रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" केवळ प्रेमानेच सत्याची प्राप्ती होते. "
कर्माची अदृश्य मुळे 

            प्रशांती निलयम हे साधूंसाठी योग्य ठिकाण नव्हे. स्वामी म्हणतात की त्यांनी आश्रमात रहावे. प्रशांती निलयम, आश्रमापेक्षा वेगळा आहे. आश्रमात फक्त साधू राहतात. ज्यांना परमेश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, असे तिथे राहतात. प्रशांती निलयममध्ये, प्रत्यक्ष परमेश्वर राहतात आणि निरनिराळ्या भिन्न स्वभावाचे लोक त्यांच्या दर्शनाला येतात. 
            हे वाचल्यावर, माझ्या लक्षात आले की, स्वामींनी मला मुक्ती निलयम आश्रम सुरु करण्यास का सांगितले. आश्रमात मोजकीच आणि समविचारांची माणसे राहतात. प्रशांती निलयम हे मंदिरासारखे आहे. भिन्न प्रकारचे, भिन्न स्वभावाचे लोक दर्शनासाठी येतात. त्याला उत्सवाचे स्वरूप असते. इथे मुक्ती निलयमची गोष्ट निराळी आहे. हे ठिकाण तीव्र साधनेसाठी अत्यंत योग्य आहे. मंदिराचे तसे नसते. साधना हा आश्रमाचा प्रमुख कार्यक्रम असतो. इथे वातावरण अतिशय निरामय आणि शांतीदायी असते. स्वामींना हे हव होत; म्हणून त्यांनी मला २००२ साली आश्रम सुरु करण्यास सांगितले. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम    

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " जेव्हा समस्वाभावी लोक एकाच ध्येयासाठी प्रार्थना करतात तेव्हा त्यांचे ध्येय साध्य होते. " 

कर्माची अदृश्य मुळे 

            आतापर्यंत, स्वामींनी कर्माची अतिसूक्ष्म गुपिते प्रकट केली. त्यात दोन गोष्टी आहेत. पहिली म्हणजे आपण वाईट कर्म करू नयेत. दुसरी, आपल्याला आपल्या कृतींची फळे अनुभवणे भाग आहे. त्यामुळे सतत परमेश्वराच्याच विचारात रहावे. जर आपण या गोष्टींच अनुसरण केल तर आपण स्वतःला कर्माच्या पाशातून सोडवून दुःखातून मुक्त करू शकतो. कुंतिदेवीची विचारसरणी वेगळी होती; तिने कृष्णाकडून असा वर मागितला होता की तिला नेहमी त्रास व दुःख भोगायला लागावे, म्हणजे तिला परमेश्वराचा विसर पडणार नाही !

             हे लिहित असताना मी सहज ' माय डियर स्टुडंट्स ' हे पुस्तक उघडले आणि पान नं ७७ वाचले,

     ..." आत्मानंद हा शुद्ध मनाचा योगी होता. तो नियमितपणे भक्तिपूर्वक ध्यानधारणा करीत असे. त्याने  कित्येकवेळा स्वामींचे दर्शन घेतले होते. त्याला प्रशांती निलयममध्ये रहायचे होते. सर्व सोडून इथे येऊन राहायची त्याची तयारी होती. मी त्याला सांगितले की साधूंसाठी ही जागा योग्य नव्हे, आणि तो ज्या आश्रमातून आला तीच त्याच्यासाठी योग्य जागा आहे. मी त्याला जपमाळ देऊन परत पाठवले. "  


संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार - जानेवारी २

" तुम्ही जे तुमचं कर्तव्य समजता त्याचा त्याग करा. केवळ भगवतप्राप्ती हेच तुमचं कर्तव्य आहे. " 


           ' हे माझं कर्तव्य आहे'  ह्या भावनेचा प्रत्येकानं त्याग केलाच पाहिजे. कारण की, ह्या जीवनात भगवत प्राप्ती हे तुमचं एकमेव कर्तव्य आहे. तुम्ही म्हणाल,"मी माझ्या कर्तव्याचा त्याग कसा करू? माझ्या बायको आणि मुलांचं काय? त्यांच्या करता मी माझं कर्तव्य करत आहे." ही सर्व नाती अशाश्वत आहेत. तुम्ही ह्या जगात एकटे आलात आणि एकटेच हे जग सोडणार. तुम्ही जाताना कोणीही आणि काहीही तुमच्या बरोबर येणार नाही. 

            उदाहरणादाखल आपण रत्नाकर ह्या दरोडेखोराची गोष्ट पाहुयात. तो जंगलात लपून वाटसरूंना लुटत असे, प्रसंगी ठारही करत असे. एक दिवस नारद त्याच्या जवळ गेला आणि त्यानं त्याला विचारलं," तू लोकांना असं लुटतोस का?" दरोडेखोर उत्तरला," मी माझ्या कुटुंबाचं पोषण आणि रक्षण करायला हवं." तू जे करतोस ते घोर पाप आहे. तुझे कुटुंबीय ह्या पापाचे भागीदार होतील का? जा,आणि विचार त्यांना. " रत्नाकर गेला , त्यानं त्याच्या बायकोला, मुलांना आणि आई वडिलांना विचारलं. त्या सर्वांनी एका सुरात नकार दिला आणि म्हणाले," आम्ही तुझ्या पापाचे भागीदार होणार नाही. आमची काळजी घेणं आणि आमचं रक्षण करणं हे तुझं कर्तव्य आहे. ह्यासाठीच तर तू पैसे कमावतोस. " 

            हे ऐकल्याक्षणी रत्नाकरानं तत्क्षणी घर आणि कुटुंबाचा त्याग केला; तो नारदाकडे गेला. नारदानं त्याला रामनामाची दिक्षा दिली. रत्नाकरानं जमवलेल्या पापांच्या राशी एवढया होत्या की त्याला रामाचं नामसुद्धा उच्चारता येत नव्हतं. नारदानं एका झाडाकडे बोट दाखवत ' मरा ' असं म्हणायला सांगितलं. रत्नाकर अव्याहत 'मरा मरा' म्हणू लागला. आणि अखेरीस 'मरा मरा', चं  'राम राम' झालं. तो नामात इतका तल्लीन झाला की त्याच्या शरीरावर मुंग्यांनी वारूळ केलं आणि ह्याला त्याची जाणीवही नव्हती. 

            दरोडेखोर रत्नाकर स्वतःस पूर्णपणे विसरला, अखंड नामजपानं तो महान ऋषी  वाल्मिकी झाला. वाल्मिकी म्हणजे वारूळ. वारुळाने ह्याचं शरीर पूर्ण वेष्टित झालं तरीही भान हरपून तो नाम जपात दंग होता.म्हणून वाल्मिकी ह्या नावानं तो प्रसिद्ध झाला. म्हणून प्रत्येकानं आसक्तीशिवाय स्वतःचं कर्तव्य करावयास पाहिजे. ह्याच वाल्मिकीनं रामायण हे महाकाव्य लिहिलं. कुटुंबाचं रक्षण हे त्याचं कर्तव्य आहे असं त्याला वाटत होतं. कर्तव्याचा त्याग केल्यानंतर रत्नाकराचा  वाल्मिकी झाला.        

            अजून एक उदाहरण प्रल्हादाचं आहे. प्रल्हाद हा हिरण्यकश्यपूचा मुलगा. हिरण्यकश्यपू हा राक्षस म्हणजे मूतिमंत अहंकारच. तो स्वतःस भगवान समजू लागला. इतकंच नाही तर सर्वांनी त्याच्या नावाचा जप करत त्याचीच पूजा करावी असा फतवाही त्यानं काढला. प्रल्हाद आईच्या गर्भात असताना नारद ऋषींनी त्याला 'ॐ नमो नारायणाय ' हा मंत्रोपदेश दिला होता. प्रल्हादाच्या रक्त पेशींमध्ये हा मंत्र वाहत होता. तो गुरुकुलात गेल्यानंतर त्याला सांगण्यात आलं की त्यानं 'हिरण्याय नमः ' म्हणायला पाहिजे. त्यानं ही आज्ञा नाकारली, तो 'ॐ नमो नारायणाय ' हे भगवंताचं नाव जपू लागला. त्याचे गुरु घाबरून गेले, त्यांनी प्रह्लादाबद्दल त्याच्या पित्याला सांगितलं. त्याच्या पित्यानं त्याला आज्ञा केली की मुलानं फक्त 'हिरण्याय नमः ' असा जप करावा. मुलानं पित्याची आज्ञा मोडली;त्यानं 'ॐ नमो नारायणाय ' ह्या मंत्राचा जप चालू ठेवला. त्याचा पिता क्रोधीत झाला ,त्यानं प्रह्लादाला ठार मारण्याकरता अनेक योजना केल्या. प्रथम त्यानं विषप्रयोग केला,नंतर त्यानं त्याला डोंगराच्या कड्यावरून खाली खोल दरीत ढकललं. मुलाचा मृत्यू झाला नाही म्हणून पित्यानं त्याला एका खडकाला बांधलं आणि समुद्रात फेकून दिलं. प्रह्लाद सुखरूप होता हे पाहून त्यानं मुलाला हत्तीच्या पायाखाली दिलं; काहीही उपयोग झाला नाही. मुलगा शांत चित्तानं मंत्रजप करत राहिला. मुलगा बदलावयास तयार नव्हता. भगवंताच्या कृपेमुळं राजाचे सर्व प्रयत्न वाया गेले. प्रह्लादाचा एवढा छळ झाला तरीही खंबीर राहून तो भगवंताचा नामजप करत राहिला. ह्या नामजपानं त्याचं संरक्षण केलं. भगवंताचा अखंड नामजप अतिशय शक्तिशाली आहे. एखाद्याला खडकाला बांधून समुद्राच्या पाण्यात ढकललं तरीही हे नाम त्याला तारतं .  

            अखेरीस निराशेनं ग्रस्त झालेल्या हिरण्यकश्यपूनं  आपल्या पुत्राला विचारलं, "अरे तुझा नारायण कुठे आहे? सांग मला. " प्रह्लाद उत्तरला,"तो सर्वत्र आहे. मग तो खांब असो की गवताचं पातं." क्रोधाविष्ट राजा गरजला, "जर तो इथे असेल तर मी त्याला दंड देईन." असे म्हणत त्यानं जवळच्या खांबाला लाथ मारली. तो खांब दुभंगला आणि त्यामधून उग्र नरसिंह अवतार हिरण्यकश्यपूचा विनाश करण्यासाठी प्रगटला! जगात अशी कुठलीही जागा नाही जिथे परमेश्वर नाही. त्याची प्राप्ती होण्याकरता आपण सातत्यानं अथक प्रयत्न करावयास हवेत. प्रह्लादाला अनेक अग्निपरीक्षाना तोंड द्यावं लागलं तरीही तो सत्यापासून कणभरही ढळला नाही. 

            जर तुम्ही निर्धार केलात की केवळ परमेशवरप्राप्ती हे तुमचं कर्तव्य आहे,तर तुम्ही नक्की त्यास प्राप्त कराल. सर्वोत्तम अवतार भगवान सत्य साई अवतरले आणि त्यांनी ही शिकवण दिली. त्यांनी सांगितलंय की कोणालाही त्यांच्या भौतिक जगाचा त्याग करायची गरज नाहीये.तुम्ही आसक्तीविरहित राहून तुमची कर्तव्ये करा. मानवाचं प्रथम कर्तव्य भगवतप्राप्ती आहे, इतर सर्व नंतर. 

           भगवंताकरता मी माझ्या कुटुंबाचा त्याग केला. माझा स्त्री धर्मही त्यागला. गृहत्याग करून आश्रमात राहू लागले. भगवंतानं मला मांगल्य दिलं. हे भगवत गीतेमधील एका श्लोकाचं प्रात्यक्षिक आहे जिथे कृष्ण घोषित करतो: 

                  सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज |

              अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ||     

            सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्ये मला अर्पण करून तू, केवळ सर्वशक्तिमान,सर्वाधार अशा मला परमेश्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडविन. तू शोक करू नकोस. 

             मी परमेश्वरासाठी माझे सर्व धर्म त्यागले. मी भौतिक विवाहाचा त्याग केला आणि भगवंतानं माझ्याशी विवाह केला. मी माझ्या व्यक्तिगत मुक्तीचा त्याग केला आणि ह्या जगातील सर्वांकरिता मुक्ती मिळविली.


जय साईराम 

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
      " प्रत्येक गोष्टीकडे आपण ईश्वरलीला या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. हे विश्व म्हणजे त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वराचे नाट्य आहे. "
कर्माची अदृश्य मुळे 

           सर्वांनी परमेश्वराच्या तृष्णेचा, वाईट विचार मनात न येण्याचा आणि पूर्ण शरणागतीचा ध्यास घेतला पाहिजे. तुमच्या आयुष्यात जे काही घडत, तुम्हाला ज्या काही संकटांना तोंड द्याव लागत, ते सर्व परमेश्वराने तुम्हाला दिलेल बक्षीस, प्रसाद आहे असे मानावे. तुम्ही अस केलत तर तुम्हाला कर्माच ओझ जाणवणार नाही, तुम्हाला हसत सर्व सहन करण्याची मानसिक शक्ती मिळेल. अनेक महात्म्यांनी संकटांना कसे तोंड दिले याची काही उदाहरणे आहेत. 
            रमण महर्षींना कॅन्सर होता. एक दिवस एक किडा जखमेतून खाली पडला. त्यांनी त्याला उचलून पुन्हा जखमेवर ठेवला आणि म्हणाले, " तुला बाहेर येऊन त्रास का भोगायची आहे ?" संत रामदासांना बारा वर्षे तळघरातील तुरुंगात बंदिस्त केले होते. त्यांनी परमेश्वराचे गुणगान चालूच ठेवले. हे महान आत्मे मन व देह कसे अलिप्त करावे हे जगाला दाखवत असतात. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " प्रथम साधना करून आपण मोक्ष प्राप्त केला पाहिजे आणि नंतर स्वतःला संपूर्णपणे समर्पित केले पाहिजे."

 

कर्माची अदृश्य मुळे

             सुरुवातीच्या काळात स्वामींच्या जवळपास खूप थोडे भक्तगण असत. त्यांनी स्वामींच्या सहवासाचा आणि प्रत्यक्ष संपर्काचा आनंद उपभोगला. त्यावेळी त्यांनी लोकांची लग्ने लावली, नामकरण केले, कुटुंबातली महत्वाची कार्ये केली, त्यांचे शिक्षण आणि इतर गरजांकडे लक्ष पुरवले. त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टीत स्वामी स्वतः सहभागी झाले, तरीही त्यांची कर्म त्यांना भोगावी लागलीच. एकदा एका भक्ताने स्वामींना याविषयी विचारले तेव्हा स्वामी म्हणाले, " तुम्ही जन्म घेता तेव्हाच सर्व ठरलेल असत, मी ते सर्व घडण्याचे फक्त एक साधन आहे. मी केवळ साक्षी आहे. "

            परमेश्वर असल्यामुळे, स्वामी कर्माच्या कायद्यात हस्तक्षेप करत नाहीत. 

             मी कर्म धुवून टाकू शकते कारण मी परमेश्वर नाही. मी फक्त परमेश्वरावर प्रेम करते. हेच ते प्रेम आहे जे सर्व काही करू शकते. 


संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" आपण इथेच, याक्षणी मुक्ती प्राप्त करू शकतो. "
कर्माची अदृश्य मुळे 

            कदाचित कोणी विचारेल, " स्वामींच्याजवळ जे वावरतात त्यांचे काय ? त्यांना नाही का स्वामींची कंपने मिळत?"
            स्वामी साक्षी अवस्थेत आहेत. मी सर्वांची कर्म धुवून टाकण्यासाठी जन्म घेतला आहे. फक्त मुक्ती निलयममध्येच कुंडलिनी स्तंभ बांधला गेला आहे, जगात इतरत्र कुठेही नाही. स्वामींच्या प्रती असलेल्या माझ्या दिव्य प्रेमाद्वारे मी जगातील सर्वांच परिवर्तन करत आहे. मुक्ती निलयम वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथे फक्त दहाजणच आहेत, ते इतरांमध्ये आणि इतरांच्या विचारांमध्ये मिसळत नाहीत. प्रशांती निलयममध्ये स्वामींच्याजवळ काही हजार लोक राहतात. ते अनेक सेवाकार्यात गुंतलेले आहेत, त्यांचा स्वामींशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. हजार एक नव्हे तर, दररोज कित्येक हजार लोक देशभरातून तसेच जगभरातून पुट्टपर्तीला येत असतात. त्यांच्या कित्येक निरनिराळ्या भावना, आचारविचार वातावरणात पसरत असतात. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
         " आपण प्रत्येक गोष्ट परमेश्वराला अर्पण करून सर्व इच्छावासनांपासून रिक्त झाले पाहिजे आणि नंतर स्वतःला पूर्णपणे समर्पित केले पाहिजे ."
कर्माची अदृश्य मुळे 

            इतकच नव्हे तर, माझे भाव मी लिहित असलेल्या पुस्तकांच रूप घेतात. हे कार्य सतत दिवसरात्र चालू आहे. इथे जे आहेत ते माझ्या लिखाणाच भाषांतर करतात. हे काम संगणकावर केले जाते. दिवसभरात मी जे लिहिते त्यावर संध्याकाळी सत्संग होतो. अशाप्रकारे, दिवसरात्र सर्वजण माझ्याच भावांमध्ये गुंगलेले असतात. ही भावकंपने स्तूपाद्वारे अवकाश व्याप्त करून पंचमहाभूते शुद्ध करतात. ही भावकंपने जगातील लाखो लोकांच परिवर्तन घडवीत आहेत. असं असताना येथील मोजक्यांना बदलवून शुद्ध करणार नाहीत हे शक्य आहे का ? सतत माझ्याजवळ राहिल्याने माझे गुण त्यांच्यातही उतरलेत. ते संपूर्ण निर्मितीवर प्रेम करायला शिकलेत. हाच त्यांच्यात आणि इतरांमधील असलेला फरक होय.
 
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " जेव्हा भक्त केवळ परमेश्वरासाठी जीवन व्यतीत करतो तेव्हा परमेश्वर स्वतः त्या भक्ताचा शोध घेत येतो. " 
कर्माची अदृश्य मुळे 

            तरीसुद्धा जे माझ्यासोबत इथे राहतात त्यांनी निष्काळजीपणे असा विचार करू नये की," आपण मुक्ती निलयममध्ये आहोत. अम्मा आणि स्वामींनी आपल्याला इथे आणले आहे. आपण पूर्णम् प्राप्त करणार " मी नेहमी त्यांना सांगत असते, ' निष्काळजी राहू नका, सतत जाणीव ठेवा. '
            कोणी कदाचित विचारेल , " आम्ही स्वामींच्या जवळ आहोत. मग आमचे काय ?"
            खरय! तुम्ही परमेश्वराच्या स्थूल रुपाजवळ आहात. पण तुम्ही त्यांच सर्वव्यापकत्व जाणलात का ? त्यांच सर्वव्यापकत्व ओळखा; त्यांच्या सर्व निर्मितीत त्यांना पाहून त्याच्यावर प्रेम करा. स्वामी म्हणतात ,' सर्वांवर प्रेम करा. ' तुम्ही ह्या जगातील सर्वांवर प्रेम करता का ? जर तुम्ही तसे करत नसाल, तर देहरूपी स्वामींच्याजवळ असण्याचा काय उपयोग ? तुम्ही विचाराल, ' मुक्ती निलयममध्ये काय आहे ? जे तुमच्यासोबत आहेत ते सर्व सृष्टीवर प्रेम करतात का ? सर्वांवर प्रेम करतात का ?' ते सृष्टीवर प्रेम करोत की न करोत, ते माझ्यावर प्रेम करतात; मी प्रकृती आहे. ते जेव्हा माझ्यावर प्रेम करतात, ते व्हा सर्व सृष्टीवर प्रेम करण्याची भावना नैसर्गिकपणे येतेच. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" आपले भाव रूप धारण करून आपले जीवन बनतात. "
कर्माची अदृश्य मुळे 

             जे मुक्ती निलयमला आले आणि माझ्याबरोबर राहिले, त्यांना परमेश्वराची तीव्र ओढ आहे. इथे क्षणोक्षणी ज्ञानाची दालने उघडली जातात. त्यांना ते वाचून, मनन करून स्वतःमध्ये परिवर्तन करणे शक्य आहे. ते माझ्या कार्यात, मला मदत करण्यासाठी इथे आले आहेत. 
            प्रेमसाई अवतारात ते माझे नातेवाईक म्हणून येतील आणि माझ्या आणि स्वामींसोबत राहतील. त्यांचे जीवन पूर्ण असेल. त्यांची काही कर्म बाकी नसल्याने त्यांना पुन्हा जन्म घेण्याची गरजच नाही. कोणी प्रश्न विचारेल, " त्यांची काही कर्म नाहीत अस कस शक्य आहे ?"
            त्याच कारण हे आहे की त्यांना परमेश्वराच्या कार्यासाठी इथे आणल गेल आहे आणि म्हणून ते माझ्यासोबत आहेत. त्यांच्या पुढील आयुष्यात, ते परमेश्वरासोबत राहतील आणि पूर्णत्वाचा आनंद अनुभवातील. त्यांच्या परमेश्वराच्या तृष्णेमुळे ते सर्वसंगपरित्याग करून इथे आले. आत्ता त्यांना परमेश्वराचा प्रत्यक्ष सहवास लाभत नाही, परमेश्वरासोबत राहण्याचा आनंद मिळत नाही. त्यांच्या या ध्यासामुळे ते इथे आले आहेत. म्हणून, ते परत येतील तेव्हा परमेश्वराचे नातेवाईक असतील आणि ते परमेश्वराच्या सान्निध्यात राहतील, ते पूर्णत्वाचा अनुभव घेऊन पूर्णम् होतील. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम