ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर आहे. अशी कोणतीही जागा नाही जेथे तो नाही. "
पुष्प ४५ पुढे सुरु
काही दिवसांपूर्वी स्वामींनी एक गोल पेपर प्लेट दिली. त्याच्या पृष्ठभागावर आठ पत्यांचा अष्टकोन होता. मध्यभागी असलेल्या गुलाबाच्या फुलाला एक पान होते. बाजूला दोन व तिन अशी पाच पाने होती. पुढे एक फुलपाखरू होते.
हे पाहून मला संत कॅथरीनच्या जीवनाची आठवण झाली. पात्यांनी बनविलेल्या अष्टकोनी चक्रावर खिळे ठोकून गजाने तिची हत्या केली. केशरी गुलाब स्वामींचा निर्देश करते. आदिमूलम् एक आहे. ते स्वतःला दोघांत विभागते. म्हणजे एका पानातून दोन पाने, स्वामी व त्यांची शक्ती होतात. ही दोघांनी केलेली निर्मिती तीन पानांद्वारे सुचविली आहे. म्हणून परमेश्वर, त्याची शक्ती व निर्मिती हे तिन्ही एक आहेत. एकातून दोन व दोनांतून तीन. अष्टकोन पृथ्वीवर अवतरलेल्या वैकुंठाचे प्रतिनिधित्व करतो. सर्वजण कर्मकोषांतून मुक्त होऊन फुलपाखरांत परिवर्तित झाले. हे फुलपाखरू दर्शविते.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा