गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" केवळ त्याग मार्गाद्वारे परमशांती प्राप्त होते."
मन आणि विषय

           काही दिवस त्याच मन शांत होत. आता परत सुरुवात झाली. ते पुन्हा काहीतरी बोलायला लागल. तो विचार करतो,
           ' माझ आधीचं जीवनच अधिक चांगल होत. कशाला मी इथे आलो? मी माझ्या कुटुंबाबरोबर असतो, तर अधिक सुखी असतो. मी नातवंडांबरोबर खेळलो असतो....पण इथे भगवंताबरोबर असूनही शांती नाही. सर्वजण माझे दोष बघतात. परमेश्वरासोबतही मी सतत ह्या भितीत जगतोय की कदाचित मला ते इथून जायला सांगतील. '   

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
         " अमरत्व केवळ त्यागाद्वारे प्राप्त होते. जेव्हा आपण परमेश्वरासाठी आपल्या भौतिक जीवनाचा त्याग करतो तेव्हा आपल्या कर्मांच्या परिणामाचा नाश होत. " 
मन आणि विषय 

        नंतर ... 
        ... " काल स्वामी आले आणि माझ्या शेजारच्या माणसाशी बोलले. ते माझ्याशी का बोलले नाहीत ? तो माझ्यानंतर सेवा करायला आला, म्हणजे तो सेवेत माझ्यापेक्षा कनिष्ठ आहे. स्वामी जवळ आले तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहिलेसुद्धा नाही.... तो अधिकारी माझ्याशी कठोरपणे का बोलला ? तो इतका मोठा आहे का ? मी पण त्याच्यासारखीच सेवा करतो आहे. त्याला व्हि. आय. पी. जागा का बरं ? आज सकाळी स्वामींनी त्याला बोलवल आणि त्याच्याशी कठोरपणे बोलले. तो स्वामींच्या खूप जवळ असतो, याचा त्याला खूप गर्व झालाय.... म्हणूनच आज स्वामी त्याचाशी असं बोलले ..... मी जर त्याजागी असेन तर मी खूप विचार करून वागेन !"

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम  

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" केवळ त्यागमार्गाद्वारे परमशांती प्राप्त होते. " 
मन आणि विषय 

           आता त्याला नाव, रूप, स्थळ, वेळ आणि कार्याविषयी कळले, म्हणून तो आनंदी आहे. त्याला वाटते, ' हे भौतिक जीवन पुरे झाले, मी परमेश्वराजवळ जातो. ' तो त्याचा मुलगा, मुलगी यांच्याविषयीची कर्तव्ये पार पडतो आणि पत्नीसह पुट्टपर्तीला जाऊन राहतो. तिथे तो त्याची पदवी आणि त्याचे नोकरीतील उच्च अधिकारपद याविषयी सांगतो. खूप अडचणींनंतर शेवटी त्याला प्रशांती निलयममध्ये आता काम मिळते. तो सेवा सुरु करतो. त्याला आत खोलीसुद्धा मिळते. तो सर्वांना सांगतो, " मी परमेश्वरासोबत राहतो आणि त्यांची सेवा करतो ." हे तो सर्वांना अभिमानाने सांगतो. तो स्वतःशी विचार करतो, 
           " मी अगदी योग्य जागी आहे. भौतिक जगतातील लोक इतके का बरे दुःखी आहेत ? मी जगाच्या सर्व दुःखांपासून मुक्त आहे. मी परमेश्वराजवळ आलो आहे. हुश्श!! आता मी आरामात राहू शकतो. 
           ... माझी सांसारिक दुःख आता संपली. मला सकाळी आणि संध्याकाळी स्वामींचं दर्शन होत. दिवसभर मी साईराम, साईरामाचा जप करीत, त्यांच्या विचारात मग्न होऊन स्वामींची सेवा करतो. केवढी शांती !" 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग करा आणि पाहा त्यातून तुम्हाला केवढा आनंद मिळतो. "
मन आणि विषय 

           उदाहरणार्थ, एक माणूस आहे. तो भौतिक जीवनाला कंटाळला आहे आणि आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी धडपड करतो आहे. एक दिवस त्याला एक मित्र भेटतो. तो त्याला सांगतो, " तुला माहीत आहे का परमेश्वर पृथ्वीवर अवतरला आहे ? त्याने जन्म घेतला आहे !"
" परमेश्वर ... इथे ? हे कस शक्य आहे ?"
" होय ! तो इथे आहे. मी त्याला पाहिले आहे."
" कुठे ? कुठेशी बरं ?"
" ते आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती गावात आहेत. "
" त्यांच नाव काय ? ते कसे दिसतात ?"
" त्यांच नाव आहे श्री सत्यसाईबाबा. ते भगवी कफनी घालतात आणि त्यांच्या डोक्यावर केसांचा मुकुट आहे."
" मी त्यांना पाहू शकतो का ?"
" होय, ते सकाळी आणि संध्याकाळी दर्शन देतात. "
" ते काय करतात ?"
" ते बरेच चमत्कार करतात, प्रश्न सोडवतात आणि पीडितांना दिलासा देतात."
त्या माणसाला आता मित्राकडून परमेश्वराची सर्व माहिती मिळाली. 
नाव - सत्यसाईबाबा 
रूप - भगवी कफनी, कुरळे केस. 
स्थळ - पुट्टपर्ती, आंध्र प्रदेश 
वेळ - परमेश्वराचे दर्शन - सकाळी आणि संध्याकाळी 
कार्य - परमेश्वर काय करतात - अनेक चमत्कार करतात, सर्व प्रश्न सोडवतात आणि रोगमुक्त करतात.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम 

गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
    " प्रेमाद्वारे त्यागाची जोपासना होते. त्यागाद्वारे प्रेम फोफावते. "
मन आणि विषय 

         म्हणूनच मनाला विचारांचे गाठोडे म्हटले आहे. जेव्हा एक शब्द त्याला स्पर्श करतो, त्यातून विचारांचा अखंड प्रवाह चालू होतो, मग त्या विचारांशी संबंधित नावे आणि रूपे मनात उभी राहतात. आपल्याला ती जागा, ती वेळ आठवते... सर्व अगदी डोळ्यासमोर उभं राहत. अशाप्रकारे मन आणि विषय एकमेकांशी संबंधित आहेत. मन आणि विषय अतूट आहेत. जर 'मी' नसेल तर विषयही नसेल. सामान्य माणसाचे जीवन 'मी' वर केंद्रित असते, जिथे तर आणि विषय अलग करणे शक्य नाही. 
           हे दोन्ही वेगळे कसे करता येतील ? मनाला अध्यात्माकडे वळवले तरच हे शक्य आहे.
   
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम 

सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

कृष्ण जन्माष्टमी संदेश


स्वामींनी २००३ मध्ये कृष्णजन्माष्टमीला दिलेला संदेश 
कृष्णाचा जन्म बंदीगृहामध्ये झाला. कंसाच्या हुकुमानुसार बंदिगृहाच्या सर्व रक्षकांना अत्यंत दक्ष राहण्याच्या सूचना  दिल्या गेल्या असूनही त्यांना निद्रेने घेरले. कृष्णाच्या जन्मवेळी फक्त वसुदेव आणि देवकी जागृत होते. दृष्ट कंसाकडून नवजात बालकास असणाऱ्या धोक्याच्या भीतीने वसुदेवाने बालकास सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे ठरवले. त्याने हळुवारपणे बालकास कपड्यांमध्ये गुंडाळले आणि एका टोपलीमध्ये ठेवून, ती टोपली डोक्यावर धरून तो बंदीगृहाच्या बाहेर आला. बंदीवासाचे सर्व दरवाजे आपोआप उघडले. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. वसुदेवाने बालकाच्या रक्षणासाठी प्रार्थना केली. कृष्णाच्या दैवी संकल्पाने एक विशाल सर्प तेथे प्रकट झाला व वासुदेवाच्या मागोमाग जाऊन, मुसळधार पावसापासून बालकाचे रक्षण करण्यासाठी त्याच्या मस्तकावर आपला फणा धरला. वसुदेव, यमुनेच्या पलीकडच्या तीरावर असलेल्या यशोदेच्या घरी पोहोचला. तिने नुकताच एका बालीकेला जन्म दिला होता. तिच्या पतीसह सर्वजण गाढ निद्रेत होते. वसुदेवाने हळुच दिव्य बालकास, कृष्णास यशोदेच्या बाजूला ठेवले आणि तिच्या नवजात बालिकेस उचलून तो त्वरेने बंदीगृहात परतला.
 
*    *    *

परमेश्वराचे मार्ग कोणीही जाणू शकत नाही. वसुदेवालाही, तो काय करतोय ह्याचे पूर्ण आकलन नव्हते. त्याने कृष्णाला यशोदेच्या घरी नेले व बालीकेस त्याच्या बरोबर घेऊन आला. त्याने हे कार्य जणु काही तंद्रीत केल्यासारखे केले. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या Beyond the Upanishadas ह्या पुस्तकातून. 


जय साईराम    

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

    " आपल्या भक्तिची गुणवत्ता म्हणजे आपल्या मनोदशेचे थेट प्रतिबिंबच होय." 

३ 

मन आणि विषय 

          मानाच कार्य कस चालत ? आपण एक उदाहरण पाहूया. काल मी जेव्हा ' मन आणि विषय ' याविषयी बोलत होते, मी कान्हांना म्हटले, ' माझ्यासाठी एका शब्दाचा उच्चार करा. ' शब्द होता ' ट्रान्सेन्डेंटल ' त्यांनी तो शब्द उच्चारला आणि मी म्हटले, " काय म्हणालात ... डेंटल ... डेंटल ?" मी 'डेंटल' म्हटल्याबरोबर निर्मलानी त्यांचा दात दाखवून म्हटले, " काल माझा दात दुखत होता. " मग सर्वजण आपआपल्या दातांविषयी बोलायला लागले. कान्हा म्हणाले, " डॉ लंबोदरन हे आपले डेंटिस्ट आहेत. " मी म्हणाले, " त्यांचे वडीलही डेंटिस्ट आहेत."
          याप्रमाणे, डेंटिस्ट आणि दात यावर जणूकाही न संपणार संभाषण सुरु झाले. एका शब्दापासून आमच्या सर्वांच्या मनानी अनेक विचार निर्माण केले. त्यांना आपली दातदुखी आठवली. 'मी कोणत्या डॉक्टरकडे गेले होते, मी काय औषध घेतले, कोणत्या दिवशी ही घटना घडली, कोणत्या वर्षी '. सर्वांनी त्यांच्या जीवनात घडलेल्या अनेक गोष्टींना उजाळा द्यायला सुरुवात केली.        

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम