रविवार, ३१ जुलै, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" आपल्या अंतर्यामी सर्वकाही सामावलेले आहे. " 
१०
कली म्हणजे कर्म 

          कलियुगात माणसाच्या कर्मांनी पंचमहाभूते दूषित केली. मी ती कर्म माझ्या पंचेंद्रियांवर घेतली आणि म्हणून मला क्लेश होतात. आजपर्यंत कोणत्याच अवतारांनी अस कार्य केल नव्हत. पुराणात कुठेही याची नोंद नाही. 
          पूर्वी अवतार आले, त्यांनी दुष्टांचा संहार करून धर्मस्थापना केली. आता हा अवतार सर्वांना मुक्ति देऊन प्रेमस्थापना करत आहे. संपूर्ण जगावर पूर्व कसे करावे हे स्वामी माझ्या जीवनाद्वारे दाखवत आहेत. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, २८ जुलै, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" आपणच आपली दुःख, भोग वा यास कारणीभूत असतो. "
१०
कली म्हणजे कर्म 

            मी पंचमहाभूतांची अशुद्धता माझ्या देहावर घेते. गेली सहा वर्षे माझ्या पंचेंद्रिये क्लेश सहन करत आहेत. मला एका डोळ्याने दिसत नाही आणि दुसऱ्या डोळ्याने अंधुक दिसते. शरीराला खाज सुटण्याने माझ शारीरिक स्वास्थ्य खालावत जात आहे. मला एका कानानी नीटसे ऐकू येत नाही. माझे सगळे दात तुटलेत, हिरड्या सुजून दुखतात. मी कोणत्याही डॉक्टरकडे गेले नाही. 
           जर पंचमहाभुतांमध्ये सूसूत्रता असेल तरच माझी पंचेंद्रिये सुस्थितीत राहतील. यावरून हेच दिसते की मी प्रकृती आहे. माझ्या परमेश्वरावरील एकाग्र प्रेमामुळेच हे सर्व घडतय. सहस्रार उघडते आणि नवनिर्मिती आराखडा प्रकट होतो. या नवीन निर्मितीत, माझी पंचेंद्रिये पंचमहाभूते होतात.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम  

रविवार, २४ जुलै, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " काम ज्ञानाला झाकोळून टाकते. भावनांचा उद्रेक इंद्रियांमध्ये प्रवेश करून नानाविध इच्छा दर्शवितो व अतृप्त अग्नीसारखा खऱ्या ज्ञानाला वेढून टाकतो आणि परिणाम स्वरूप सर्वनाश होतो. "
१०
कली म्हणजे कर्म

            मी स्वामींवर प्रेम करते. सर्वजण माझ्यासारखे व्हावेत आणि सर्वांनी फक्त परमेश्वरासाठी जगावे असे मला वाटते. यासाठी जग बदलण्याची गरज आहे. या बदलासाठी आम्ही दोघे संपूर्ण आयुष्यभर खूप त्रास सोसत आहोत. जी कर्म धुतली जाण्यास साधारणतः १०० जन्म घ्यावे लागतात, ती परमेश्वराच्या दिव्यदेहाने घेतली आहेत. सध्या जगात अनेक भक्तगण आणि महान ज्ञानी आहेत. त्यांच्या स्वभावात काही शुल्लक दोष असतील. स्वामींनी आणि मी अशा लोकांचे दोष आणि कर्म तसेच प्रेमसाई अवतारात जे आमचे मित्र आणि नातेवाईक म्हणून येणार आहेत अशा सर्वांची कर्म घेतली आहेत. अशाप्रकारे, त्यांची कर्माची ओझी हलकी केली; ते सत्ययुगात पुन्हा जन्म घेऊन जीवनमुक्त म्हणून जगतील.
  
संदर्भ- सत्ययुग आणि कर्मकायदा

उर्वरित प्रकरण पुढील भागात.....  
जय साईराम   

शनिवार, २३ जुलै, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार - ८ जानेवारी 

" जे जे काही तुम्हाला भगवंतापासून दूर ठेवते ते सर्व 'माया' आहे."

जे काही तुम्हाला भगवंतापासून दूर ठेवते ते सर्व माया आहे. ही सूचना फक्त साधकांसाठी आहे. साधना सुरु केल्यानंतर सुरुवातीच्या काळात आपण असा विचार केला पाहिजे की,'ह्या जगातील सर्व काही माया आहे.' साधकानं अत्यंत जागरूक रहावयास हवं; कारण ही माया कुठच्याही क्षणी आणि कुठच्याही रूपात येऊ शकते. आपण एक उदाहरण पाहू यात.

विश्वामित्र एक महान तपस्वी होता. भगवंतानं स्वतः त्याला ‘विश्वामित्र’, म्हणजे अखिल जगताचा सखा हे नाव बहाल केलं होतं. त्याच्या तपाची शक्ती इतकी प्रचंड होती की त्याला स्वर्ग निर्माण करता आला. विश्वामित्राचं जीवन एक राजा म्हणून सुरु झालं. त्यानं सर्वत्याग करून तपश्चर्या करावयास सुरुवात केली. त्याला अनेक सिद्धी प्राप्त झाल्या. एकदा तो तप करत असताना इंद्रानं त्याचा तपोभंग करण्यासाठी मेनका नावाच्या अप्सरेला पाठवलं. अप्सरा नाचत गात आली, विश्वामित्राने डोळे उघडले. तत्क्षणी तिच्या सौन्दर्यानं आकर्षित होऊन तिच्या माया जाळात फसला. त्यांना शकुंतला नावाची मुलगी झाली. विश्वामित्राला आपली चूक उमजली; एकदाही बाळाकडे वळून न पाहता तो तप करण्यास निघून गेला. एका महान ऋषीची जर ही अवस्था होऊ शकते तर सामान्य साधकांची काय वाट? म्हणून साधकानं अतिशय दृढ असणं अत्यंत आवश्यक आहे.

आता आपण माझ्या जीवनातील उदाहरण पाहू यात. मी अगदी सर्व साधारण कौटुंबिक जीवन जगले. तरीही मी माझी कौटुंबिक कर्तव्ये करत असताना मन पूर्णपणे परमेश्वरावर केंद्रित  ठेवून तप केले. मी भगवंतासाठी अखंड अश्रू ढाळत आक्रंदन करत असे. १९९६ मध्ये स्वामी माझ्या ध्यानात आले,आणि माझ्याशी बोलू लागले. त्यांनी माझ्याकरता रुपेरी बेट निर्माण केलं. आम्ही तेथे भेटून बोलत असू. तेव्हा त्यांनी सांगितले की मी त्यांची शक्ती आहे. मी ह्याला विशेष महत्व दिलं  नाही. नंतर त्यांनी सांगितलं की मी राधा आहे, दुर्गा आहे, सरस्वती आहे, धन्वंतरी आहे आणि लक्ष्मी आहे. अशा रीतीनं त्यांनी मला अनेक पदव्या बहाल केल्या. मी त्या सर्व नाकारल्या आणि म्हणत राहिले की मला केवळ भगवान हवा आहे. मला बाकी काहीही नको होतं. माझा मंत्र होता,"माझं तुमच्यावर प्रेम आहे स्वामी. मला तुम्ही हवे आहात. " 

प्रोफेसर रुहेलानी त्यांच्या पुस्तकात ह्याचा उल्लेख केला आहे. नंतर स्वामी म्हणाले,"जसजशी तू तुझ्या तपश्चर्येचं फळ नाकारत जातेस तसतशी तुझ्या तपाची शक्ती वाढत जाते. आता तुला अवतार व्हावं लागेल." पण मी स्वामींना सांगितलं की मला हे काहीसुद्धा नकोय. तुम्ही माझी सर्व तपशक्ती परत घ्या; मला फक्त तुमच्या चरणांची धूळ होऊन रहायचं आहे. यानंतर स्वामींनी मला रिक्त केलं आणि त्यांचं सत्य माझ्यात भरलं. ह्याविषयी मी 'उपनिषदांच्या पलीकडे' ह्या माझ्या पुस्तकात लिहिलं आहे. तर ही माया केव्हा आणि कुठल्या रूपात येईल ह्याचा काही भरवसा नाही. विश्वामित्रासाठी तिनं मेनकेचं रूप धारण केलं. माझ्याकरता ह्या मायेनं 'अवतार पद' हे रूप धारण केलं. अवतार पदाचा अव्हेर न करता जर मी ते स्वीकारलं असतं आणि मी अवतार झाले असते तर मी जगाकरता काहीही करू शकले नसते; कारण मी 'साक्षी भाव' अवस्थेत गेले असते. असं झालं तर मी लोकांची कर्मं कशी बरं नाहीशी करू शकले असते? वैश्विक मुक्ती कशी देऊ शकले असते? माझ्याजवळ जे काही आहे ते सर्व सर्वांबरोबर वाटून घेण्याचा माझा स्वभाव आहे. म्हणूनच मला मिळालेली मुक्ती सुद्धा मी एकटीनं अनुभवू शकले नाही. मी स्वामींकडे वैश्विक मुक्ती मागितली. माझ्या तपश्चर्येचं फळ वैश्विक मुक्ती आहे. 

मुक्तिनीलयमला विमला आली आहे. ती मेनकेचा अंश आहे. ती सतत नाचत गात मला प्रोत्साहन देत असते. ती माझी सेवा करण्यात सर्व वेळ व्यतीत करते. ती मायेचं रूप नसून महामायेसारखी ती मला वर खेचत असते. इंद्रानं विश्वामित्राचा तपोभंग करण्यासाठी मेनकेला पाठवलं,तर सत्य साईंनी मला प्रोत्साहित करण्याकरता त्यांच्या मेनकेला (विमलाला) पाठवलं. एक माया आहे, तर दुसरी महामाया.  

२१ जून २०१६ ध्यान 

वसंता : स्वामी, माझे प्रभू! तुम्ही कधी येणार? पूर्वी तुम्ही किती चमत्कार करत होता! तुम्ही सर्वाना किती विभूती आणि किती वस्तू दिल्यात! तुम्ही आम्हाला विभूती आणि औषध का बरं देत नाही? मी आणि येथील सर्व खूप दुःख सहन करत आहोत. 

स्वामी : तू काळजी करू नकोस. मी तुला तीन वचने देतो: मी नक्की येईन, तुझी काया बदलेल, आणि सर्व बरे होतील. नक्की, नक्की, नक्की. 

वसंता : ठीक आहे स्वामी, तुम्ही केव्हा येणार? 

स्वामी : मी येईन. 

 (स्वामी सोफावर बसतात, मी जमिनीवर बसते. त्यांच्या मांडीवर डोकं ठेऊन मी रडते ...) 

वसंता : मला तुम्ही हवे आहात, फक्त तुम्ही हवे आहात. 

(ज्ञानराम धावत येतो. स्वामी म्हणतात "तुझ्या आईला एक गोष्ट सांग... तो उत्तरतो, नाही, बाबा तुम्ही तिला सांगा. मी तुमच्या मांडीवर पडणार. राजा म्हणतो ठीकाय, मी सांगतो.) "  

स्वामी : द्वापार युगात एकदा कृष्ण आणि गोपी चांदण्यात खेळत होते. सर्वजण यमुना नदीच्या तीरावर बसले. कृष्णानं त्यांना नदीत पूर्ण चंद्राचं प्रतिबिंब दाखवलं. सर्वाना आनंद झाला. एक गोपी उद्गारली ,"चंद्रात एक चेहरा दिसतोय!" कृष्ण उत्तरला ,"होय,तो राधाचा चेहरा आहे." राधा म्हणाली,"हा माझा चेहरा नाहीये." सर्व गोपिका एका सुरात म्हणाल्या,"हो,हा राधाचा चेहरा नाही आहे." कृष्ण म्हणाला,"ती राधाच आहे. तिचा कलियुगातील चेहरा आहे हा." हे ऐकल्यावर सर्व गोपिका एकदम म्हणाल्या,"त्यावेळेस आम्ही पण येणार." कृष्णानं सांगितलं,"तुम्ही सर्व जणी येऊ शकत नाही. थोड्या जणी याला. आम्ही जेव्हा सत्य युगात परत येऊ तेव्हा सर्व गोपी येतील."

वसंता : हे काय स्वामी? आता कोण कोण गोपी आल्या आहेत? 

स्वामी : आता फक्त गोप आले आहेत. आपण पुन्हा येऊ तेव्हा सर्व गोपी आपल्या नातलग होऊन येतील. 

वसंता : मला समजलं स्वामी. S.V. नी विचारलंय की ह्या दुर्गेचं नाव काय ठेवायचं? आधी ती वनदुर्गा होती. 

स्वामी : ती वसंत दुर्गा आहे. तू सर्वाना अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेत आहेस. तुझा जन्म अमावास्येला झाला, आता ह्या दुर्गेच्या रूपात तुझा जन्म पौर्णिमेला होतो. 

ध्यान समाप्त.

आता आपण पाहू यात. मुक्ती निलयम मध्ये सर्व आजारी असल्यामुळे मी स्वामींकडे सर्वांसाठी औषध मागितले. स्वामींनी इतरांसाठी केवढं काय काय साक्षात केलं! त्यांनी आमच्याकरता काहीच का नाही केलं? मी स्वामींकडे असं सांगत रडले तेव्हा त्यांनी मला तीन वचनं दिली, "मी नक्की येईन,तुझी काया बदलेल, आणि सर्व बरे होतील." 

भगवान सर्वाना विभूती देतात,पण मला वचन देतात. स्वामी सत्य स्वरूप आहेत. त्यांचं नाव सत्य साई आहे. त्यांनी दिलेली तीन वचनं अशी आहेत,' ते येतील, तेव्हा माझी काया परिवर्तित होईल आणि सर्व व्याधीमुक्त होतील. हेच सत्य युग आहे. कली युगाचं परिवर्तन.  

मला फक्त स्वामी हवेत असं म्हणून मी अश्रू ढाळत असताना ज्ञानराम आला. तेव्हा स्वामींनी द्वापार युगातील एक गोष्ट सांगितली. त्यावेळी कृष्ण आणि गोपिका चांदण्यारात्री लपाछपीचा खेळ खेळत होते. थोड्या वेळानं ते यमुनेच्या तीरावर बसले. कृष्णानं चंद्राच्या पाण्यातील प्रतिबिंबिकडे निर्देश केला. सर्वानी नदीतील पाण्यात चेहरा प्रतिबिंबित झालेला पहिला. तेव्हा कृष्णानं सांगितलं की तो राधाचा चेहरा होता. राधासहित सर्व गोपिका उद्गारल्या की तो चेहरा राधेचा नाहीये. तेव्हा कृष्णानं स्पष्टीकरण दिलं की, जेव्हा राधा कलियुगात परत येईल तेव्हा हा तिचा चेहरा असेल. कृष्णानं माझ्या जीवनात हे सिद्ध केलं. अगदी बाळ वयापासून मी कृष्णावर भक्तीचा वर्षाव केला. अनेक वर्षांनंतर 'त्यानं' मला ध्यानात सांगितलं,"मी सत्य साई म्हणून पुट्टपर्थीमध्ये जन्मलो आहे." तदनंतर माझी भक्ती पूर्णतः स्वामींकडे वळली. ध्यानात स्वामी माझ्याशी बोलू लागले.  त्यांनी मला सांगितलं "तू राधा आहेस." कृष्णानं ध्यानात सांगितलं की, "मी सत्य साई आहे." आणि सत्य साईंनी ध्यानात सांगितलं की,"तू राधा आहेस." ह्यावरून आपल्याला दिसून येईल की स्वामींचं अवतार कार्य  द्वापार युगातच सुरु झालं.  

स्वामींनी हे सांगितल्यानंतर, स्वामींच्या वर्धापन दिनकरता आम्ही  सेवादलमधून पुट्टपर्तीला गेलो. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर स्वामींनी सर्वाना पादनमस्कार दिला. तेव्हा मी स्वामींना एक पत्र लिहिलं होतं आणि त्यावर 'तुमची राधा' अशी सही केली होती. स्वामींनी माझ्या हातातून पत्र घेतलं.स्वामींनी माझ्या हातून घेतलेलं  हे माझं पहिलं आणि शेवटचं पत्र आहे. बाकीचे सर्व अध्याय,पत्र आणि पुस्तकं दूतांतर्फे दिली गेली.  

द्वापार युगात एडी आणि फ्रेड गोप होते. दोघेही कृष्णाचे मित्र होते. येऊ घातलेल्या प्रेमसाई अवताराच्या काळात सर्व गोपिका आमच्या नातलग होतील. प्रेमसाई अवतारावर मी पाच खंड लिहिले आहेत. आणि हे नवीन रहस्य स्वामींनी आता उलगडलं. 

काल S.V. नी मला विचारलं, "आपण आत्ता प्रतिष्ठापना केलेल्या दुर्गेचं नाव काय,अम्मा? आपण आधी तिला वनदुर्गा म्हणत होतो." २००९ मध्ये आगम शास्त्रांना अनुसरून आम्ही ह्या दुर्गेची प्रतिष्ठापना केली. प्रथम आम्ही स्वामींच्या पादुका जेथे होत्या त्या देवळात तिला स्थापित केलं होतं. नंतर आश्रमाच्या दक्षिण दिशेला नवीन देऊळ बांधलं आणि ह्या दुर्गेला तिथे पुनः प्रतिष्ठापित केलं गेलं. स्वामी म्हणाले की आता तिचं नाव 'वसंत दुर्गा' आहे. जेव्हा मी स्वामींना विचारलं की आम्ही तिची प्रतिष्ठापना पौर्णिमेला करू शकतो का तर, स्वामींनी सांगितले,"तू अमावस्येला जन्म घेतलेला पूर्ण चंद्र आहेस.तू 'वसंत दुर्गा' सर्वाना अज्ञानाच्या अंध:कारातून ज्ञानाच्या उजेडाकडे नेण्याकरता जन्मली आहेस." स्वामींनी ह्या दुर्गेचं नाव 'वसंत दुर्गा' आहे हे आत्ता उघड केलं.  

मध्यान ध्यान 

वसंता : स्वामी, माझं नाव उपयोगात आणू नये, मला ते आवडणार नाही. 

स्वामी : तुला हवं की नको हा प्रश्नच नाहीये. फक्त तूच सर्वांचा कर्मसंहार करतेस. म्हणून तू दुर्गा आहेस. 

ध्यान समाप्त 

परमेश्वर अवस्थेसह सर्वकाही मी दूर ढकलले. 'केवळ परमेश्वर हवा' ह्या एकाच इच्छेनं झपाटून मी सर्व काही दूर लोटले. ह्या माझ्या दूर ढकलण्यामुळे माया महामायेत बदलते आणि वनदुर्गा वसंत दुर्गा होते. 

ह्याचा पुरावा स्वामींनी मला केळ्यात दाखवला. केळीच्या सालीवर राधा आणि कृष्ण अगदी स्पष्ट दिसले.


जय साईराम 

गुरुवार, २१ जुलै, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" भाव रूप धारण करतात."
१०
कली म्हणजे कर्म 

             कलियुगात धर्माचे तीन पाय निखळून पडलेत. तो फक्त एकाच पायावर उभा आहे. सर्वजण मन मानेल तस वागत आहेत. त्यामुळे कर्माचे ओझे खूप वाढत आहे. कोणीही धर्माने आचरण करीत नाही. प्रेम, जो धर्माचा पाया आहे तेच नाहीसे झाले आहे. ज्ञान अथवा विवेकबुद्धी नष्ट झाली आहे. धर्म एका पायावर अडखळत उभा आहे. माणसाच्या अस्थिर मनोवृतींमुळे पंचमहाभूतांमध्ये समन्वयता राहिली नाही. जग म्हणजे नरकच झाले आहे. पापाचे भय उरले नाही. या युगाचे अवतार, प्रत्यक्ष स्वामी इथे आहेत. ते प्रेमाचा मार्ग दाखवताहेत. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम  

रविवार, १७ जुलै, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
    " प्रत्येक जीवाच्या भावविश्वद्वारे परमेश्वराचे स्वरूप निर्माण होते. "
१०
कली म्हणजे कर्म 

            आता स्त्रिया नोकरी करतात, तिथे त्या पुरुषांमध्ये निःसंकोच वावरतात. मुलांच्या पुढे चुकीचा आदर्श ठेला जातो व त्यामुळे त्यांचे चारित्र्य बिघडू शकते. 
            पुरुषाचा धर्म कोणता? समाजाची आणि देशाची सेवा हाच पुरुष धर्म. आज पुरुष हलक्या दर्जाच्या करमणुकीत त्यांचा वेळ वाया घालवतात. ते त्यांची कर्तव्ये योग्यरितीने पार पाडत नाहीत. 
             शिक्षक त्यांची कर्तव्ये अचूकपणे पार पाडत नाहीत, त्यामुळे ते विद्यार्थ्यांचे योग्य आदर्श नाहीत. पुरातन काळात गुरुकुल पद्धतीत शिक्षक विद्यार्थ्यांकडून काही  मोबदला घेत नसत. आता शिक्षण हे बाजारातील विकाऊ वस्तू झाली आहे ! हा पैसे कमवण्याचा धंदा झाला आहे. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम  

गुरुवार, १४ जुलै, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" भक्तांच्या प्रयत्नांनुसार परमेश्वर स्वतःला प्रकट करतो." 
१०
कली म्हणजे कर्म 

           त्रेतायुगात धर्म एक पाय निखळून फक्त तीन पायांवर उभा राहतो. स्वार्थ वाढत जातो आणि कुटुंब विभक्तीच दुःख भोगतात. माणसाच्या मनात लोभ उत्पन्न होतो आणि तो सदाचरणात अडखळतो. 
            पुढील युगात कृष्ण अवतार घेतो व सदाचरणाची आणि ज्ञानाची शिकवण देतो. अनेक राजे लोभापोटी विनाशास कारणीभूत होतात. लोक पाप करण्यास करचत नाहीत. अशाप्रकारे धर्माचा अजून एक पाय निखळतो. 
             कलिचा उदय होतो आणि धर्माचा अधःपात होतो. कोणतीही व्यक्ती सदाचरणाने वागत नाही. स्त्रिया धर्माचे अनुसरण करीत नाहीत. स्त्रीचा धर्म काय? आपल्या कुटुंबाची, पतीची, मुलांची व्यवस्थित देखभाल करणे होय. स्त्रीचा धर्म म्हणजे तिच्या मुलांना चारित्र्यवान घडवणे, त्यांना समाजाचे जबाबदार घटक बनवणे.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम 

बुधवार, १३ जुलै, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

गुरु पौर्णिमा संदेश 


             श्री वसंतसाई अम्मांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम. २०२२ ची गुरु पौर्णिमा! अम्मांच्या चरणी मी पामर काय समर्पण करणार? भगवान श्री सत्य साई बाबांवरील आत्यंतिक प्रेमानं त्यांना मिळालेले अभूतपूर्व आध्यात्मिक अनुभव आणि त्यांच्या लेखणीतून स्त्रवलेलं ज्ञानामृत मी मराठी वाचकांकरता मराठीत भाषांतरित करण्याचा दुबळा प्रयत्न करते. खास गुरु पौर्णिमे निमित्त!  “अगदी लहान वयापासून ते आजपर्यंत मी सर्वांना माझे गुरु मानते. लहानशा अळीपासून ते ब्रह्मापर्यंत प्रत्येकाकडून मी काही ना काही शिकत आले आहे. बालपणी स्त्रिया दारात रांगोळी काढत असताना मी आमच्या घराच्या पायरीवर बसून पाहत असे. मुंग्यांची शिस्त मी लक्षपूर्वक पाहत असे आणि चकित होत असे. सगळ्या कशा शिस्तीत आणि ओळीने धान्य गोळा करत असत! गडबड गोंधळ, घाईगर्दी ह्याचा मागमूसही नसे. एखादी मुंगी तिच्या मागच्या मुंगीला धान्य कुठे आहे ह्याची माहिती देत असे. सर्व काम नीटनेटके आणि एकोप्यानं होत असे. मुंग्यांकडून मी शिस्त आणि एकोपा शिकले.तसेच कावळे! आपण जर कावळ्यांसाठी अन्न ठेवलं तर ते काव काव करून सर्व कावळ्यांना बोलावतात,आणि त्यांच्यासाठी ठेवलेलं अन्न मग ते कमी असो की जास्त, सर्वांमध्ये वाटूनच खातात. कावळ्यांचा हा गुण  माझ्या रक्तातच उतरला. मला मिळालेली कोणतीही गोष्ट मग ती केवढी का असेना मी सर्वांमध्ये वाटल्याशिवाय अनुभवू शकत नाही. माझ्या कठोर तपश्चर्येमुळे स्वामींनी मला मुक्ती बहाल केली. तथापि मी मुक्तीचा आनंद एकटीनं उपभोगणार नाही, ते चोरी केल्यासारखं होईल म्हणून मी स्वामींना सांगितलं की त्यांनी अखिल विश्वाला जीवनमुक्ती बहाल केली तरच मी माझ्या मुक्तीचा स्वीकार करून आनंद अनुभवू शकीन.  ह्यामुळे येणाऱ्या सत्य युगात सर्वजण जीवनमुक्त असतील. मुक्तीच्या आनंदाचा अनुभव घेत त्यांचं जीवन व्यतीत करतील.” 


जय साईराम

रविवार, १० जुलै, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
      " केवळ शुद्ध निर्विचार मनोवस्थेमध्ये परमेश्वराचा खरा आवाज ऐकू येतो. " 
१०
कली म्हणजे कर्म 

            क्रिथयुगाच्या पहिल्या पर्वात सर्वजण फक्त परमेश्वरासाठी जगतात. सर्वजण सत्व, रज, तम या तिन्ही गुणांच्यापलीकडे म्हणजेच गुणातीत अवस्थेत असतात. दुसऱ्या पर्वात अहंकार आणि स्वार्थ उत्पन्न होण्यास सुरुवात होते. स्वार्थ हेच कर्माचे मूळ आहे. त्यामुळेच गुण उत्पन्न होतात. वासना, क्रोध, लालसा, द्वेष, अहंकार आणि ममत्व माणसाच्या मंदिर निर्माण होतात. ही वैशिष्ट्य आणि गुणच माणसाला बंधनकारक असतात. कर्म या तीन गुणांद्वारे कार्य करते. 
            उदाहरणार्थ, रावणाच्या मनात वासना जागृत झाली, त्याने सीतेला पळवण्याची क्रिया केली. याप्रमाणे वासना कर्माचे, कृतीचे कारण झाली. या कृतीचा परिणाम म्हणजेच रावणाच्या संपूर्ण कुळाचा नाश.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम 

गुरुवार, ७ जुलै, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
   " तुमच्या स्वभावातून तुमच्यामध्ये असणारा परमेश्वर प्रतिबिंबित होतो. "
१० 
कली म्हणजे कर्म 

            चार युगांमध्ये कली सर्वात भयंकर असतो. पहिल्या युगात म्हणजेच क्रिथयुगात मानव फक्त परमेश्वरसाठी जगतो. ही पहिली सृष्टी प्रत्यक्ष परमेश्वरापासून जन्मास येते. म्हणून सर्वजण फक्त परमेश्वराच्या विचारात असतात. पुरुष धर्माचे आचरण करतात आणि ऋषींप्रमाणे जगतात. ते फक्त परमेश्वर जाणतात. त्यांच अस दुसर जग नसत. सर्वजण परमेश्वराच्या विचारात जगतात. धर्म चार पायांवर भक्कम उभा असतो. 
             त्रेतायुगाचा उदय होतो आणि धर्माचे आचरण करणे हळूहळू कमी होत जातो. श्रीराम अवतार घेतात आणि सदाचरणाच आयुष्य जगून उदाहरण घालून देतात. त्रेतायुगात असुरसुद्धा परमेश्वरावर लक्ष केंद्रित करून तपस्या करतात. रावण आणि हिरण्यकश्यपु राक्षस याचे चांगले उदाहरण आहे. तरीसुद्धा, जेव्हा स्वार्थाचा प्रादुर्भाव होऊन दुर्गुणांची सुरुवात होते तेव्हा धर्माचा ऱ्हास होतो व कर्म सुरु होते. रावणाच्या मनात वासनेने प्रवेश केला आणि हिरण्यकश्यपूमध्ये क्रोध आला.  


संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, ३ जुलै, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
 सुविचार 
       " सत्याचा साक्षात्कार सहजतेने होत नाही त्यासाठी पूर्णतः आत्मशुद्धी व्हावी लागते."
१०
कली म्हणजे कर्म 

तारीख २२ डिसेंबर २००८  ध्यान 
वसंता - स्वामी, कर्माविषयी थोड अधिक सांगा नं !
स्वामी - कलियुग म्हणजे कर्मच. प्रत्येक युगाच एक वैशिष्ट्य असतं. कलियुगाचा गुणधर्म आहे कर्म. हे आपण आपल्या शरीरावर घेत आहोत. 
वसंता- स्वामी पूर्वीच्या कोणत्या अवतारानी अस केल आहे का ? त्याला काही धर्मग्रंथांचे पुरावे आहेत का?
स्वामी - नाही. पूर्वीच्या अवतारांनी दृष्टांचा संहार करून धर्मस्थापना केली. आता आपण प्रेमाचा पथ दाखवायला आलो आहोत. मुक्ती प्रदान करायची आहे, त्यामुळे कर्म सहन करणे आपल्याला भाग आहे. पंचमहाभूते दूषित झाली आहेत. तू म्हणालीस की, तू पंचमहाभूते होशील. म्हणूनच तुझ्या पंचेंद्रियांना त्रास होतो आहे. आपण कर्म घेऊन मुक्ती देत आहोत. तू प्रेम व्यक्त करतेस. तू सर्वांवर करुणेचा वर्षाव करतेस. जे तुला त्रास देतात त्यांच्यावर तू कृपावर्षाव करतेस. तू प्रत्येकावर, सर्वांवर प्रेम करतेस. हा तुझा स्वभाव आहे. हे तुझं जीवन आहे. 
ध्यानाची समाप्ती   

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा  

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम