ओम श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" भौतिक वस्तूंमधून मिळणारी शांती ही खरी शांती नव्हे , याचे जेव्हा मनुष्याला ज्ञान होते आणि तो शांतीचा मुलस्तोत्र शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या आध्यात्मिक यात्रेचा प्रारंभ होतो ".
वसंतामृतमाला
पुष्प दहावे
सहज सुख
ज्या वहीमध्ये मी स्वामींना पत्र लिहित असे त्यामध्ये स्वामींनी खालील तीन हिंदी शब्द आणि त्याचे इंग्रजी शब्दार्थ लिहिले .
सहज सुख - Natural Comfort
समझ - Understanding
चिंतन - Contemplation
मी लिहिलेली वसंतामृत माला सर्वांनी वाचावी व त्यावर चिंतन करावे . तुम्ही हे तुमच्या आचरणात आणल्यावर तुमचे जीवन सहज सुखाने परिपूर्ण होईल . या जगात जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे . हे जग सोडताना आपण आपल्याबरोबर काहीही घेऊन जात नाही . हे माहित असूनही आपण कुटुंब , नावलौकिक व धनसंपदा वाढवण्यात व्यस्त असतो . स्वामींची पुस्तके वाचून आचरणात आणा अन् गेल्या ८४ वर्षात त्यांनी दिलेली शिकवण समजून घ्या . आचरण केले तरच खऱ्या सुखाची गोडी चाखता येईल , अन्यथा सर्व व्यर्थ आहे . या जगात आपण जे काही अनुभवतो . त्याने सहज सुख प्राप्त होत नाही . हे दर्शविण्यासाठी स्वामींनी भूतलावर अवतार धारण केला . या पूर्वी कोणत्याही अवताराने इथे येऊन सर्वांशी संभाषण , मार्गदर्शन असे काही केले नाही . भौतिक ज्ञान व्यर्थ आहे . प्रत्येकाने अध्यात्म जाणून घेऊन अध्यात्मिक ज्ञान संपादन करावयास हवे . नवविधा भक्तीमार्गातील कोणताही मार्ग अंगिकारा परमेश्वर प्राप्तीसाठी तो पुरेसा आहे . आपण आता नवविधा भक्तीचे मार्ग पाहू या .
* श्रवण :- याचा अर्थ ऐकणे / श्रवण करणे . राजा परिक्षित याचे उत्तम उदाहरण आहे . परिक्षितला सात दिवसांत मृत्यू येईल असा शाप मिळाला . त्याने विचार केला , " मृत्यूचा स्वीकार कसा करावा ?" शुकमुनी आले व त्यांनी सात दिवस भागवत ग्रंथाचे अखंड पारायण केले . ते ऐकण्यासाठी अनेक ऋषीमुनींनीही तेथे उपस्थिती लावली . भागवतामध्ये कृष्णमहिमा वर्णन करण्यात आला आहे . शुकमुनी अहोरात्र भगवंताच्या माहात्म्याचे पठण करत असता आनंदाचे दोहो आनंद तरंग अशा अवस्थेत श्रवण करत परिक्षिताने देह त्याग केला . आमच्या गावामध्ये मरणासन्न अवस्थेत असणाऱ्यांसाठी गरुड पुराणाचे वाचन करण्याची पद्धत होती . हे ऐकत ऐकत ते देह त्याग करत . अळवार त्यांच्या गीतांमधून सांगतात , " तुमच्या मुलाला देवाचे नाव ठेवा म्हणजे मृत्यूसमयी त्याला हाक मारलीत की तुम्ही आपोआप देवाला हाक मारल ".
* कीर्तन :- यासाठी स्वामींनी शुकमुनींचे उदाहरण दिले . शुकाने अखंड सात दिवस भागवताचे वाचन करून परमेश्वराचे गुणगान केले , भगवन्नाम व महिम्याचे पारायण केले .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .......
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा