ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वरावर भक्तीचा वर्षाव करण्याचे नानाविध मार्ग तुम्ही शोधू शकता."
पुष्प ४५ पुढे सुरु
आता आपण याविषयी पाहू. दुपारी स्वामींनी एक कार्ड दिले, त्यावर त्यांचा तरुणपणीचा फोटो होता; व मागील बाजूस एक वाहती नदी व बरेच वृक्ष असलेले चित्र होते. त्या नदीमध्ये एक हृद्य आणि दोन नेत्र दिसत होते. दोन नेत्रांवर एक नेत्र असे एकूण तीन नेत्र होते. स्वामींनी त्यांच्या पुनरागमनाचा पुरावा म्हणून हे कार्ड दिले. माझ्या अंतरीच्या भावविश्वामुळे स्वामी परत येतील, असे ते सुचवितात. त्या फोटोत नदीच्या प्रवाहात अनेक गोष्टी प्रतिबिंबित झाल्या आहेत. उदा. तीन नेत्र व अनेक वृक्ष. जलतत्व सुखाशी संबंधित असून ते पंचेंद्रियांमधील एका इंद्रियाचे प्रतिक आहे. माझे भाव मी माझ्या सुखाद्वारे शब्दबद्ध करते. ह्या भावांमधून स्वामींचे नवीन रूप साकारते. माझे व्याकूळ अश्रू, विलाप, आणि शोक स्वामींना परत घेऊन येतील. माझे अश्रू या नदीसारखे सतत वाहात आहेत; येथूनच स्वामी येतील. स्तुपाचा चौथा प्राकार जलाचे प्रतिक आहे. स्वामींचे ४ महिन्यांत पुनरागमन होईल असे ते यातून सुचित करतात. आम्ही अजून निरीक्षण केले असता आम्हाला त्या चित्रात डोळ्यांच्या अनेक जोड्या आढळून आल्या. हे ' सर्वतो पाणी पादम् ' सारखे आहे, परंतु इथे हे सर्वतो शिरोमुख आहे. म्हणजे सर्वत्र परमेश्वराचे नेत्र, हात, पाय आहेत.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा