ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" अतृप्त इच्छाच केवळ पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचे कारण ठरतात " .
पुष्प नववे पुढे सुरु
हे मा ,
धारण करुनी चरणांवरती
तव रक्त रंजित आसू ,
चाल थांबविली त्यांनी.
कोणा न दिसे
तव प्रेमाचे मंगल सत्य
ठेवा तव प्रेमाचा
ते राखिती त्यांच्यासाठी
हे या प्रकरणासाठी समर्पक आहे. स्वामी माझ्या प्रेमाचे सत्य त्यांच्या चरणांखाली ठेवतात त्यामुळे ते कोणीही पाहू शकत नाही.माझे रक्तरंजित अश्रू त्यांनी चरणांवर धारण केल्यामुळे ते चालू शकत नाहीत असे ते सांगतात . ते अदृश्य देहात आहेत . जेव्हा माझे रक्तरंजित अश्रू थांबतील तेव्हा ते बाहेर येतील आणि सर्वांना दिसू शकतील. तो पर्यंत ते पुट्टपर्तीतील हिल हाउस मध्ये अदृश्य देहात असतील . त्यांच्या चरणांखाली केवळ रक्त नव्हे तर मी ही तिथेच आहे. हे वाचा आणि पहा या कलयुगात मला किती दुखः सोसावे लागतेय ! यातून जागे व्हा , हे जाणून घ्या. केवळ परमेश्वराची कास धरा. त्याच्याशिवाय काहीही सत्य नाही . जगात येतांना आपण काहीही बरोबर घेऊन येत नाही. हा करुणाघन परमेश्वर कलियुगातील लोकांचे रक्षण करण्याकरिता येथे आला आहे.
तमिळनाडुमध्ये शिबी नावाचा राजा होऊन गेला. त्याने त्याच्याकडे संरक्षण मागण्यासाठी आलेल्या कबुतरासाठी आपले प्राण दिले. दुसरा राजा मनोनिधी चेला. त्याने मृत वासरासाठी आपल्या पुत्राच्या जीवनाचा त्यागकरण्याची तयारी दर्शवली. एक दिवस अनवधानाने त्याच्या पुत्राच्या रथाखाली येऊन एक वासरू मारले गेले. त्या राजानी त्याच रथाच्या चाकाखाली आपल्या पुत्रास ठेऊन तो रथ चालवणार एवढयात अचानक परमेश्वर तेथे प्रकट झाला व त्याने त्या वासराला पुनर्जीवन दिले आणि राजपुत्राचे प्राण वाचवले त्याच भारत भूमीमध्ये एका राजाने मन्सूरचे हात पाय तोडले ! अलेक्झ्यांड्रीयामध्ये त्या सम्राटाने कॅथरीनचा शिरच्छेद केला ! कसे हे जग विचित्र आहे ! या राजांबरोबरच येथे वासरू आणि कबुतर यांना न्याय दान करणारे राजेही होऊन गेले ! कलियुगातील लोकांच्या पापांमुळे अवताराने त्याचे जीवन त्यागले. स्वामींनी जीझस प्रमाणे दुखः भोगले आणि सर्वांच्या पापांमुळे देह त्याग केला. प्रत्येक घरातील देव घरामध्ये खालील शब्द ठळक मोठया अक्षरात लिहिले पाहिजेत.
" भगवान सत्य साई बाबांनी माझ्या पापांसाठी देह त्याग केला ".
तुम्ही हे लिहा आणि रोज वाचा. मी जगातील सर्व लोकांना आर्जव करून एक प्रतिज्ञा करण्यास सांगते : जीवनामध्ये स्वामींची एक शिकवण प्रत्यक्ष कृतीत आणा. दररोज स्वामींची किमान एक शिकवण आचरणात आणा.
पुढील वसंतामृत पुढील भागात .......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा