ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" खऱ्या प्रेमाला देह अथवा विवाहाची आवश्यकता नसते केवळ भावना पुरेशा असतात."
५
इन्क्युबेटर ( निर्जंतुक पेटी )
कौशिक ऋषींच्या मते 'विलक्षण प्रेम ' म्हणजे काय ते आता पाहूया. मानवी देह हा घाम, लाळ, मलमूत्राने भरलेला असतो. कोणताही मानवी देह याशिवाय असू शकतो का ? अवताराचा देहसुद्धा याला अपवाद नाही ! मग मी एकटीच हे सर्व माझ्या देहात नको म्हणून का रडते आहे. कारण मला देह परमेश्वराला अर्पण करायचा आहे. आजपर्यंत कोणी शरीरनिवेदन केले आहे का ? माझ वेडं प्रेम त्यासाठी रडत असत.
कौशिकऋषी या प्रेमाच ' विलक्षण ' अस वर्णन करतात. हे मानवी प्रेम नाही, आध्यात्मिक क्षेत्रातील प्रेमही नव्हे आणि अवताराचे प्रेमही नाही. हे अवर्णनीय, विलक्षण, एकमेवाद्वितीय प्रेम आहे. म्हणूनच स्वामी म्हणाले, " तुझ प्रेमच मला या जगात राहण्यास भाग पाडत आहे, नाहीतर मी इथे राहूच शकलो नसतो."
कलियुगात अवतार येत नाहीत. कलिच्या वातावरणात कलियुगाच्या लोकांबरोबर ते राहू शकत नाहीत. कलियुगाच्या अखेरीस सर्वांचा विलय करण्यासाठीच अवतार येतो. त्यानंतर युगाच नवीन चक्र सुरु होत. पण आता स्वामींचा अवतार कलियुगाच्या सुरुवातीस आला आहे. आत्ताच जर कली इतका वाईट आहे, तर कल्पना करा, पुढील हजार वर्षात तो कुठल्या स्तराला गेलेला असेल ?
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा