ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रत्येक जीवाच्या भावविश्वद्वारे परमेश्वराचे स्वरूप निर्माण होते. "
१०
कली म्हणजे कर्म
आता स्त्रिया नोकरी करतात, तिथे त्या पुरुषांमध्ये निःसंकोच वावरतात. मुलांच्या पुढे चुकीचा आदर्श ठेला जातो व त्यामुळे त्यांचे चारित्र्य बिघडू शकते.
पुरुषाचा धर्म कोणता? समाजाची आणि देशाची सेवा हाच पुरुष धर्म. आज पुरुष हलक्या दर्जाच्या करमणुकीत त्यांचा वेळ वाया घालवतात. ते त्यांची कर्तव्ये योग्यरितीने पार पाडत नाहीत.
शिक्षक त्यांची कर्तव्ये अचूकपणे पार पाडत नाहीत, त्यामुळे ते विद्यार्थ्यांचे योग्य आदर्श नाहीत. पुरातन काळात गुरुकुल पद्धतीत शिक्षक विद्यार्थ्यांकडून काही मोबदला घेत नसत. आता शिक्षण हे बाजारातील विकाऊ वस्तू झाली आहे ! हा पैसे कमवण्याचा धंदा झाला आहे.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा