ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" आपले विधीलिखित ब्रम्हदेव लिहित नसून आपले आपणच लिहितो. "
पुष्प ४१ पुढे सुरु
..... हे मूर्तिमंत ज्ञानपीठ, आमच्यासाठी प्रार्थना कर .....
माझे जीवन म्हणजे निवळ ज्ञान. ज्ञान न्यायाचे शिरोभूषण ! न्यायदेवता ज्ञानपीठावर आसनस्थ असावी. परमेश्वर प्राप्तीचा पाया निवळ ज्ञान होय. अज्ञानामुळे कलियुगात सर्वत्र अन्याय, अधर्म, अनादर, असत्य, ज्ञानाचा अभाव आणि सतत दुःख न् चिंता दिसून येते. संपूर्ण जीवन संघर्षमय असते. सुखाची मात्रा स्वल्प असते. ज्ञान न्यायाची बैठक आहे. हे कलियुग अत्यंत वाईट असल्यामुळे स्वामींनी येथे अवतरून ज्ञानाची शिकवण दिली. हा जन्म कशासाठी ? केवळ जन्म मृत्यूच्या फेऱ्यांसाठी ? नाही, नाही ! सम्यक् ज्ञानाने आपण जन्म मृत्यूवर विजय मिळविला पाहिजे. येथे माझी कुंडलिनी स्तूपाच्या रुपात मूर्त झाली ; ह्याच्या शिरोभागी सहस्त्रार आहे. हा अज्ञानाचा अंधकार दूर करून सर्वांना ज्ञानाचा प्रकाश प्रदान करणारा ज्ञानाग्नि आहे. ह्या ज्ञानामुळेच मी स्वामींना बोलले की अवतारांनीही त्यांच्या कुटुंबियांवर अन्याय केला. स्वामीनी पूर्वी मला एक कविता दिली होती.
विश्वाच्या या न्यायमंदिरी
न्यायासाठी नित्यभ्रमण करिसी
साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे करुनी अवतारासी
कायदेपंडितासम युक्तिवाद करिसी.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा