गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
पुष्प - ४८
तीव्रता 

१६ जानेवारी २००९ ध्यान 
वसंता - स्वामी, तुम्ही सर्व जाणता. मला मात्र कोणतीही गोष्ट का माहित नसते? जर मला तुम्ही ज्या दिवशी बोलावणार ती नेमकी तारीख मला माहिती असती तर माझे मन शांत राहिले असते. तुम्ही मला कधी बोलावणार ? मला तुम्हाला भेटायचे आहे. 
स्वामी - म्हणूनच सर्वज्ञतेची शक्ती तुझ्यापासून दडवून ठेवली आहे. ह्या अनभिज्ञतेमुळे तू विलाप करतेस, तू मला भेटण्यासाठी व्याकुळ झाली आहेस. तुझ्या मनात नेहमीच हा विचार असतो जर ही सर्वज्ञतेची शक्ती तुझ्या ठायी आली तर तुझी व्याकुळता, तुझे अश्रू, तुझा विलाप सर्व थांबेल. ही सर्वात मोठी इच्छा नव्हे का? तू नेहमी तेच मागतेस तुझे मन ह्यामध्येच गुंतलेले असते. ही अशी इच्छा आहे की जी जगातील सर्व लोकांच्या इच्छांना दूर करते. जर एखाद्याला इच्छित गोष्ट मिळाली नाही तर त्याचे मन त्या गोष्टीवरच केंद्रित होते. जर आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळाली तर त्याबद्दलची व्याकुळता थांबते. जर एखाद्याला हवी असलेली गोष्ट मिळेल ह्याची खात्री नसते तेव्हा ती मिळवण्यासाठी अधिक तीव्रता असते. जेव्हा त्याला माहित असते की त्याला हवी असलेली गोष्ट मिळणार आहे तेव्हा तेथे भावनेची तीव्रता नसते. म्हणून ही शक्ती तुझ्यापासून दडवली आहे. 
वसंता - आता मला समजले, स्वामी. जेथे अनिश्चितता असते थेट व्याकुळता असते. 
ध्यान समाप्ती  
           माझी केवळ एकच इच्छा आहे. मला स्वामींचे दर्शन, स्पर्शन आणि संभाषण हवे आहे. ही व्याकुळता आजकालची नाही तर ह्याची सुरुवात १९७४ साली जेव्हा मला स्वामींविषयी समजले. ह्यापूर्वी मला कृष्णासाठी तीव्र व्याकुळता होती आणि ह्याच कारणासाठी माझी ही व्याकुळता कधी संपेल असे मी स्वामींना विचारले. आमच्या दोघांच्या देहांमध्ये एकच बुद्धी, एकच जीवप्रवाह कार्यरत असूनही भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचं ज्ञान, सर्वज्ञतेची शक्ती दडवून ठेवली आहे. जर मला हे ज्ञात असते तर मी शांत असते. परंतु मला ती नेमकी तारीख माहित नसल्यामुळे माझी व्याकुळता अधिकाधिक वृद्धिंगत होत आहे. ती बकासुराच्या भुकेसारखी आहे. तथापि ही बकासुराची भूक स्वामींच्या एका रूपाने तृप्त होणार नाही. त्या व्याकुळतेला प्रत्येकामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये निवास करणारे स्वामी हवेत, सर्वांना स्वामींचे दर्शन, स्पर्शन, संभाषण मिळावे अशी इच्छा आहे. हे सत्ययुग आहे, नवनिर्मिती आहे. 
           मला स्वामींचे दर्शन, स्पर्शन व संभाषण प्राप्त न झाल्यामुळे माझ्या भावनांची तीव्रता अव्याहतपणे वाढते आहे. माझ्या मनाला अन्य कोणत्याही गोष्ट स्पर्श करत नाहीत.भविष्यात काय घडेल. ह्याबद्दलच्या अनिश्चिततेमुळे अपेक्षा तीव्र आहेत. जोपर्यंत भविष्यातील घडणाऱ्या गोष्टीबद्दल निश्चितता नसेल तोपर्यंत माझी ही व्याकुळता वाढतच राहणार. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या 'Brilliance of a Million Suns' ह्या पुस्तकातून. 


   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा