ओम श्री साईराम
मंत्राचे माहात्म्य
"ओम श्री साई वसंतसाईसाय नमः "
"हा मंत्र म्हणजे स्वामींच्या आणि माझ्यामध्ये असलेल्या बंधाच्या सत्यतेचा ठोस पुरावा आहे. मी त्यांची चित्तशक्ती असल्याचे हा मंत्र दर्शवतो. माझा जन्म त्यांच्या मधून झालेला असून माझा पुन्हा योग होणार आहे. या मंत्राच्या सामर्थ्याने जगातील कर्मांचा नाश होईल आणि वैश्विक मुक्ती मिळेल ".
२३ मे १९९८ रोजी मी परमकुडीमध्ये असतांना लंडनच्या एक भक्त निर्मला यांनी मला फोन केला . त्या म्हणाल्या, " अम्मा, प्लीज मला एक मंत्र सांगा ना. दिवसेंदिवस येथील परिस्थिती कठीण होत चालली आहे". मी म्हणाले, " मला माहित नाही. मी स्वामींना विचारेन ". दुपारच्या ध्यानात मी स्वामींकडे प्रार्थना केली. ध्यानानंतर आम्हाला एका कागदाच्या तुकडयावर "ओम श्री साई वसंतसाईसाय नमः " हा मंत्र लिहिलेला दिसला.
मला धक्काच बसला आणि भीतीही वाटली. मी आक्रोश करू लागले, स्वामींनी माझे नाव का बर घातले ?
नंतर ध्यानामध्ये स्वामींनी सांगितले की सर्वजण या मंत्राचे उच्चारण करू शकतात. व्याधीग्रस्त लोकांना हा मंत्र सहाय्यभूत ठरेल. मी विभूतीवर तो मंत्र लिहून ती विभूती अनेक व्याधीग्रस्त व्यक्तींना पाठवली. तेव्हा पासून आजपर्यंत मंत्र, प्रार्थना आणि विभूती ह्यांच्या सहाय्याने अनेक समस्यांचे निराकरण झाले आहे. स्वामी म्हणाले, " आध्यात्मिक मार्गावर प्रगती करित असतांना शांतीची अनुभूती घेण्यास हा मंत्र सहाय्यभूत होतो. हा मुक्ती मंत्र आहे. देह, मन आणि आत्मा यांच्या त्रिविध तापांवर हा रामबाण उपाय आहे ".
३० डिसेंबर २००३ ध्यान
वसंता - स्वामी, "ओम श्री साई वसंतसाईसाय नमः " हा मंत्र कसा काय आला ?
स्वामी - तुझ्या प्रेमामुळेच तुझे नाव परमेश्वराशी जोडले गेले. तुझ्या अनिर्बंध प्रेम वर्षावाने परमेश्वराचे नाव तुझ्याशी जोडले गेले.
वसंता - स्वामी, या मंत्राचे उच्चारण करित असलेल्या व्यक्तिंना कोणता लाभ होईल ?
स्वामी - अनेक रोग या मंत्राने बरे झाले आहेत, हे कस घडल? वृंदावन मध्ये सर्वजण ' राधे राधे ' नावाचा जप करत असल्यामुळे तिच्यासारखेच होऊन जातात. त्याच प्रमाणे वसंतसाई नावाचा जप करणारे तुझ्यासारखे प्रेमस्वरूप होतील.
ध्यान समाप्ती .
राधा कृष्ण प्रेमाचे सामर्थ्य
१४ सप्टेम्बर २००८
वसंता - स्वामी, प्लिज मला या मंत्रा विषयी सांगा.
स्वामी - हा मंत्र म्हणजे राधाकृष्ण मंत्र ,शिव शक्ती मंत्र, पुरुष प्रकृती मंत्र आणि सृष्टी मंत्र आहे. तेथे केवळ "ओम श्री साई वसंतसाईसाय नमः " हा एकच मंत्र असेल ना तेथे राधाकृष्ण मंत्र असेल ना प्रेमाराजा मंत्र ! तुझे अश्रू आणि तुझी तळमळ ह्यातून या मंत्राची निर्मिती झाली आहे. केवळ नवनिर्मिती करण्यासाठी आपण येथे अवतरलो आहोत.
ध्यान समाप्ती.
लहानपणापासून मला कृष्णाशी लग्न करण्याची इच्छा होती. या इच्छेने वैश्विक रूप धारण केले आणि सत्ययुगाची निर्मिती झाली. ह्यातून नवनिर्मितीसाठी पुरुष प्रकृती तत्व बनले. येथे प्रत्येकात आणि प्रत्येक गोष्टीत सत्य आणि प्रेम प्रवेश करेल. हे वसंतमयम आहे. हा या मंत्राचा पाया आहे. म्हणून स्वामींनी याला ' सत्ययुगाचा मंत्र ' संबोधले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा