सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प - ४४ 

परमेश्वर आपल्या शोधात येतो 

          १२ एप्रिल २०११ रोजी स्वामींनी एक कागद दिला त्यावर प्रेमसाई आणि अम्मा ह्यांच्यामधील संवाद लिहिलेला होता. १३ एप्रिल २०११ च्या ध्यानात अम्मांनी स्वामींनी विचारले. 
वसंता - स्वामी, तुम्ही पुन्हा प्रेमसाई आणि अम्मा ह्यांच्यामधील संवाद दिलात. आपण पूर्वीच ह्याविषयी लिहिले आहे. मग पुन्हा का दिला ?
स्वामी - कसा तुझा प्रत्येक भाव रूप धारण करतो हे ह्यातून दर्शवले जाते. लहानपणापासून तू नेहमी ' तोडा आणि जोडा ' ही साधना करतेस. तू एखादे टेबल, खुर्ची वा स्तंभ पाहिलास तू त्या वस्तू परमेश्वरशी जोडतेस. अशा तऱ्हेने सर्व परमेश्वर होऊन जातो. तू सर्वांना परमेश्वर बनवतेस. जर तुझा एखाद्या दगडावर पाय पडला तर तो दगडही तुझ्यासाठी परमेश्वर असतो. सर्व वस्तू परमेश्वर आहेत. जे तू खातेस तो भगवंत, खाण्याची क्रियाही भगवंत, जे तू पितेस तो ही भगवंतच. वाळूचा प्रत्येक कण, प्रत्येक दगडही भगवंत तू सर्व भगवंतमयम् बनवतेस. हे सर्व भक्त विजयम मधील भक्तांच्या कथांसारखे आहे. सखुबाई सारखे तू म्हणतेस, परमेश्वर स्वतः तुझा पती बनून आला पाहिजे. गोरा कुंभार आणि रामदास ह्यांच्याकडे जसा परमेश्वर दास बनून आला हे ही त्यासारखेच आहे. सर्व नात्यांमध्ये तुला परमेश्वराला पाहायचे आहे, तो सर्व रूपांमध्ये येतो. मी पुढील अवतारात तुझ्याबरोबर येईन आणि अखंड विनवियोग ४० वर्षे तुझ्याबरोबर राहिन. तुझ्या सर्व इच्छा मी पुऱ्या करेन. आपण एकत्रच लहानाचे मोठे होऊ, एकत्र खेळू, पिऊ, झोपू, सर्व इच्छांची परिपूर्ती होईल. उर्वरीत ३० वर्षे अवतार कार्यासाठी असतील. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' Who is in Swami's heart ' ह्या पुस्तकातून. 

जय साईराम         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा