मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१३

              

                      गोकुळाष्टमी विशेष

       श्री वसंतासाई लहानपणापासूनच निःस्सीम कृष्णभक्त ! त्या जशा मोठया होऊ लागल्या तशा त्यांच्या कृष्णप्रेमाच्या ठिणगीचे वडवानलात रुपांतर झाले. श्री सत्यसाई बाबा हे भगवान श्री कृष्णाचा पुनःअवतार आहेत . श्री वसंतासाई ३५ वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर भगवंताच्या  कृपेस पात्र झाल्या . भगवान श्री कृष्णाने त्यांना ध्यानात सांगितले , "पुट्टपर्तीचा सत्यसाई बाबा मीच आहे ". आणि त्या दिवसापासून त्या साई भक्त झाल्या.कृष्णाची राधा आणि साईची वसंता एकच .                                                                                                                                          शुद्ध अंतःकरण हे आरशासारखे स्वच्छ असते . परमेश्वर हा नितळ आरसा आहे . राधा ही  कृष्णाची प्रतिमा आहे राधा म्हणजे त्याच्या दिव्यानंदाचे फलित आणि  दिव्यानंदाच्या परमोच्च शिखराने धारण केलेले रूप . राधा ही  कृष्णाची दिव्य ऊर्जाशक्ती आहे. आणि म्हणूनच ते अविभाज्य आहेत .                                                                                                                                कृष्णानी हाक मारल्या , "राधा , राधा !" राधेनी विचार केला , एखादया अनमोल रत्नासारखी माझी भक्ती त्यांच्या कमलचरणी अर्पण करण्याची हीच ती मंगल घटिका , शिवाय मी धरा म्हणजेच प्रकृती आहे . तिला राधा म्हणतात म्हणून सत्व रज तम या त्रिगुणांची जबाबदारी  मी घेते . प्रकृती ही स्त्री असल्यामुळे मी ही नारी आहे . 

        या संदर्भात भगवान बाबांनी म्हटले आहे . 

                 " प्रकृती स्त्री असल्यामुळे  राधा ही  स्त्री आहे . सनातन धर्मानुसार आदर्श स्त्री मध्ये असणारे सर्व गुण तिच्या ठायी आहेत . ती सर्वगुण संपन्न आहे . उदात्त , निष्कलंक भक्ती करून तिने आपले सर्व विचार भगवंताच्या कमलचरणी ठेवले आहेत . तिने आपला प्रत्येक विचार कृष्णाकडे वळवून त्याच्याशीच जोडला . त्यामुळे ती उन्मनी अवस्थेप्रत पोहोचून तिचा कृष्णाशी योग झाला . वेदांमध्ये यालाच मधुरभक्ती म्हटले आहे . भक्तीचे वेगवेगळे सहा प्रकार आहे  . शांत , सख्य , दास्य , वात्सल्य , अनुराग आणि मधुर हे परमेश्वर प्राप्तीचे सहा मार्ग आहेत ".

                   "मधुरभक्ती सर्वश्रेष्ठ आहे . ती परमानंद देते . दुधाचे दह्यामध्ये रुपांतर होते . दही घुसळून लोणी मिळते , लोणी कढवल्यावर त्याचे तूप बनते . ही अंतिम अवस्था आहे . मधुर भक्ती , परमेश्वराशी एक रूप होण्याच्या अंतिम अवस्थेची अनुभूती देते . ध्येयाप्रत पोहोचल्यानंतर आपला प्रवास थांबतो . पावलांची चाल थांबते . एकदा का तुम्ही मधुर भक्ती द्वारे ही अनुभूती घेतलीत की  काहीही मिळवण्याचे किंवा करण्याचे शिल्लक राहत नाही . मधुर भक्ती करून परमेश्वराला प्राप्त करून घेतल्या नंतर परमेश्वराचे प्रेम व मनोवस्था याची पूर्णत्वाने अनुभूती होते ". 


                  "मधुर भक्तीचे फळ मिळाल्या नंतर त्याचे बाहेरील कडू साल काढून टाका . ' मी आणि माझे ' हेच ते साल . त्यानंतर इच्छा , वासनांच्या बिया काढून टाका आणि प्रेमाचे ते मधुर फळ परमेश्वराला अर्पण करा. राधेने म्हटले आहे की , तिच्या मध्येही क्रोध होता , इच्छा होत्या . तिला त्याची कधीही बाधा झाली नाही . ती म्हणाली की तिने पंचतत्वे  आणि पंचेंद्रिये एखादया हाराप्रमाणे  गळ्यात घातली होती . तिला असे म्हणायचे आहे की तिचे पावित्र्य या सर्वांपासून अबाधित राहिले . परमेश्वर जाणतो की  तिने आपले सर्वस्व पूर्णपणे त्याच्या चरणी अर्पण केले होते . ती स्वतःच साक्षात मधुर भक्ती आहे तिचे प्रेम निर्मळ , निष्कलंक , परमशुद्ध आणि परमपवित्र आहे . ते परमेश्वराला ज्ञात आहे ". 


             "परमेश्वराने घोषित केले की राधेची भक्ती पूर्णत्वाला पोहोचली होती . परिपूर्ण होती ".  

संदर्भग्रंथ :- इथेच ! या क्षणी !! मुक्ती !!! भाग २  
  

सोमवार, २६ ऑगस्ट, २०१३

                                   विश्व  प्रसा
         
            द्वापारयुगातील एक रात्र , पौर्णिमेच शितल चांदण , गडद आकाशात  चमकणारा  चंद्र !चांदण्याच्या मृदुल लहरी , धरती पावन करीत , अवघे वृंदावन त्याच्या अमृतमयी शांत किरणांनी न्हाऊ घालत आहे . ह्या अमृतमयी सोमरस पानाने सर्वांना गुंगी आली , ते निद्राधीन झाले . 
            अनिल सुस्वर  घेऊन आला . तो मनमोहक सुस्वर ऐकताक्षणी , राधेचे हृदय आनंदाने नाचले . ही तर मनभावन कृष्णाची मधुर हांक !राधा त्या स्वराच्या दिशेने धावली , तिचे मन तिच्याशी स्पर्धा करत कितीतरी पुढे धावल ! ती कृष्णाजवळ येऊन त्याच्या चरणकमलानपाशी बसली , हलकेच ती त्या स्वरांच्या माधु-यात विरघळली . केवळ हृदय नव्हे , तर तिच अवघ शरीरही विरघळू लागले . तिचे हृदय , आत्मा , शरीर , भावविश्व , इंद्रिये ; तिचे अस्तित्वच त्याच्या दिव्य चरणी विरघळले . राधा कुठे आहे ? ज्या रुपाला राधा या नावाने हाकारले  जात  होते , तो देह कुठे आहे ?तो देह कृष्णाच्या चरणी विरघळून नाहीसा झाला . 

            झाडाखाली बसून बासरीचे मधुर स्वर वाजवणारा , ज्याला कृष्ण म्हणून हाकारत , त्याचे रूपही विरघळू लागले . राधेचा प्रेमरस , तिचे सारच कृष्णाच्या दिव्यचरणी वाहिले व त्याचे पुष्पसम मृदू चरण विरघळू लागले . त्याचा देहही विरघळला . 
                    काय चमत्कार !         सूर थांबले ?
                    वादळ कुठे ?               श्रोता कुठे ?
                    कुठेच नाही ?               ते कुठेच सापडणार नाहीत !
                    दोन रूपे विरघळली , फक्त भाव उरले . 
                    केवळ सत्य व प्रेम उरले . 
                    ना नावे  ना रूपे            न राधा न कृष्ण 
                    मात्र एक झालेले दोन भाव . 
             फक्त नारदमुनी याचे साक्षी होते . या दिव्य संगमामुळे प्रचंड उर्जा निर्माण झाली . सत्य व प्रेम यांचा संयोग झाला . यामुळे निर्माण झालेल्या लहरी प्रकाश उर्जेत परिवर्तित झाल्या . दोन ढग धडकले की  वीज चमकते . गडगडाट होतो . नंतर पाऊस  वर्षतो . अवघ्या जगतास त्याचा उपयोग होतो . 
                  तथापि कृष्णवर्णी  कृष्ण मेघ , व गुलाबी राधा मेघ जेव्हा स्पर्शले , तेव्हा ध्वनी झाला नाही . ते निस्तब्ध झाले . आनंद नशेत मश्गुल झाले. मिलनाच्या आनंदात सर्व  काही अंतर्धान पावले . लहरींमधून प्रकाश उभरला . तो या भावसंगमाचा साक्षी म्हणून राधेच्या देहात प्रवेशला . हा राधाकृष्णाचा गांधर्व  विवाह,  केवळ नारदमुनी या घटनेला साक्षी होते . 
           राधाकृष्णांनी पुन्हा त्यांचे नाव , रूप धारण केले . राधेचे चैतन्य पुनर्प्रस्थापित झाले आणि तिने कृष्णाच्या चरणांवरील  नजर हलकेच वर करून त्याच्या मुखकमलावर स्थिर केली . कृष्णाच्या मुखावर मंद स्मित होते . हे भावमिलन म्हणजेच गांधर्व  विवाह . अशाप्रकारे राधाकृष्णाचा गांधर्व विवाह नारदमुनींच्या साक्षीने झाला . त्यावेळी निर्माण झालेला तेजोगोल संयोगाचा पुरावा म्हणून राधाच्या उदरी राहिला .  
            द्वापारयुगात घडलेल्या या घटनेची कलियुगात पुनरावृत्ती झाली !

संदर्भग्रंथ :- उपनिषदांपलीकडे 

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१३

ओम श्री साईराम

                              ओम श्री साईराम                               
                                      मंत्राचे माहात्म्य 
  
                     "ओम  श्री  साई  वसंतसाईसाय  नमः "
         "हा मंत्र म्हणजे  स्वामींच्या  आणि  माझ्यामध्ये असलेल्या बंधाच्या सत्यतेचा ठोस पुरावा आहे. मी त्यांची चित्तशक्ती असल्याचे  हा मंत्र दर्शवतो. माझा जन्म  त्यांच्या मधून झालेला असून माझा पुन्हा योग  होणार आहे. या मंत्राच्या सामर्थ्याने जगातील  कर्मांचा  नाश होईल आणि वैश्विक  मुक्ती मिळेल ". 
         २३ मे  १९९८ रोजी  मी परमकुडीमध्ये  असतांना लंडनच्या एक भक्त  निर्मला  यांनी  मला फोन केला . त्या म्हणाल्या, " अम्मा, प्लीज मला एक मंत्र सांगा  ना. दिवसेंदिवस येथील परिस्थिती  कठीण होत चालली  आहे". मी म्हणाले, " मला माहित नाही. मी स्वामींना विचारेन ". दुपारच्या ध्यानात  मी स्वामींकडे प्रार्थना केली. ध्यानानंतर  आम्हाला एका कागदाच्या  तुकडयावर "ओम श्री साई वसंतसाईसाय  नमः " हा मंत्र लिहिलेला दिसला. 
                     मला धक्काच बसला आणि  भीतीही  वाटली. मी आक्रोश करू लागले, स्वामींनी माझे नाव का बर घातले ?
        नंतर ध्यानामध्ये स्वामींनी सांगितले की  सर्वजण या मंत्राचे उच्चारण करू शकतात. व्याधीग्रस्त लोकांना हा मंत्र सहाय्यभूत ठरेल. मी विभूतीवर तो मंत्र लिहून ती विभूती अनेक व्याधीग्रस्त व्यक्तींना पाठवली. तेव्हा पासून आजपर्यंत मंत्र, प्रार्थना आणि विभूती ह्यांच्या सहाय्याने अनेक समस्यांचे निराकरण झाले आहे. स्वामी म्हणाले, " आध्यात्मिक मार्गावर प्रगती करित असतांना   शांतीची अनुभूती घेण्यास  हा मंत्र सहाय्यभूत होतो.  हा मुक्ती मंत्र आहे. देह, मन आणि आत्मा यांच्या त्रिविध  तापांवर हा रामबाण  उपाय आहे "
३० डिसेंबर २००३ ध्यान 
वसंता - स्वामी, "ओम श्री साई  वसंतसाईसाय नमः " हा मंत्र कसा काय  आला ? 
स्वामी - तुझ्या प्रेमामुळेच तुझे नाव परमेश्वराशी जोडले  गेले. तुझ्या अनिर्बंध प्रेम वर्षावाने परमेश्वराचे नाव तुझ्याशी जोडले गेले. 
वसंता - स्वामी, या मंत्राचे उच्चारण करित असलेल्या व्यक्तिंना  कोणता लाभ होईल ? 
स्वामी - अनेक रोग या मंत्राने बरे झाले आहेत, हे कस घडल?  वृंदावन मध्ये सर्वजण ' राधे राधे ' नावाचा जप करत असल्यामुळे तिच्यासारखेच होऊन जातात. त्याच प्रमाणे वसंतसाई  नावाचा जप करणारे तुझ्यासारखे प्रेमस्वरूप होतील. 
ध्यान  समाप्ती . 
राधा कृष्ण प्रेमाचे सामर्थ्य 
१४ सप्टेम्बर २००८ 
वसंता - स्वामी, प्लिज मला या मंत्रा  विषयी सांगा. 
स्वामी - हा मंत्र म्हणजे राधाकृष्ण मंत्र ,शिव शक्ती मंत्र, पुरुष प्रकृती मंत्र आणि सृष्टी मंत्र आहे. तेथे केवळ "ओम श्री साई  वसंतसाईसाय नमः " हा एकच मंत्र असेल  ना तेथे राधाकृष्ण मंत्र असेल ना  प्रेमाराजा मंत्र ! तुझे अश्रू आणि तुझी तळमळ ह्यातून या मंत्राची निर्मिती झाली आहे.  केवळ  नवनिर्मिती करण्यासाठी आपण येथे अवतरलो आहोत.
ध्यान समाप्ती. 
          लहानपणापासून मला कृष्णाशी लग्न करण्याची इच्छा  होती. या इच्छेने वैश्विक रूप धारण केले आणि सत्ययुगाची निर्मिती झाली. ह्यातून नवनिर्मितीसाठी पुरुष प्रकृती तत्व बनले. येथे प्रत्येकात आणि प्रत्येक गोष्टीत सत्य आणि प्रेम प्रवेश करेल. हे वसंतमयम  आहे. हा या मंत्राचा पाया आहे. म्हणून स्वामींनी याला ' सत्ययुगाचा मंत्र ' संबोधले आहे. 

              स्वामी म्हणाले हा पंचदशाक्षरी मंत्र आहे. तुम्ही परमेश्वराची एवढी उत्कट भक्ती  केलीत तर तुमचे नाव त्याच्याशी जोडले जाते. स्वामींसाठी  होणारी माझ्या आत्म्याची तळमळ दर्शवणारे हे परिमाण आहे. ते पाहिल्यानंतरच तुम्ही माझा स्वभाव जाणू शकाल. जेव्हा एखादयाचे नाव मंत्र बनून जाते. त्यामध्ये  देह, मन आणि आत्मा यांचे त्रिविध ताप नष्ट करण्याचे सामर्थ्य आहे.  

         



गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

श्री वसंतसाई , एक स्वातंत्र्यवीरांगना


 वैश्विक करार ( मानवाचे विश्वरूप ) प्रेमसाई भाग ४


              भारतीयांनी इंग्रजांबरोबर लढा दिला. मी दररोज अवतरित परमेश्वराशी लढा देत आहे. सत्ययुगाचे आगमन व प्रेम अवताराचे अवतरण या दोन गोष्टींसाठी काही अटींवर चर्चा करत, अखेरीस गांधी व आयर्विन कराराप्रमाणेच मी व स्वामींनी एका करारावर सह्या केल्या. मी म्हटले की प्रेमसाईनच्या अवतारकाळात जर मी ही येण भाग असेल तर वैश्विक कर्मसंहार होऊन, सर्वांना मुक्ती मिळायला हवी. आम्ही आमच्या देहांवर सर्व कर्मे घेऊ, ह्या करारावर आम्ही सह्या केल्या. माझे व त्यांचे ( परमेश्वराचे / स्वामींचे ) भाव व्यक्त व्हावेत म्हणून स्तूप बांधावा ही त्यांची इच्छा. 
              मी स्वामींचे भाव खेचून आणत माझ्या भावविश्वाशी संगमित करेन. हे स्तुपाकडे जातील व तिथून अवघ्या विश्वात प्रसूत होतील. हा आमचा करार आहे. आम्ही ( मी व स्वामींनी ) स्तुपाचा पहिला दगड ज्या दिवशी आला त्या रात्री अवकाशात करारपत्रावर सह्या केल्या. स्वामींनी एस.एस.एस. व मी एस.व्ही अशा सह्या केल्या. आकाश आमचे करारपत्रक आहे. आम्हा दोघांपैकी कोणीही या कराराचा अनादर करू शकत नाही.    
            या करारास सृष्टी साक्षी आहे. हे विश्व आणि पंचमहाभूते साक्षी आहेत.  
            परतंत्र राष्ट्रामधून स्वातंत्र्यतृष्णा जन्मली. ही मुलगी ( श्री वसंतसाई ) अखिल मानवतेला स्वतंत्र करण्याच्या तृष्णेने स्वातंत्र्यवीरापासून जन्मली. ती एकटी परमेश्वराशी लढा देत स्वातंत्र्य मिळवेल, सर्वांना मुक्ती.

* भारतीय स्वातंत्र्य संग्राम

१. भारत छोडो ( चाले जाव इंग्रज ) 
२. गांधीजींचे उपवास 
३. मिठाचा सत्याग्रह 
४. असहकार चळवळ, जगाशी असहकार
५. तुरुंगवास 
६. नौखाली यात्रा 
७. हिंदू मुस्लीम तंटे 
८. परदेशीवर बहिष्कार 
९. जालियनवाला बाग , कत्तल 
१०. अस्पृश्यतेविरुद्ध चळवळ 
११. स्त्रीला वेदाभ्यासाचा अधिकार नव्हता 
१२. भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढा 
१३. गांधी व आयर्विन करार 
१४. भेद व राज्यकर हे तत्व
१५. राजेशाही थाट
१६. स्त्रीची दास्यातून मुक्तता 
१७. राऊंड  टेबल कॉन्फरन्स 
१८. सहभोजन 
१९. ग्रामसभा 
२०. पदव्या नाकारणे 
२१. ऑगस्ट क्रांती 
२२. सत्याचे शोध

* वैश्विक स्वातंत्र्यासाठी ( मुक्तीसाठी ) संग्राम 

१. भारतात सुस्वागतम् 
२. माझे उपवास 
३. बिनमिठाचा सत्याग्रह 
४. संसारी माणसांबरोबर राहण्याची अनिच्छा, इंद्रियांशी असहकार 
५. साठ वर्षे स्वयंप्रेरित तुरुंगवास , बाह्य जगाबाबत अनभिज्ञ
६. नवलोक यात्रा 
७. पंचाग्नी तप 
८. संसारी माणसे व वस्तूंवर बहिष्कार 
९. कर्मसंहार ( कली , काली , खाली )
१०. केवळ ब्राम्हणांना यज्ञ करण्याचा अधिकार होता . आता कोणीही प्रेमयज्ञ करू शकतो .
११. आज एक स्त्री , उपनिषदांपलीकडे लिहू शकते.
१२. वैश्विक मुक्तीसाठी अवतरित परमेश्वराशी लढा 
१३. सत्यसाई व वसंतसाई करार 
१४. पंचेंद्रियांवर नियंत्रण , त्रिगुणांच्या पलीकडे जाणे व पाच कोश वेगळे करणे हे तत्व . 
१५. जात , धर्म , भाषा व देश या सर्वांच्या पलीकडे जाऊन सर्वांना मुक्ती बहाल केली . 
१६. वैश्विक मुक्तीस एक स्त्री कारणीभूत . 
१७. देवांची कॉन्फरन्स ( Sai Astrology हे पुस्तक ) 
१८. सर्वांसाठी सत्यप्रसाद 
१९. पाताळ लोकांपासून ते भूताखेतांच्या जगापर्यंत साईराम राज्य .
२०. दुर्गेचा अवतार , लक्ष्मी अवतार अशा पदव्या नाकारल्या . 
२१. प्रेम क्रांती 
२२. प्रेम साधना 

जय साईराम
 


   
        
 परमेश्वर सर्वत्र आहे           
           
          एक  सुंदर  फुलाचे  झाड  होते . त्यावर  अनेक  सुंदर  फुले  उमललेली  होती. एक  मधमाशी  तेथे  आली  आणि  फुलाला   म्हणाली ," हे  फुला  किती  सुंदर  आहेस  तु ! तुझा  रंग  किती  सुंदर  आहे.   तुझा सुगंध  किती  मनमोहक  (मनाला  आल्हाद  देणारा  आहे. ) आहे !" त्यावर  फुलानी  उत्तर  दिले, " हे  मधमाशी  मी  तुझा  आभारी  आहे. पण  ह्याकरिता  मी  काय   करू  शकतो ? मी  तुझ्याकरिता  एक  काम  करू  शकेल.  मी  तुला  माझे  मध   देईल ,  ते  तू  घे ." त्यानंतर  मधमाशी  फुलामधल्या  मधाचा  आस्वाद  घेऊन   आनंदाने   दूर  उडून  गेली एक  माकड  हे  सर्व  पाहत   होते ते  त्या  झाडाकडे  पळत  गेले  आणि   त्याने  ते  फुल  तोडले , कुस्करून   टाकले  फेकून   दिले  आणि  पळून  गेला .                                                                            जग   हे  असेच  आहे .  मधमाशीने  त्या  फुलामधले  सौंदर्य  पाहिले  आणि त्या फुलामधल्या सौंदर्याबद्दल  तिने  आश्चर्य  व्यक्त  केले  व  फुलाची  स्तुती  केली .  त्याबदल्यात  फुलाने तिला  मध  (अमृत )  दिले.  त्याप्रमाणे  तुम्ही जर  विचार  केला  की हे जग  ह्या  फुलासारखे  आहे  आणि  त्याची  स्तुती  केली , त्याचे  सौंदर्य  पाहिले  तर  ते  सुद्धा  तुम्हाला  अमृत  देईल.   देवाचे  अमृत  पूर्ण  जगभर  ओसंडून  वाहत  आहे . जर आपण  हे  समजून  घेतले  (तुम्हाला  हे  ओळखता  आले ) की हे अमर  आहे.  जर  माकडा  सारखे  आपणसुद्धा   ते  कुस्करून  टाकले  आणि  त्याचा  अनुभव  घेतला  तर  आपल्यालासुद्धा  जन्म  आणि  मरणाचे  चक्र  भोगावे  लागेल.                                                                                                                                                                श्री वसंता  साई          संदर्भ  ग्रंथ :-  डिवाईन  स्टोरिज  एंड पराब्लेस 

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१३

            जेव्हा  मी  म्हणते, " मी  वसंता  आहे ", तेव्हा  मी  ह्या  एका  नावारुपाशीच  संबंधित  राहते; भेदभाव  उत्पन्न  होतो. मला  वाटते  की  जे  माझ्या  ह्या  रूपाशी  निगडीत  आहेत  तेच माझे  आणि  इतर  माझ्यापासून वेगळे  आहेत. हे  अलग  करणेच   कर्माचे  कारण  आहे.  मी  सर्वांमध्ये  आहे  आणि  हा  एक  आत्माच  अनेक  बनला  आहे, हे  एकदा  उमजले  की  आपण  स्वच्छंद  पक्षी  होऊ. 
                                                                                  वसंता साई                                                                                                                                                                                                    संदर्भ ग्रंथ :-  कर्मकायदयावर   उपाय  












                                                                                                                                                            
 

      त्याग  आणि  दया (अनुकंपा ) हे   प्रेमाचे  दोन  डोळे  आहेत .