गोकुळाष्टमी विशेष
श्री वसंतासाई लहानपणापासूनच निःस्सीम कृष्णभक्त ! त्या जशा मोठया होऊ लागल्या तशा त्यांच्या कृष्णप्रेमाच्या ठिणगीचे वडवानलात रुपांतर झाले. श्री सत्यसाई बाबा हे भगवान श्री कृष्णाचा पुनःअवतार आहेत . श्री वसंतासाई ३५ वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर भगवंताच्या कृपेस पात्र झाल्या . भगवान श्री कृष्णाने त्यांना ध्यानात सांगितले , "पुट्टपर्तीचा सत्यसाई बाबा मीच आहे ". आणि त्या दिवसापासून त्या साई भक्त झाल्या.कृष्णाची राधा आणि साईची वसंता एकच . शुद्ध अंतःकरण हे आरशासारखे स्वच्छ असते . परमेश्वर हा नितळ आरसा आहे . राधा ही कृष्णाची प्रतिमा आहे. राधा म्हणजे त्याच्या दिव्यानंदाचे फलित आणि दिव्यानंदाच्या परमोच्च शिखराने धारण केलेले रूप . राधा ही कृष्णाची दिव्य ऊर्जाशक्ती आहे. आणि म्हणूनच ते अविभाज्य आहेत . कृष्णानी हाक मारल्या , "राधा , राधा !" राधेनी विचार केला , एखादया अनमोल रत्नासारखी माझी भक्ती त्यांच्या कमलचरणी अर्पण करण्याची हीच ती मंगल घटिका , शिवाय मी धरा म्हणजेच प्रकृती आहे . तिला राधा म्हणतात म्हणून सत्व रज तम या त्रिगुणांची जबाबदारी मी घेते . प्रकृती ही स्त्री असल्यामुळे मी ही नारी आहे .
या संदर्भात भगवान बाबांनी म्हटले आहे .
" प्रकृती स्त्री असल्यामुळे राधा ही स्त्री आहे . सनातन धर्मानुसार आदर्श स्त्री मध्ये असणारे सर्व गुण तिच्या ठायी आहेत . ती सर्वगुण संपन्न आहे . उदात्त , निष्कलंक भक्ती करून तिने आपले सर्व विचार भगवंताच्या कमलचरणी ठेवले आहेत . तिने आपला प्रत्येक विचार कृष्णाकडे वळवून त्याच्याशीच जोडला . त्यामुळे ती उन्मनी अवस्थेप्रत पोहोचून तिचा कृष्णाशी योग झाला . वेदांमध्ये यालाच मधुरभक्ती म्हटले आहे . भक्तीचे वेगवेगळे सहा प्रकार आहेत . शांत , सख्य , दास्य , वात्सल्य , अनुराग आणि मधुर हे परमेश्वर प्राप्तीचे सहा मार्ग आहेत ".
"मधुरभक्ती सर्वश्रेष्ठ आहे . ती परमानंद देते . दुधाचे दह्यामध्ये रुपांतर होते . दही घुसळून लोणी मिळते , लोणी कढवल्यावर त्याचे तूप बनते . ही अंतिम अवस्था आहे . मधुर भक्ती , परमेश्वराशी एक रूप होण्याच्या
अंतिम अवस्थेची अनुभूती देते . ध्येयाप्रत पोहोचल्यानंतर आपला प्रवास
थांबतो . पावलांची चाल थांबते . एकदा का तुम्ही मधुर भक्ती द्वारे
ही अनुभूती घेतलीत की काहीही मिळवण्याचे किंवा करण्याचे शिल्लक राहत नाही .
मधुर भक्ती करून परमेश्वराला प्राप्त करून घेतल्या नंतर परमेश्वराचे प्रेम व मनोवस्था याची पूर्णत्वाने अनुभूती होते ".
"मधुर भक्तीचे फळ मिळाल्या नंतर त्याचे बाहेरील कडू साल काढून टाका . ' मी आणि माझे ' हेच ते साल . त्यानंतर इच्छा , वासनांच्या बिया काढून टाका आणि प्रेमाचे ते मधुर फळ परमेश्वराला अर्पण करा. राधेने म्हटले आहे की , तिच्या मध्येही क्रोध होता , इच्छा होत्या . तिला त्याची कधीही बाधा झाली नाही . ती म्हणाली की तिने पंचतत्वे आणि पंचेंद्रिये एखादया हाराप्रमाणे गळ्यात घातली होती . तिला असे म्हणायचे आहे की तिचे पावित्र्य या सर्वांपासून अबाधित राहिले . परमेश्वर जाणतो की तिने आपले सर्वस्व पूर्णपणे त्याच्या चरणी अर्पण केले होते . ती स्वतःच साक्षात मधुर भक्ती आहे. तिचे प्रेम निर्मळ , निष्कलंक , परमशुद्ध आणि परमपवित्र आहे . ते परमेश्वराला ज्ञात आहे ".
"परमेश्वराने घोषित केले की राधेची भक्ती पूर्णत्वाला पोहोचली होती . परिपूर्ण होती ".
संदर्भग्रंथ :- इथेच ! या क्षणी !! मुक्ती !!! भाग २
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा