कर्मकायदा 

ध्यान 

वसंता - स्वामी, आजचा यज्ञ तुम्ही करणार आहात . तुम्ही सर्वांचा संहार करा. 

स्वामी - काळजी करू नकोस, सर्व ठीक होईल. 

वसंता - हे देवगण, साधू, संत, महान आत्मे सर्वजण या. आपण आता या दुष्टांना अग्नीत टाकू या. तुम्ही त्यांचा संहार करा. हे यमधर्मराजा, त्यांना शिक्षा करा अथवा त्यांचा संहार करा. स्वामी ! तुम्ही काहीतरी करा ..... 

स्वामी - रडू नकोस. काळजी करू नकोस. सर्व काही ठीक होईल. 

वसंता - स्वामी, प्लीज त्यांचा संहार झाल्याचा पुरावा द्या . 

स्वामी - नक्की देईन. 

वसंता - प्लीज, माझ पत्रं द्या स्वामी. 

* स्वामींनी या प्रकरणाचे पत्र १५ डिसेंबर २००८ ह्यादिवशी संध्याकाळी दर्शनाच्यावेळी घेतले. 

स्वामी - नक्की घेईन. 

ध्यानाची समाप्ती  


संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " आपण केवळ अशा गोष्टींची वाच्यता केली पाहिजे ज्या आपण स्वतः आचरणात आणल्या आहेत. "


परमेश्वर आणि कर्मकायदा 

           मला वाटले, माझी भावकंपने माझ्या खोलीतून स्तूपात जात आहेत, तशीच ह्या काव्यांचीही कंपने स्तूपात जात आहेत. आता मी वाट पाहू शकत नाही. ह्या कविता ताबडतोब नष्ट झाल्या पाहिजेत. एसव्ही आले, मी त्यांना ते प्रकरण वाचण्यास सांगितले. मला त्यांचा सल्ला हवा होता. ते कॅलेंडर पाहून म्हणाले, " आजचा दिवस योग्यच आहे. आज अमावस्या आणि रोहिणी नक्षत्र आहे." दुपारचे ३ वाजले होते. एसव्हींनी सर्व आश्रमवासियांना ३:३० वाजता यागशाळेजवळ जमायला सांगितले. प्रत्येकाने स्वामींनी सांगितलेल्या सात लोकांचे प्रतिनिधित्व करणारी पुठ्ठ्याची प्रतिकृती बनवली. सामान्य माणसाच्या अज्ञानाचे प्रतिनिधित्व करणारी एक प्रतिकृतीसुद्धा बनवली होती. मी सर्व काव्ये गोळा केली आणि रामचंद्रन् यांना ' बाहेरील साक्षीदार ' म्हणून ती वाचण्यास सांगितली. त्यानंतर आम्ही सर्व यज्ञकुंडाजवळ गेलो आणि ध्यान केले.   
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, १ ऑगस्ट, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " केवळ स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केलेल्या निरंतर प्रयत्नांद्वारे सत्याचा बोध होतो. "

२ 

परमेश्वर आणि कर्मकायदा
 
          शिवाप्रमाणे मीही दयाळू आहे. ह्या अनुकंपेला कर्मांचे हिशोब फेडून टाकून सर्वांना मुक्ती द्यायची आहे. स्वामी आता म्हणतात की कुठलाही भेदभाव न ठेवता दाखवलेल्या करुणेमुळे सत्ययुग येण्यास विलंब होत आहे. म्हणूनच मी अगोदर सांगितलेल्या लोकांच्या पकडीतून स्वामी माझी सुटका करीत आहेत. 
          जेव्हा स्वामींनी हे सत्य मला सांगितल, तेव्हा मला ' दीर्घायु होवोत ' ची काव्ये माझ्या खोलीत नकोशी झाली. स्वामींनी वैकुंठ एकादशीला ती काव्ये जाळण्यास सांगितले होते, पण मला तोपर्यंत थांबण्याचाही धीर नव्हता. 

संदर्भ - परमेश्वर आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम