ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
कृष्ण जन्माष्टमी संदेश
स्वामींनी २००३ मध्ये कृष्णजन्माष्टमीला दिलेला संदेश
कृष्णाचा जन्म बंदीगृहामध्ये झाला. कंसाच्या हुकुमानुसार बंदिगृहाच्या सर्व रक्षकांना अत्यंत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या असूनही त्यांना निद्रेने घेरले. कृष्णाच्या जन्मवेळी फक्त वसुदेव आणि देवकी जागृत होते. दृष्ट कंसाकडून नवजात बालकास असणाऱ्या धोक्याच्या भीतीने वसुदेवाने बालकास सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे ठरवले. त्याने हळुवारपणे बालकास कपड्यांमध्ये गुंडाळले आणि एका टोपलीमध्ये ठेवून, ती टोपली डोक्यावर धरून तो बंदीगृहाच्या बाहेर आला. बंदीवासाचे सर्व दरवाजे आपोआप उघडले. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. वसुदेवाने बालकाच्या रक्षणासाठी प्रार्थना केली. कृष्णाच्या दैवी संकल्पाने एक विशाल सर्प तेथे प्रकट झाला व वासुदेवाच्या मागोमाग जाऊन, मुसळधार पावसापासून बालकाचे रक्षण करण्यासाठी त्याच्या मस्तकावर आपला फणा धरला. वसुदेव, यमुनेच्या पलीकडच्या तीरावर असलेल्या यशोदेच्या घरी पोहोचला. तिने नुकताच एका बालीकेला जन्म दिला होता. तिच्या पतीसह सर्वजण गाढ निद्रेत होते. वसुदेवाने हळुच दिव्य बालकास, कृष्णास यशोदेच्या बाजूला ठेवले आणि तिच्या नवजात बालिकेस उचलून तो त्वरेने बंदीगृहात परतला.
* * *
परमेश्वराचे मार्ग कोणीही जाणू शकत नाही. वसुदेवालाही, तो काय करतोय ह्याचे पूर्ण आकलन नव्हते. त्याने कृष्णाला यशोदेच्या घरी नेले व बालीकेस त्याच्या बरोबर घेऊन आला. त्याने हे कार्य जणु काही तंद्रीत केल्यासारखे केले.
संदर्भ - श्री वसंतसाईंच्या Beyond the Upanishadas ह्या पुस्तकातून.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा