गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" प्रत्येक गोष्टीत चांगले पाहा. तोच परमेश्वर होय ."

इन्क्युबेटर ( निर्जंतुक पेटी )

           माझ आयुष्य हे असे आहे. जन्मापासून मी कोणाशी बोलायला, कोणामध्ये मिसळायला घाबरत असे. भौतिक जगातील लोकांचा स्वभाव माझ्याहून खूप वेगळा आहे. मी या जगाशी जुळवून घेऊ शकत नाही. मी त्यांच्याबरोबर राहू शकत नाही. ते असत्याच जीवन जगले. ते बोलले तसे वागले नाहीत. मी रडले, म्हणाले, " माणसं अशी का बर आहेत ? माझा स्वभाव निराळा आहे. " बाह्यजगापेक्षा मी वेगळ्याप्रकारे लहानाची मोठी झाले. त्यामुळे जेव्हा जगाला धैर्याने तोंड देण्याची वेळ आली तेव्हा मी घाबरून गेले. 

          माझ्या बालपणी, मी नेहमी रामायण, भक्त विजय आणि अनेक महान भक्तांच्या गोष्टी ऐकत असे. मला वाटत असे की, जगात सर्व माणसं ह्या महान दिव्यात्म्यांनी घालून दिलेल्या तत्वांप्रमाणे वागतात. तसे नसल्याचे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा मी गोंधळून गेले. " 


संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, २६ डिसेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

     " कुटुंबाशी असणारे बंध पुन्हा जन्म घेण्यास कारणीभूत होतात. परमेश्वराशी असणारे बंध मोक्ष प्रदान करतात. " 

इन्क्युबेटर ( निर्जंतुक पेटी )


           आज अभिषेकानंतर मी पादुकांवर फुले वाहिली. त्यावेळी एका तगरीच्या फुलाची पाकळी उडाली आणि तिने देवघरातील छोट्या साईकृष्णाचा चेहरा झाकून टाकला. आरतीनंतर आम्ही सर्वांनी पहिले. सकाळीच स्वामींनी सांगितल होत  की त्यांना इथे राहायच नव्हत. तरीसुद्धा फक्त माझ प्रेम त्यांना या जगात राहण्यास भाग पडत आहे. कृष्णाच्या चेहऱ्यावरील पाकळी सुचवत आहे की स्वामींना कलियुगातील लोकांना पाहणसुद्धा अगदी असह्य होत आहे. 

ध्यान 

वसंता - स्वामी, पलीज कलियुगात अवतार का येत नाहीत याबद्दल अधिक सांगा नं. 

स्वामी - अवतार कलियुगात येऊ शकत नाही. यासाठी तुझ जीवन हे पुरेस उदाहरण आहे. तू म्हणालीस " मी कोणात मिसळू शकत नाही. " तुझ्या सवयी वेगळ्या, तुझा स्वभाव वेगळा. यामुळेच तर तुला हे सर्व भोगावे लागते आहे. 

ध्यानाची समाप्ती   


संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
पुष्प - ४८
तीव्रता 

१६ जानेवारी २००९ ध्यान 
वसंता - स्वामी, तुम्ही सर्व जाणता. मला मात्र कोणतीही गोष्ट का माहित नसते? जर मला तुम्ही ज्या दिवशी बोलावणार ती नेमकी तारीख मला माहिती असती तर माझे मन शांत राहिले असते. तुम्ही मला कधी बोलावणार ? मला तुम्हाला भेटायचे आहे. 
स्वामी - म्हणूनच सर्वज्ञतेची शक्ती तुझ्यापासून दडवून ठेवली आहे. ह्या अनभिज्ञतेमुळे तू विलाप करतेस, तू मला भेटण्यासाठी व्याकुळ झाली आहेस. तुझ्या मनात नेहमीच हा विचार असतो जर ही सर्वज्ञतेची शक्ती तुझ्या ठायी आली तर तुझी व्याकुळता, तुझे अश्रू, तुझा विलाप सर्व थांबेल. ही सर्वात मोठी इच्छा नव्हे का? तू नेहमी तेच मागतेस तुझे मन ह्यामध्येच गुंतलेले असते. ही अशी इच्छा आहे की जी जगातील सर्व लोकांच्या इच्छांना दूर करते. जर एखाद्याला इच्छित गोष्ट मिळाली नाही तर त्याचे मन त्या गोष्टीवरच केंद्रित होते. जर आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळाली तर त्याबद्दलची व्याकुळता थांबते. जर एखाद्याला हवी असलेली गोष्ट मिळेल ह्याची खात्री नसते तेव्हा ती मिळवण्यासाठी अधिक तीव्रता असते. जेव्हा त्याला माहित असते की त्याला हवी असलेली गोष्ट मिळणार आहे तेव्हा तेथे भावनेची तीव्रता नसते. म्हणून ही शक्ती तुझ्यापासून दडवली आहे. 
वसंता - आता मला समजले, स्वामी. जेथे अनिश्चितता असते थेट व्याकुळता असते. 
ध्यान समाप्ती  
           माझी केवळ एकच इच्छा आहे. मला स्वामींचे दर्शन, स्पर्शन आणि संभाषण हवे आहे. ही व्याकुळता आजकालची नाही तर ह्याची सुरुवात १९७४ साली जेव्हा मला स्वामींविषयी समजले. ह्यापूर्वी मला कृष्णासाठी तीव्र व्याकुळता होती आणि ह्याच कारणासाठी माझी ही व्याकुळता कधी संपेल असे मी स्वामींना विचारले. आमच्या दोघांच्या देहांमध्ये एकच बुद्धी, एकच जीवप्रवाह कार्यरत असूनही भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचं ज्ञान, सर्वज्ञतेची शक्ती दडवून ठेवली आहे. जर मला हे ज्ञात असते तर मी शांत असते. परंतु मला ती नेमकी तारीख माहित नसल्यामुळे माझी व्याकुळता अधिकाधिक वृद्धिंगत होत आहे. ती बकासुराच्या भुकेसारखी आहे. तथापि ही बकासुराची भूक स्वामींच्या एका रूपाने तृप्त होणार नाही. त्या व्याकुळतेला प्रत्येकामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये निवास करणारे स्वामी हवेत, सर्वांना स्वामींचे दर्शन, स्पर्शन, संभाषण मिळावे अशी इच्छा आहे. हे सत्ययुग आहे, नवनिर्मिती आहे. 
           मला स्वामींचे दर्शन, स्पर्शन व संभाषण प्राप्त न झाल्यामुळे माझ्या भावनांची तीव्रता अव्याहतपणे वाढते आहे. माझ्या मनाला अन्य कोणत्याही गोष्ट स्पर्श करत नाहीत.भविष्यात काय घडेल. ह्याबद्दलच्या अनिश्चिततेमुळे अपेक्षा तीव्र आहेत. जोपर्यंत भविष्यातील घडणाऱ्या गोष्टीबद्दल निश्चितता नसेल तोपर्यंत माझी ही व्याकुळता वाढतच राहणार. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या 'Brilliance of a Million Suns' ह्या पुस्तकातून. 


   



ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
     " परमेश्वराला तुमच्यामध्ये प्रस्थापित करा. तुम्ही परमेश्वरमध्ये प्रस्थापित व्हा. "
इन्क्युबेटर (निर्जंतुक पेटी )

           सत्ययुग पुढे अनेक वर्षे येण्याच चिन्ह नव्हते. सत्ययुग येण्यासाठी अजून कित्येक हजार वर्षे बाकी आहेत. अशा परिस्थितीत जर सत्ययुगाचा उदय आत्ताच करायचा झाला तर हे कार्य किती खडतर असल पाहिजे ? कलिचा सैतान अकाल येणाऱ्या सत्ययुगावर हल्ला करेल. युगांच चक्र नैसर्गिकपणे फिरत असताना हे अस होत नाही. परंतु आता सत्ययुग त्याच्या नियोजित वेळेपूर्वी, अकाली येत आहे. माझे भाव आणि प्रेम यांच्यायोगे मी योग्य वातावरणनिर्मिती करून सत्ययुगाच रक्षण करीत आहे. स्तूप निर्जंतुक पेटीचे कार्य करीत आहे. कसं ? तर स्तूप माझे भाव सर्वव्याप्त करून सत्ययुगाचं रक्षणही करत आहे. हा स्तंभ मातेच्या गर्भाप्रमाणे प्रेमाचं पोषण करत आहे, तसच, जन्माला येणाऱ्या भावी सत्ययुगाचं, कलीरूपी सैतानापासून संरक्षण करण्यासाठी वातावरण निर्माण करीत आहे. सत्ययुग स्तूपाच्या निर्जंतुक पेटीत योग्य वेळ येईपर्यंत राहील. हा आहे विश्वगर्भ.    

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम  

रविवार, १९ डिसेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" प्रेम हे नाम, रूप, स्थळ आणि काळ या सर्वांच्या पलीकडे आहे. "
 
इन्क्युबेटर ( निर्जंतुक पेटी )

           खरंच ! स्वामी, नुसत्या विचारानेही माझा थरकाप होतोय!
           स्वामी कलियुगामध्ये अवतरित झालेत; करुणेपोटी ते सत्ययुग आणणार आहेत. प्रेम सर्वांच परिवर्तन करीत आहे. माझ प्रेम आणि विश्वामुक्तीची इच्छा स्वामींना पृथ्वीवर राहण्यास भाग पाडत आहे. 
          स्वामी गेले ऐंशी वर्षे सर्व मानवजातीला प्रेमाचा मार्ग दाखवत आहेत, आणि मार्गदर्शन करीत आहेत. कोणी त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागतय का ? हे जग आणि ह्या जगातील माणसं अवताराच्या येथील वास्तव्यासाठी योग्य नाहीत. 
           आता आपण इन्क्युबेटरविषयी पाहू या. जेव्हा मूल अपूर्ण दिवसांचे जन्माला येते. तेव्हा त्याचे व्यवस्थित पोषण होण्यासाठी त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवले जाते. मूल योग्य वेळेपूर्वी जन्माला आले असल्याने बाहेरील वातावरण त्याच्यासाठी योग्य नसते. ते रोगांना बळी पडू शकते. इन्क्युबेटर ही कृत्रिम गर्भाप्रमाणे बाळाचे रक्षण करीत असते.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .... 
जय साईराम 

गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
      " खऱ्या प्रेमाला देह अथवा विवाहाची आवश्यकता नसते केवळ भावना पुरेशा असतात."
इन्क्युबेटर ( निर्जंतुक पेटी )

           कौशिक ऋषींच्या मते 'विलक्षण प्रेम ' म्हणजे काय ते आता पाहूया. मानवी देह हा घाम, लाळ, मलमूत्राने भरलेला असतो. कोणताही मानवी देह याशिवाय असू शकतो का ? अवताराचा देहसुद्धा याला अपवाद नाही ! मग मी एकटीच हे सर्व माझ्या देहात नको म्हणून का रडते आहे. कारण मला देह परमेश्वराला अर्पण करायचा आहे. आजपर्यंत कोणी शरीरनिवेदन केले आहे का ? माझ वेडं प्रेम त्यासाठी रडत असत. 
           कौशिकऋषी या प्रेमाच ' विलक्षण ' अस वर्णन करतात. हे मानवी प्रेम नाही, आध्यात्मिक क्षेत्रातील प्रेमही नव्हे आणि अवताराचे प्रेमही नाही. हे अवर्णनीय, विलक्षण, एकमेवाद्वितीय प्रेम आहे. म्हणूनच स्वामी म्हणाले, " तुझ प्रेमच मला या जगात राहण्यास भाग पाडत आहे, नाहीतर मी इथे राहूच शकलो नसतो."
            कलियुगात अवतार येत नाहीत. कलिच्या वातावरणात कलियुगाच्या लोकांबरोबर ते राहू शकत नाहीत. कलियुगाच्या अखेरीस सर्वांचा विलय करण्यासाठीच अवतार येतो. त्यानंतर युगाच नवीन चक्र सुरु होत. पण आता स्वामींचा अवतार कलियुगाच्या सुरुवातीस आला आहे. आत्ताच जर कली इतका वाईट आहे, तर कल्पना करा, पुढील हजार वर्षात तो कुठल्या स्तराला गेलेला असेल ?  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम   

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
     " नैसर्गिक साधनसंपत्तीविषयी मनुष्याला असणाऱ्या लालसेपोटी निसर्गाचा समतोल बिघडला आहे. "
इन्क्युबेटर (निर्जंतुक पेटी)

       हे अस प्रेम आहे जे रात्रंदिवस बुडून अश्रू ढाळत असत. 
       हे अस प्रेम आहे, ज्याला काहीही नको आहे. अगदी परमेश्वरी पदवीही. 
      हे अस प्रेम आहे जे उच्चस्तरीय ज्ञानात आणि ब्रह्मसूत्रातही समाविष्ट होऊ शकणार नाही. 
      १२ मार्च २००४ साली कौशिक नाडी वाचली गेली. त्यात म्हटले आहे, " ही भगवान बाबांच्या प्रती असलेली अलौकिक, विलक्षण प्रेमभक्ती आहे " ही एक अढळ आणि चिरंतर प्रेमभक्ती आहे. 
      हे अस प्रेम आहे जे माझ हृदय नि मन ओतप्रोत भरून टाकत; आणि मी लिहिलेल उच्च ज्ञान मला विसरायला लावत. 
     हे अस प्रेम जे ईश्वरावस्था नाकारून फक्त स्वामींच्या एका दर्शनासाठी आसुसलेलं असत. 
    हे अस प्रेम आहे, जे मला विचार करायला लावत, ' मी जर स्वामींच्या जवळच्या भक्तांच्या घरातील नोकर किंवा कुत्र्याचं पिल्लू असते तर मला त्यांच दर्शन मिळाल असत.'     

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
  
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम  

गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " परमेश्वराची निर्मिती परस्वरावलंबी आहे. निर्मितीत समतोल राखण्यासाठी आपण वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीची परतफेड केली पाहिजे. " 
 
इन्क्युबेटर ( निर्जंतुक पेटी ) 

           दहा वर्षांपूर्वी माझे नाडीवाचन केले गेले, त्यात माझ प्रेम हे ' एकमेवाद्वितीय प्रेम ' आहे असे म्हटले होते. ते पूर्वीच्या अवतारांच्या प्रेमाप्रमाणे नाही. सीतेचे रामावरील प्रेम नाही. रुक्मिणीचे कृष्णाप्रती असलेले प्रेम नाही. राधेचेही कृष्णावरील प्रेम नाही. माझ प्रेम अगदी विलक्षण आहे. या अवतारावर असलेल्या माझ्या प्रेमाला काय बरे नाव द्याल ? त्याच कोणत्या प्रकारात वर्गीकरण करता येईल ? हे एक वेडं प्रेम आहे. 
            सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी मला इतक प्रेम हवय की जे माझ्या ह्या एका देहात सामावू शकणार नाही. हे संपूर्ण जग वसंता होऊन स्वामींवर प्रेमवर्षाव करू देत. ह्या प्रेमाचे एकमेव परिणाम म्हणजे नवनिर्मिती. आजपर्यंत कोणत्याही युगात कोणत्याही अवतारावर इतक प्रेम प्रकट केल गेल नव्हत.    

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम  

रविवार, ५ डिसेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

  " मनुष्याने विवेकबुद्धीचे अनुसरण केल्यास पंचतत्वांमध्ये समन्वय राहील. " 

 

इन्क्युबेटर (निर्जंतुक पेटी )


           विशेष कृपा म्हणजे विशेष प्रेम. निर्मितीच्या प्रारंभापासून कित्येकांनी प्रेम व्यक्त केले आहे. हे काही सांसारिक प्रेम नाही. भौतिक प्रेम हे निरनिराळ्या नात्यांद्वारे व्यक्त होते. पुरुष आणि स्त्रीमध्ये आसक्ती असते. पतिपत्नींमध्ये त्याला प्रीती म्हणतात. पालक व मुलांमध्ये ममता, तर दोन मित्रांमध्ये मैत्री असते. ही सर्व भौतिक प्रेमाची उदाहरणे आहेत. जेव्हा हे प्रेम  परमेश्वराकडे वळवले जाते, तेव्हा ते भक्तीच्या सहा भावामधून व्यक्त होते. 

            वात्सल्य भाव, साख्य भाव, अनुराग भाव, दास्य भाव, मधुर भाव आणि शांत भाव. 

            माझ प्रेम इतरांसारख नाही. ते सर्वसाधारण भौतिक प्रेम नाही किंवा भक्तीच्या या सहा भावांमध्येही मोडत नाही.     

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" परमेश्वर ना नर आहे ना नारी, वास्तविक त्याला लिंग नाही. "
 
इन्क्युबेटर ( निर्जंतुक पेटी ) 

तारीख ८ डिसेंबर २००८, ध्यान 
वसंता - स्वामी, मी 'विशेष कृपा ' विषयी लिहिले. 
स्वामी - विशेष कृपा म्हणजे काय ? विशेष प्रेम होय. तुझ्या प्रेमामुळेच मी या जगात आहे. नाहीतर मी इथे राहूच शकलो नसतो. यापूर्वी कलियुगात अवतार झाला होता का ? कलियुगात अवतार येत नाही. कलियुगाचा कालखंड खूप कठीण असतो. अवतार अशा परिस्थितीत पृथ्वीवर राहू शकत नाही. म्हणूनच कलियुगात अवतार नाही. 
वसंता - स्वामी, मग कल्की अवतार कसा येतो ?
स्वामी - युगान्ती सर्वांचा संहार करण्यासाठी अवतार अवतरण करतो. त्यानंतर क्रिथयुग येते. आता आपण कलियुगाच्या सुरुवातीस आलो आहोत. कलिचे परिवर्तन करणे सोपे कार्य आहे काय ? तू तुझ्या प्रेमाने हे करते आहेस. 
वसंता - स्वामी, कित्येक वेळा आम्ही यज्ञाच्या फोटोंमध्ये घोड्यांची प्रतिमा पाहिली आहे. तुम्ही म्हणालात की तो 'प्रेमअश्व' आहे. 
स्वामी - आता तो घोडा म्हणजे युगान्तास येणारा कल्की अवतार दर्शवतो. वैकुंठ एकादशीला विशेष यज्ञ कर आणि विश्वशांतीसाठी प्रार्थना कर. 
          ... अपूर्ण दिवसात जन्माला आलेल बाळ इन्क्युबेटरमध्ये ठेवले जाते. ते सशक्त होईपर्यंत त्यात राहते. इन्क्युबेटरमध्ये वातावरण व तापमान मातेच्या गर्भाप्रमाणेच असते. सत्ययुगाची जन्म अपूर्ण दिवसात, ठरलेल्या वेळेपूर्वी म्हणजे कलियुग हे कालक्रमानुसार बदलण्याआधी व्हायला हवा. तुझे भाव इन्क्युबेटरप्रमाणे योग्य वातावरण निर्माण करीत आहेत. ते कलियुगाच्या दुष्परिणामांपासून सत्ययुगाचे रक्षण करतात. स्तूप ही निर्जंतुक पेटीच होय. स्तूपाद्वारे तू योग्य वातावरणनिर्मिती करते आहेस. त्यानंतरच, सत्ययुग येईल. 

ध्यानाची समाप्ती      

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम