ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" आपण का जन्मलो ? मी कोण आहे ? यावर पुन्हा पुन्हा विचार करा."
पुष्प ४१ पुढे सुरु
..... हे आध्यात्मिक घट .....
मी स्वतःस रिक्त करून हा घट आध्यात्मिकतेने भरला. माझ्या जीवनात भौतिकतेला स्थान नाही. जन्मापासूनच परमेश्वर माझे सर्वस्व आहे. मी परमेश्वरापासून जन्मल्यामुळे माझे जीवन इतरांहून वेगळे आहे. तुम्हीसुद्धा परमेश्वरापासूनच जन्मले आहात परंतु याबाबत अनभिज्ञ आहात. याची जाणीव सर्वांना करून देण्यासाठी मी येथे आले. लव- कुशांना त्यांचे पिता कोण हे माहित नव्हते. श्रीराम १२ वर्षे त्यांच्यापासून दूर राहिले. त्यांनी अश्वमेध यज्ञ केला तेव्हा त्यांचा घोडा दोन मुलांनी अडवून सर्वांना पराजित केले. अखेरीस राम युद्ध करण्यासाठी आले. त्यांचे पुत्र श्रीरामाशी वाद घालू लागले; सीतेने तेथे येऊन, ' हा तुमचा पिता आहे ' असे त्यांना सांगितले. तोपर्यंत त्यांना त्यांच्या पित्याविषयी काहीही माहित नव्हते. तुम्हालाही तुमचा पिता कोण हे माहिती नाही; तुम्ही त्याच्याशी वादविवाद करता. तुम्हा सर्वांचा पिता भगवान श्री सत्यसाई आहेत; तुमचा पिता तुम्हाला दाखवून देण्यासाठी मी येथे आले आहे. त्यांची प्राप्ती हा सर्वांच्या जीवनाचा उद्देश आहे. ते तुमचे हृद्यनिवासी तुमच्या हृदयांत साक्षीभावात स्थित आहेत. भौतिक मायेतून जागे व्हा; आध्यात्मिक मार्ग अनुसरा. त्यांची शिकवण आचरणांत आणून साधना करा. आसक्तीशिवाय सर्व कर्म करा. सर्वकाही त्याला अर्पण करा. मग ते भोक्ता होतील व तुमच्या प्रेमाचा आनंद उपभोगतील; हे त्यांचे फल आहे. आतापर्यंत तुम्ही त्यांच्याकडे पाहिलेसुद्धा नाहीत व त्यांना क्षुधाक्रांत केलेत. तुमची त्यांच्या विषयीची अनास्था व त्यांच्यावर भिस्त न ठेवण्याची वृत्ती यांमुळे तुम्ही खऱ्या आनंदापासून वंचित आहात. हे अध्यात्म आहे. भौतिक विषयांत फसू नका. कुटुंबात रहा पण अनासक्तीने कर्तव्य कर्म करा. हा खरा आनंद आहे. हे अध्यात्म आहे. अध्यात्माचा अर्थ सर्वसंग परित्याग करून जंगलात जाणे नव्हे तर परमेश्वर चिंतनात आसक्तीविना कौटुंबिक जीवन जगणे. हे खरे अध्यात्म आहे. अशा तऱ्हेने जीवन जगल्याने दुःख अन् क्लेश तुमच्या जवळपासही येणार नाही.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा