ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" कुटूंबाशी असणारे बंध पुन्हा जन्म घेण्यास कारणीभूत होतात. परमेश्वराशी असणारे बंध मोक्ष प्रदान करतात."
पुष्प ४१ पुढे सुरु
मनोनिधी चोला नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने त्याच्या महालासमोर एक घंटा बांधली होती. जर कोणाला काही दुःख असेल तर त्याने ती घंटा वाजवावी. एक दिवस एका गाईने ती घंटा वाजवली. राजाचा मंत्री तेथे आला त्याने गाईला पाहिले व तो त्या गाईच्या मागोमाग जाऊ लागला तेव्हा तेथे रस्त्यावर त्या गाईचे वासरू मरून पडलेले त्याला दिसले. ती घटना पाहणाऱ्या एका व्यक्तीला तेथे बोलावण्यात आले. त्याने सांगितले की राजपुत्र रथातून तेथून जात असताना त्याने त्या वासराला धडक दिली व ते वासरू खाली पडून मरण पावले. मंत्र्याने ही हकीकत राजाला सांगितली. राजाने त्यांना आज्ञा केली की राजपुत्राला घेऊन यावे व त्याला रस्त्यावर झोपवून त्याच्या अंगावरून रथ न्यावा. परंतु मंत्र्याने तसे करण्यास नकार दिला. त्यावर राजा म्हणाला की तो स्वतःच त्या मुलाला रस्त्यावर झोपवून त्याच्या अंगावरून रथ चालवेल. राजा त्याच्या पुत्राच्या अंगावरून रथ नेणार इतक्यात राजाच्या न्यायप्रियतेची प्रशंसा करणारी दिव्य वाणी ऐकू आली. परमेश्वराने त्या वासराला जीवनदान दिले. राजपुत्रही उठला इथे त्या राजपुत्राच्या हातून चूक घडलेली असते. तथापि सीतामातेची काहीही चूक नाही तिने लंकेत अग्निदिव्य करून तिचे पावित्र्य व पातिव्रत्य सिद्ध केले होते तरीही तिला वनात का पाठवले ? केवळ त्या अज्ञानी धोब्याच्या विधानामुळे. हा राजाचा न्याय आहे का ? मी तरुणपणापासून या कारणासाठी मी अश्रू ढाळले. स्वामींशीसुद्धा विवाद केला. त्यावर स्वामींनी सांगितले की प्रेमसाई म्हणून आल्यावर ते माझ्याशी विवाह करतील. माझ्या मनात भीती होती म्हणून मी त्यांन काही अटी घातल्या. त्या अशा की, ते माझ्यापासून कधीही वेगळे होणार नाहीत. सीतामाई सारखे मला मध्येच दूर न लोटता माझा स्वीकार करतील, अजून एक अट अशी की, मला अपत्य नको. यावर स्वामी म्हणाले की एक अपत्य होईल. मग मी, ' गर्भाकालात व प्रसुतीच्या वेळी फक्त स्वामी माझ्या समवेत असले पाहिजेत ' अशी अट घातली. सीतेप्रमाणे गर्भवती असताना मलाही वनात पाठवले जाईल. या भीतीने मी ही अट घातली. अशा रीतीने स्वामी जेव्हा प्रेमसाई अवतारात येतील तेव्हा सर्व अन्यायांचा अंत होईल. या सर्व अन्यायांची भरपाई करण्यासाठी स्वामी प्रेमसाई होऊन येतील. प्रेमसाई पुस्तकांमध्ये मी हे सर्व लिहिले आहे.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा