ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
कलियुग अवतार भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या आगमन दिना निमित्त
जगातील सर्व शक्यता मानवामध्ये वाट बघत असतात. जसे वृक्षामध्ये बीज वाट बघत असते तसा हा प्रकार असतो. त्याच्या भूतकाळावर त्याचा भविष्यकाळ अवलंबून असतो. त्याच्या वर्तमानकाळावर त्याची नियती ठरते.
आता आपण यावर खोल विचार करू. केवळ एका छोट्या बी मधून एक प्रचंड वृक्ष वाढतो याप्रमाणेच प्रत्येक मनुष्यामध्ये सर्व शक्यता दडलेल्या आहेत. तो काहीही सध्या करू शकतो. त्याचे पूर्वीचे जन्म त्याच्या विचारांनीच ठरविले व तेच पुढील जन्मही ठरवतील. माणूस त्याच्या पूर्व जन्मापासून फक्त त्याच्या आचार विचारांची संपत्ती साठवितो. त्याचा पैसा, नाव, कीर्ती, कुटुंब, अधिकार अथवा पदवी यापैकी काहीही तो घेऊन येत नाही. फक्त त्याच्या मनावर खोल बिंबलेली त्याची वागणूक व त्याचे गुणविशेष तो स्वतःबरोबर घेऊन येतो. हे सर्व मिळून त्याचे भविष्य ठरविणारा आराखडा तयार होतो. ह्या जन्मातील त्याचे आचरण त्याचा पुढील जन्म निर्माण करते. त्याला जर हे उमजले तर तो काहीही साध्य करू शकतो. प्रत्येक मनुष्यामध्ये प्रचंड शक्ती असते.
आपण एक उदाहरण पाहूया. वटवृक्षाच्या झाडाची बी अगदी लहान असते. तथापि त्या बीजामध्ये अफाट शक्ती असते. बीज अंकुरित झाल्यानंतर त्याचा वटवृक्ष होतो. या झाडाची खोडापासून येणारी मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात व जमिनीत प्रवेश करतात त्यांचेही झाड होते. या झाडाच्या विशाल सावलीमध्ये हजारो लोक विसावा घेऊ शकतात. एका छोट्या बीजामध्ये एवढी मोठी शक्ती आहे. प्रत्येक मानवामध्येसुद्धा महान शक्ती सुप्तावस्थेत असते. या शक्तीद्वारे तो हजार माणसांना मुक्त करू शकतो ! परंतु जर त्याने मुक्ती प्राप्त केली नाही तर त्याला जन्ममृत्यूच्या चक्रात फसावे लागेल.
सवयीनुसार तुम्हीही पुन्हा पुन्हा या जगात जन्म घेत राहता. ' मी आणि माझे ' च्या भावना व बंधनामुळे माणूस कायमचा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकला आहे. जेलरने जशी चोरास ताकीद दिली. तसे स्वामी सर्वांना धोक्याची सूचना देत आहेत. सत्ययुग येत आहे. त्याच्या आगमनापूर्वी सर्वांनी तयार राहायला हवे. आपण आपल्या वाईट सवयी बदलायला हव्यात. प्रत्येक विचार काटेकोरपणे न्याहाळून दुरुस्त करायला हवा. आपण स्वामींना अंतःकरणपूर्व प्रार्थना करून अश्रू ढाळावेत, तरच ते आपले भाग्य बदलतील. स्वामी त्यांच्या कृपेने काहीही करू शकतात. ते सर्वांचे भाग्य बदलू शकतात. तुम्ही निदान आतातरी हे करा, म्हणजे पुढील कलियुगात तुम्ही जन्म घेणार नाही. जर तुम्ही तुमचे कुसंस्कार बदलले नाहीत तर पुन्हा पुन्हा या जगात जन्म घेत रहाल. जागे व्हा ! जागे व्हा ! स्वामींबरोबर सत्ययुगात जाण्यासाठी सर्वजण तयारी करा.
व्ही. एस.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा