ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" परमेश्वराची शिकवण आचरणात आणली नाही तर त्याच्या दर्शनाचा काय उपयोग ? "
पुष्प ४१ पुढे सुरु
स्वामी - हे स्वर्गीय फुल तू माझ्या समीप बसल्याचे दर्शविते. माझ्या बाजूला बसण्याचा अधिकार केवळ तुझा आहे. तू माझे मधुर जीवन उर्जा पुष्प आहेस. मला झुल्यावर स्वामींच्या शेजारी बसण्याचा हक्क असला तरीही मला त्यांची चरणरज बनून त्यांच्या चरणतळी लपायचे आहे.
झुला गीतात म्हंटले आहे,
श्यामसंग डोले महारानी राधिका
साईसंग डोले महारानी वसंता.
महारानी राधिकेसंग कृष्ण झुल्यामध्ये झुलत आहे तर महाराणी वसंतासंग साई झुल्यामध्ये झुलत आहेत. मला महारानी होऊन झुल्यावर स्वामींच्या शेजारी बसायचे नाही, तर त्यांची चरणरज होऊन सर्वांच्या दृष्टीआड व्हायचे आहे. म्हणून स्वामींनी ते छोटे गुलाबी फूल झुल्यावर स्वतःच्या फोटो शेजारी ठेवले. ते फुल दोन दिवस टवटवीत ताजे होते, ना कोमजले, ना त्याचा रंग विटला. मी आदरणीय, पूजनीय नाही. मी केवळ स्वामींची चरण धुलिका आहे. मला त्यांच्या चरणांखाली दडून बसायचे आहे, जेथे मला कोणीही पाहू शकणार नाही. म्हणून ते छोटुकले फुल स्वामींच्या मांडीवर होते.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा