गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " जेव्हा समस्वाभावी लोक एकाच ध्येयासाठी प्रार्थना करतात तेव्हा त्यांचे ध्येय साध्य होते. " 

कर्माची अदृश्य मुळे 

            आतापर्यंत, स्वामींनी कर्माची अतिसूक्ष्म गुपिते प्रकट केली. त्यात दोन गोष्टी आहेत. पहिली म्हणजे आपण वाईट कर्म करू नयेत. दुसरी, आपल्याला आपल्या कृतींची फळे अनुभवणे भाग आहे. त्यामुळे सतत परमेश्वराच्याच विचारात रहावे. जर आपण या गोष्टींच अनुसरण केल तर आपण स्वतःला कर्माच्या पाशातून सोडवून दुःखातून मुक्त करू शकतो. कुंतिदेवीची विचारसरणी वेगळी होती; तिने कृष्णाकडून असा वर मागितला होता की तिला नेहमी त्रास व दुःख भोगायला लागावे, म्हणजे तिला परमेश्वराचा विसर पडणार नाही !

             हे लिहित असताना मी सहज ' माय डियर स्टुडंट्स ' हे पुस्तक उघडले आणि पान नं ७७ वाचले,

     ..." आत्मानंद हा शुद्ध मनाचा योगी होता. तो नियमितपणे भक्तिपूर्वक ध्यानधारणा करीत असे. त्याने  कित्येकवेळा स्वामींचे दर्शन घेतले होते. त्याला प्रशांती निलयममध्ये रहायचे होते. सर्व सोडून इथे येऊन राहायची त्याची तयारी होती. मी त्याला सांगितले की साधूंसाठी ही जागा योग्य नव्हे, आणि तो ज्या आश्रमातून आला तीच त्याच्यासाठी योग्य जागा आहे. मी त्याला जपमाळ देऊन परत पाठवले. "  


संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा