ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" बंध म्हणजे द्वैतावस्थेत अडकलेले मन त्यामुळेच भेद उत्पन्न होतात."
पुष्प ४४ पुढे सुरु
वसंता - स्वामी, तुम्ही गुरूविषयी लिहिले ?
स्वामी - हो, मी लिहिले आता तू लिही.
वसंता - स्वामी जगन्मातेला कोण बोलावते आहे ?
स्वामी - सगळे बोलावत आहेत.
वसंता - त्या चांदणीच्या गळ्याभोवती काय आहे ?
स्वामी - ध्रुव तपश्चर्या करून तारा झाला तुझी तारका स्पंदने संपूर्ण व्यापतात. ती अवघ्या निर्मितीमध्ये पसरतात. ते तुझे मांगल्य आहे.
वसंता - खरंच ? हे खरं आहे ?
ध्यान समाप्ती
आता आपण या विषयी पाहू. स्वामींनी हे गीत लिहिले. यात सर्वजण माझ्यासाठी गात आहेत. माझी तारकास्पंदने समस्त विश्व व्यापतात. ध्रुवाने तपश्चर्या केली व तो अढळ तारा बनला. माझे तप वैश्विक मुक्तीसाठी आहे. माझ्या सहस्त्रातून उत्पन्न होणारी तारका स्पंदने सर्वांमध्ये प्रवेशित होत त्यांचे ताऱ्यांमध्ये परिवर्तन करतात.
ही स्पंदने सृष्टीमध्ये प्रवेश करत सर्वकाही दिव्य करतात. नवनिर्मिती सत्य साई मयम आहे. यासाठी स्वामींनी गळ्यात मांगल्य असलेला माझा चेहरा स्तूपाचा चांदणीवर काढला परत आल्यावर स्वामी मला बोलावतील, याचा मला हे लिहिता लिहिता उलगडा झाला. माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधतील आणि त्यानंतरच स्तूपामधून तारका स्पंदनांचा विस्तार होईल.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा