ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मेणबत्ती जशी प्रकाश देण्यासाठी स्वतः जळते , तसे तुम्ही जगातील सर्वांना प्रेम द्या ".
पुष्प दहावे पुढे सुरु
२७ एप्रिल २०१३ - ध्यान
वसंता - स्वामी , कीर्तनाचे उदाहरण देताना तुम्ही शुकाचे नाव घेतलेत। हे कस काय स्वामी ?
स्वामी - शुकाने सात दिवस अखंड परमेश्वराचे गुणगान केले . त्याचप्रमाणे तू सदैव परमेश्वराचा महिमा लिहित आहेस. याविषयी तू लिही.
वसंता - मी लिहीन स्वामी .
ध्यान समाप्त .
आता आपण या विषयी पाहू . मी नवविधा भक्तीचे मार्ग कसे आचरणात आणले व त्याचे अनुसरण केले याविषयी स्वामींनी मला लिहिण्यास सांगितले .
श्रवण- परिक्षित श्रवणभक्तीचे उदाहरण आहे. त्याने अखंड सात दिवस बसून परमेश्वराच्या थोरवीचे श्रवण केले .त्याला सात दिवसांमध्ये मृत्यू येईल असा शाप मिळाला होता . तद्नंतर शुकमुनींनी भगवत स्तुती पाठ केले . मला लहानपणापासून मृत्यूची भीती वाटे .मी माझ्या वडीलधा-याकडून दिवसरात्र हरिकथा ऐकत असे. मला खेळ खेळण्यात अजिबात रस नव्हता . आमच्या घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याकडे मी गोष्ट सांगण्याचा आग्रह धरत असे . माझे काका दररोज संध्याकाळी गावातील लोकांसाठी रामायणाचे वाचन करीत . गोष्ट ऐकल्याविना मी रात्री झोपत नसे . लहानपणापासूनची ही माझी सवय अजूनही आहे .मला आता स्वामी ध्यानात गोष्टी सांगतात . लहानपणी मी ऐकलेली आंडाळची कथा माझ्या कोवळ्या मनात बिंबली .
श्रवणभक्ती करत परिक्षितसारखा मला देह त्याग करायचा नाही ! नाही ! मी माझा देह अशा रीतीने सोडणार नाही . लहानपणापासून ज्याची मला भिती वाटत होती तो मृत्यू माझ्याकडे फिरकणार नाही . आंडाळप्रमाणे माझा देहही कृष्णामध्ये विलिन झाला पाहिजे . मला कृष्णाशी विवाह करायचा होता . बालवयापासुनची ही माझी एकमेव इच्छा आहे . माझे जीवन श्रवण भक्तीचे उत्तम उदाहरण आहे . लहानपणी शाळेत जा ये करतेवेळी सर्व मोठी माणसे मला हाकमारत व म्हणत , " ये इकडे , मी तुला एक गोष्ट सांगतो ". अशा तऱ्हेने ते माझ्याशी बोलत . माझ्याशी संवाद साधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मला गोष्ट सांगणे ; हे सर्वांना ठाऊक होते . ते इतर मुलांना बोलावून त्यांना चॉकलेट , गोड , तिखट खाऊ देत असत . मला मात्र गोष्टीचाच खाऊ लागे . अन्यथा मी कोणाच्याही घरी जात नसे . याच कारणासाठी आता स्वामी गोष्टीरूपाने मला पूर्व अवतारांविषयी सांगतात आणि ते ज्ञान मी लिहिते .
* कीर्तन :- शुकमुनी कीर्तनाचे उदाहरण आहेत असे स्वामी सांगतात . आताच मी उल्लेख केल्यानुसार त्याने अखंड सात दिवस परमेश्वराचे गुणगान केले . विनोबाजींनी गीतेवर लिहिलेल्या संबंधात लिहिले आहे की, " शुकाने जागेवरून न हलता सात दिवस अखंड परमेश्वराचा महिमा गायला . लोकं ध्यानामध्ये फार तर एक ते दोन तास एकाजागी बसू शकतात . परंतु इथे शुकाने अखंड सात दिवस एका जागी बसून परमेश्वराचे गुणगान केले . मी गेले ७० वर्षे परमेश्वराचा गुणगान गात आहे . नकळत्या वयातच मी देवदेवतांवर अनेक गीते व लेख लिहिले , शेकडो काव्ये रचली , स्वामींचे स्तवन करणारी हजारो काव्ये व गीते लिहिली . हा सर्व कीर्तनाचाच भाग आहे . आता स्वामी जे काही सांगतात ते मी लिहिते , हे सर्व लिखाण पुस्तक रुपात प्रकाशित होते . आज ह्या पुस्तकांचा आकडा १२० च्या वर गेला आहे . आता मी ई/e पुस्तके लिहिते मी सकाळपासून रात्रीपर्यंत एका जागी बसून लेखन करते . गेली ७३ वर्षे माझ्या लेखनाचा एकुलता एक विषय आहे .
' स्वामींचा महिमा !'
जय साई राम
व्ही.एस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा