शनिवार, २३ जुलै, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार - ८ जानेवारी 

" जे जे काही तुम्हाला भगवंतापासून दूर ठेवते ते सर्व 'माया' आहे."

जे काही तुम्हाला भगवंतापासून दूर ठेवते ते सर्व माया आहे. ही सूचना फक्त साधकांसाठी आहे. साधना सुरु केल्यानंतर सुरुवातीच्या काळात आपण असा विचार केला पाहिजे की,'ह्या जगातील सर्व काही माया आहे.' साधकानं अत्यंत जागरूक रहावयास हवं; कारण ही माया कुठच्याही क्षणी आणि कुठच्याही रूपात येऊ शकते. आपण एक उदाहरण पाहू यात.

विश्वामित्र एक महान तपस्वी होता. भगवंतानं स्वतः त्याला ‘विश्वामित्र’, म्हणजे अखिल जगताचा सखा हे नाव बहाल केलं होतं. त्याच्या तपाची शक्ती इतकी प्रचंड होती की त्याला स्वर्ग निर्माण करता आला. विश्वामित्राचं जीवन एक राजा म्हणून सुरु झालं. त्यानं सर्वत्याग करून तपश्चर्या करावयास सुरुवात केली. त्याला अनेक सिद्धी प्राप्त झाल्या. एकदा तो तप करत असताना इंद्रानं त्याचा तपोभंग करण्यासाठी मेनका नावाच्या अप्सरेला पाठवलं. अप्सरा नाचत गात आली, विश्वामित्राने डोळे उघडले. तत्क्षणी तिच्या सौन्दर्यानं आकर्षित होऊन तिच्या माया जाळात फसला. त्यांना शकुंतला नावाची मुलगी झाली. विश्वामित्राला आपली चूक उमजली; एकदाही बाळाकडे वळून न पाहता तो तप करण्यास निघून गेला. एका महान ऋषीची जर ही अवस्था होऊ शकते तर सामान्य साधकांची काय वाट? म्हणून साधकानं अतिशय दृढ असणं अत्यंत आवश्यक आहे.

आता आपण माझ्या जीवनातील उदाहरण पाहू यात. मी अगदी सर्व साधारण कौटुंबिक जीवन जगले. तरीही मी माझी कौटुंबिक कर्तव्ये करत असताना मन पूर्णपणे परमेश्वरावर केंद्रित  ठेवून तप केले. मी भगवंतासाठी अखंड अश्रू ढाळत आक्रंदन करत असे. १९९६ मध्ये स्वामी माझ्या ध्यानात आले,आणि माझ्याशी बोलू लागले. त्यांनी माझ्याकरता रुपेरी बेट निर्माण केलं. आम्ही तेथे भेटून बोलत असू. तेव्हा त्यांनी सांगितले की मी त्यांची शक्ती आहे. मी ह्याला विशेष महत्व दिलं  नाही. नंतर त्यांनी सांगितलं की मी राधा आहे, दुर्गा आहे, सरस्वती आहे, धन्वंतरी आहे आणि लक्ष्मी आहे. अशा रीतीनं त्यांनी मला अनेक पदव्या बहाल केल्या. मी त्या सर्व नाकारल्या आणि म्हणत राहिले की मला केवळ भगवान हवा आहे. मला बाकी काहीही नको होतं. माझा मंत्र होता,"माझं तुमच्यावर प्रेम आहे स्वामी. मला तुम्ही हवे आहात. " 

प्रोफेसर रुहेलानी त्यांच्या पुस्तकात ह्याचा उल्लेख केला आहे. नंतर स्वामी म्हणाले,"जसजशी तू तुझ्या तपश्चर्येचं फळ नाकारत जातेस तसतशी तुझ्या तपाची शक्ती वाढत जाते. आता तुला अवतार व्हावं लागेल." पण मी स्वामींना सांगितलं की मला हे काहीसुद्धा नकोय. तुम्ही माझी सर्व तपशक्ती परत घ्या; मला फक्त तुमच्या चरणांची धूळ होऊन रहायचं आहे. यानंतर स्वामींनी मला रिक्त केलं आणि त्यांचं सत्य माझ्यात भरलं. ह्याविषयी मी 'उपनिषदांच्या पलीकडे' ह्या माझ्या पुस्तकात लिहिलं आहे. तर ही माया केव्हा आणि कुठल्या रूपात येईल ह्याचा काही भरवसा नाही. विश्वामित्रासाठी तिनं मेनकेचं रूप धारण केलं. माझ्याकरता ह्या मायेनं 'अवतार पद' हे रूप धारण केलं. अवतार पदाचा अव्हेर न करता जर मी ते स्वीकारलं असतं आणि मी अवतार झाले असते तर मी जगाकरता काहीही करू शकले नसते; कारण मी 'साक्षी भाव' अवस्थेत गेले असते. असं झालं तर मी लोकांची कर्मं कशी बरं नाहीशी करू शकले असते? वैश्विक मुक्ती कशी देऊ शकले असते? माझ्याजवळ जे काही आहे ते सर्व सर्वांबरोबर वाटून घेण्याचा माझा स्वभाव आहे. म्हणूनच मला मिळालेली मुक्ती सुद्धा मी एकटीनं अनुभवू शकले नाही. मी स्वामींकडे वैश्विक मुक्ती मागितली. माझ्या तपश्चर्येचं फळ वैश्विक मुक्ती आहे. 

मुक्तिनीलयमला विमला आली आहे. ती मेनकेचा अंश आहे. ती सतत नाचत गात मला प्रोत्साहन देत असते. ती माझी सेवा करण्यात सर्व वेळ व्यतीत करते. ती मायेचं रूप नसून महामायेसारखी ती मला वर खेचत असते. इंद्रानं विश्वामित्राचा तपोभंग करण्यासाठी मेनकेला पाठवलं,तर सत्य साईंनी मला प्रोत्साहित करण्याकरता त्यांच्या मेनकेला (विमलाला) पाठवलं. एक माया आहे, तर दुसरी महामाया.  

२१ जून २०१६ ध्यान 

वसंता : स्वामी, माझे प्रभू! तुम्ही कधी येणार? पूर्वी तुम्ही किती चमत्कार करत होता! तुम्ही सर्वाना किती विभूती आणि किती वस्तू दिल्यात! तुम्ही आम्हाला विभूती आणि औषध का बरं देत नाही? मी आणि येथील सर्व खूप दुःख सहन करत आहोत. 

स्वामी : तू काळजी करू नकोस. मी तुला तीन वचने देतो: मी नक्की येईन, तुझी काया बदलेल, आणि सर्व बरे होतील. नक्की, नक्की, नक्की. 

वसंता : ठीक आहे स्वामी, तुम्ही केव्हा येणार? 

स्वामी : मी येईन. 

 (स्वामी सोफावर बसतात, मी जमिनीवर बसते. त्यांच्या मांडीवर डोकं ठेऊन मी रडते ...) 

वसंता : मला तुम्ही हवे आहात, फक्त तुम्ही हवे आहात. 

(ज्ञानराम धावत येतो. स्वामी म्हणतात "तुझ्या आईला एक गोष्ट सांग... तो उत्तरतो, नाही, बाबा तुम्ही तिला सांगा. मी तुमच्या मांडीवर पडणार. राजा म्हणतो ठीकाय, मी सांगतो.) "  

स्वामी : द्वापार युगात एकदा कृष्ण आणि गोपी चांदण्यात खेळत होते. सर्वजण यमुना नदीच्या तीरावर बसले. कृष्णानं त्यांना नदीत पूर्ण चंद्राचं प्रतिबिंब दाखवलं. सर्वाना आनंद झाला. एक गोपी उद्गारली ,"चंद्रात एक चेहरा दिसतोय!" कृष्ण उत्तरला ,"होय,तो राधाचा चेहरा आहे." राधा म्हणाली,"हा माझा चेहरा नाहीये." सर्व गोपिका एका सुरात म्हणाल्या,"हो,हा राधाचा चेहरा नाही आहे." कृष्ण म्हणाला,"ती राधाच आहे. तिचा कलियुगातील चेहरा आहे हा." हे ऐकल्यावर सर्व गोपिका एकदम म्हणाल्या,"त्यावेळेस आम्ही पण येणार." कृष्णानं सांगितलं,"तुम्ही सर्व जणी येऊ शकत नाही. थोड्या जणी याला. आम्ही जेव्हा सत्य युगात परत येऊ तेव्हा सर्व गोपी येतील."

वसंता : हे काय स्वामी? आता कोण कोण गोपी आल्या आहेत? 

स्वामी : आता फक्त गोप आले आहेत. आपण पुन्हा येऊ तेव्हा सर्व गोपी आपल्या नातलग होऊन येतील. 

वसंता : मला समजलं स्वामी. S.V. नी विचारलंय की ह्या दुर्गेचं नाव काय ठेवायचं? आधी ती वनदुर्गा होती. 

स्वामी : ती वसंत दुर्गा आहे. तू सर्वाना अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेत आहेस. तुझा जन्म अमावास्येला झाला, आता ह्या दुर्गेच्या रूपात तुझा जन्म पौर्णिमेला होतो. 

ध्यान समाप्त.

आता आपण पाहू यात. मुक्ती निलयम मध्ये सर्व आजारी असल्यामुळे मी स्वामींकडे सर्वांसाठी औषध मागितले. स्वामींनी इतरांसाठी केवढं काय काय साक्षात केलं! त्यांनी आमच्याकरता काहीच का नाही केलं? मी स्वामींकडे असं सांगत रडले तेव्हा त्यांनी मला तीन वचनं दिली, "मी नक्की येईन,तुझी काया बदलेल, आणि सर्व बरे होतील." 

भगवान सर्वाना विभूती देतात,पण मला वचन देतात. स्वामी सत्य स्वरूप आहेत. त्यांचं नाव सत्य साई आहे. त्यांनी दिलेली तीन वचनं अशी आहेत,' ते येतील, तेव्हा माझी काया परिवर्तित होईल आणि सर्व व्याधीमुक्त होतील. हेच सत्य युग आहे. कली युगाचं परिवर्तन.  

मला फक्त स्वामी हवेत असं म्हणून मी अश्रू ढाळत असताना ज्ञानराम आला. तेव्हा स्वामींनी द्वापार युगातील एक गोष्ट सांगितली. त्यावेळी कृष्ण आणि गोपिका चांदण्यारात्री लपाछपीचा खेळ खेळत होते. थोड्या वेळानं ते यमुनेच्या तीरावर बसले. कृष्णानं चंद्राच्या पाण्यातील प्रतिबिंबिकडे निर्देश केला. सर्वानी नदीतील पाण्यात चेहरा प्रतिबिंबित झालेला पहिला. तेव्हा कृष्णानं सांगितलं की तो राधाचा चेहरा होता. राधासहित सर्व गोपिका उद्गारल्या की तो चेहरा राधेचा नाहीये. तेव्हा कृष्णानं स्पष्टीकरण दिलं की, जेव्हा राधा कलियुगात परत येईल तेव्हा हा तिचा चेहरा असेल. कृष्णानं माझ्या जीवनात हे सिद्ध केलं. अगदी बाळ वयापासून मी कृष्णावर भक्तीचा वर्षाव केला. अनेक वर्षांनंतर 'त्यानं' मला ध्यानात सांगितलं,"मी सत्य साई म्हणून पुट्टपर्थीमध्ये जन्मलो आहे." तदनंतर माझी भक्ती पूर्णतः स्वामींकडे वळली. ध्यानात स्वामी माझ्याशी बोलू लागले.  त्यांनी मला सांगितलं "तू राधा आहेस." कृष्णानं ध्यानात सांगितलं की, "मी सत्य साई आहे." आणि सत्य साईंनी ध्यानात सांगितलं की,"तू राधा आहेस." ह्यावरून आपल्याला दिसून येईल की स्वामींचं अवतार कार्य  द्वापार युगातच सुरु झालं.  

स्वामींनी हे सांगितल्यानंतर, स्वामींच्या वर्धापन दिनकरता आम्ही  सेवादलमधून पुट्टपर्तीला गेलो. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर स्वामींनी सर्वाना पादनमस्कार दिला. तेव्हा मी स्वामींना एक पत्र लिहिलं होतं आणि त्यावर 'तुमची राधा' अशी सही केली होती. स्वामींनी माझ्या हातातून पत्र घेतलं.स्वामींनी माझ्या हातून घेतलेलं  हे माझं पहिलं आणि शेवटचं पत्र आहे. बाकीचे सर्व अध्याय,पत्र आणि पुस्तकं दूतांतर्फे दिली गेली.  

द्वापार युगात एडी आणि फ्रेड गोप होते. दोघेही कृष्णाचे मित्र होते. येऊ घातलेल्या प्रेमसाई अवताराच्या काळात सर्व गोपिका आमच्या नातलग होतील. प्रेमसाई अवतारावर मी पाच खंड लिहिले आहेत. आणि हे नवीन रहस्य स्वामींनी आता उलगडलं. 

काल S.V. नी मला विचारलं, "आपण आत्ता प्रतिष्ठापना केलेल्या दुर्गेचं नाव काय,अम्मा? आपण आधी तिला वनदुर्गा म्हणत होतो." २००९ मध्ये आगम शास्त्रांना अनुसरून आम्ही ह्या दुर्गेची प्रतिष्ठापना केली. प्रथम आम्ही स्वामींच्या पादुका जेथे होत्या त्या देवळात तिला स्थापित केलं होतं. नंतर आश्रमाच्या दक्षिण दिशेला नवीन देऊळ बांधलं आणि ह्या दुर्गेला तिथे पुनः प्रतिष्ठापित केलं गेलं. स्वामी म्हणाले की आता तिचं नाव 'वसंत दुर्गा' आहे. जेव्हा मी स्वामींना विचारलं की आम्ही तिची प्रतिष्ठापना पौर्णिमेला करू शकतो का तर, स्वामींनी सांगितले,"तू अमावस्येला जन्म घेतलेला पूर्ण चंद्र आहेस.तू 'वसंत दुर्गा' सर्वाना अज्ञानाच्या अंध:कारातून ज्ञानाच्या उजेडाकडे नेण्याकरता जन्मली आहेस." स्वामींनी ह्या दुर्गेचं नाव 'वसंत दुर्गा' आहे हे आत्ता उघड केलं.  

मध्यान ध्यान 

वसंता : स्वामी, माझं नाव उपयोगात आणू नये, मला ते आवडणार नाही. 

स्वामी : तुला हवं की नको हा प्रश्नच नाहीये. फक्त तूच सर्वांचा कर्मसंहार करतेस. म्हणून तू दुर्गा आहेस. 

ध्यान समाप्त 

परमेश्वर अवस्थेसह सर्वकाही मी दूर ढकलले. 'केवळ परमेश्वर हवा' ह्या एकाच इच्छेनं झपाटून मी सर्व काही दूर लोटले. ह्या माझ्या दूर ढकलण्यामुळे माया महामायेत बदलते आणि वनदुर्गा वसंत दुर्गा होते. 

ह्याचा पुरावा स्वामींनी मला केळ्यात दाखवला. केळीच्या सालीवर राधा आणि कृष्ण अगदी स्पष्ट दिसले.


जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा