रविवार, ३१ जानेवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

            " प्रत्येक जीवात्म्यामध्ये असणारी अभेद्य आदिशक्ती म्हणजे परमेश्वराची सर्वज्ञ शक्ती होय."

पुष्प ४७ पुढे सुरु 

                    केवळ आमच्या भावविश्वाद्वारे सर्व विवाह संपन्न होतील. सर्व पुरुषांमध्ये स्वामींचे भाव असतील तर सर्व स्त्रियांमध्ये माझे. म्हणजे प्रत्येक विवाह हा आमचाच असेल. हे स्वामींचे अवतार कार्य आहे. वयाच्या १६ व्या वर्षी माझा विवाह झाला परंतु कोणाशी झाला याविषयी मी अज्ञात होते. मी वैवाहिक जीवनाची ६ वर्षे आनंदात होते. त्यानंतर आमची ताटातूट झाली. आता आमच्या ६० व्या विवाहदिनी आम्ही एकत्र येऊ. यामुळे कलिचे उच्चाटन होऊन सत्ययुगाची पहाट होईल. 
                       हेच लिलिचे फूल अंत्यविधीसाठीही वापरले जात. हा कलियुगाचा मृत्यू, दुष्प्रवृत्ती दुर्गुण व अज्ञानाचा मृत्यू आहे. आता मृत्यूचा अंत्यविधी येणार. हा कलियुगाचा मृत्यू असून सत्ययुगाचा विवाह आहे. हा एक विचित्र प्रसंग आहे. एकाच दिवशी कलियुगाचा मृत्यू होईल व सत्य युगाचा विवाह संपन्न होईल. केवळ भगवंतासाठी हे फुल दोन्ही प्रकारे कार्य करते. ज्या दिवशी स्वामींची आणि माझी भेट होईल. तो सत्ययुगाचा विवाह असेल. त्या दिवसापासून स्तूप आणि विश्व ब्रम्ह गर्भ कोटम कार्यास प्रारंभ होईल. प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराची सर्वज्ञता दिसून येते ! हे फुल दोन्ही प्रकारे असे कार्यरत आहे हे स्वामी आमच्या जीवनाद्वारे दर्शवतात. हे फुल विवाह आणि अंत्यविधी अशा परस्परविरोधी प्रसंगांसाठी वापरले जाते. तथापि कोणाच्याही आयुष्यात हे दोन्ही प्रसंग एकाच वेळी आलेले नाहीत. स्वामी हे आमच्या जीवनाद्वारे दर्शवतात. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " आसक्तीविना प्रेम दिव्य आहे. हे दिव्यप्रेम म्हणजेच परमेश्वर. "

पुष्प ४७ पुढे सुरु

                     हे आम्ही इंटरनेटवर वाचले. आमच्या बाबतीत लिलि जिझसच्या पुनरूत्थानाचे प्रतिक नसून स्वामींच्या पुनरुत्थानाचे घोतक आहेत. स्वामींनी देह त्याग केला व ते आता पुन्हा नवीन देह धारण करून येत आहेत. माझी श्रद्धा, निर्मलता आणि पावित्र्य याद्वारे ते परत येतील. माझा देह अक्षत आहे. स्वामी म्हणाले माझ्या तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर माझे कौमार्य परतले. अशा तऱ्हेने मी माझे तारुण्य आणि निरागसता जपली. माझे सदाचरण, शुचिर्भूतता आणि सत्याचे तेज यांचे लिलि प्रतिनिधित्व करते. या सत्याचे तेज सहस्त्र दली कमल अशा माझ्या सहस्त्रारात फाकले. 
                     फूल नैसर्गिक सौंदर्य सुचित करते. आत्मा म्हणजे मनुष्याचे नैसर्गिक सौंदर्य होय. सर्वांनी आपले आत्मिक सौंदर्य जाणले पाहिजे. हे खरे सौंदर्य आहे. ही माझी तृष्णा आहे. ६ व्या विवाहदिनाचे प्रतिक असे हे फुल स्वामींनी मला ६० व्या विवाहदिनी भेट दिले. माझ्याशी वयाच्या १६ व्या वर्षी विवाह करून माझ्या ७६ व्या वर्षी स्वामीनी हे सत्य जगासमोर प्रकट केले. स्वर्गामध्ये स्वामींसमवेत मी स्वर्गीय आनंद अनुभवला ते अनुभव मी शुद्ध विचारांनी आणि प्रभावीपणे लिहिते. स्वामी सांगतात आणि मी लिहिते . हे भाव स्तूपाद्वारे बाह्यगामी होत तारका स्पंदने बनून सर्वांमध्ये प्रवेश करतात. भगवान सत्य साईंचे सत्य आणि वसंताचे प्रेम यांच्या संयोगाने सर्व ज्ञानी होतात. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम

रविवार, २४ जानेवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " परमेश्वराच्या सर्वज्ञ शक्तीने समस्त विश्वाला व्यापून टाकले आहे ." 

पुष्प ४७ पुढे सुरु 

                  आता आपण या विषयी पाहू. त्या हळदीच्या डबीत चंदनाची सुगंधी पावडर होती. ती डबी ऑफिसमध्ये कशी आली ? स्वामींनी मला ती पावडर अंगाला लावायला सांगितली. अनेक डॉक्टर मला पाहण्यासाठी आले परंतु कोणालाही माझ्या रोगाचे निदान झाले नाही. त्यांच्या औषधाने थोडासा आराम पडला परंतु मला पूर्ण बरे वाटले नाही. आम्ही इंटरनेटवर लिलीच्या फुलांविषयी अधिक माहिती मिळवली, ती खाली देत आहे. 
                   विवाह आणि अंत्यविधी यां दोन्हीसाठी वापरली जाणारी लिलीची फुले पाहून अनेकांनी हा प्रश्न विचारला की लिली कशाचे प्रतिक आहे ? ख्रिश्चन ईस्टर सर्व्हिस लिलीची फुले पुनरुत्थानाचे प्रतिक म्हणून वापरतात. ही शंकुच्या आकाराची लिलीची फुले ख्रिस्ताच्या मृत्युवरील विजयाची आगाऊ सूचना देणाऱ्या तुतारीचे प्रतिक आहे. तसेच ही फुले व्हर्जिन मेरीची निर्मलता, पावित्र्य आणि श्रद्धा यांचेही प्रतिक आहे. लिली म्हणजे वसंत, तारुण्य आणि निरागसता यांच्या पुनर्जन्माचे प्रतिक आहे. हे पांढरे पुष्प स्वच्छता, ऋजुता आणि कौमार्याचे प्रतिक आहे. अशां तऱ्हेने ही लिलीची फुले सत्याचे तेज आणि पावित्र्य यांचा निर्देश करत अभिजात लावण्य आणि सुसंस्कृतता यांचेही प्रतिनिधित्व करतात. लिलीची फुले विवाहाचे पारंपारिक चिन्ह आहे. पांढऱ्या शुभ्र लिलीचा अर्थ विचारांची शुद्धता व दिव्यानंदाची प्रभावी अभिव्यक्ती. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साई राम 

गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " जेव्हा आपण प्रत्येकावर आणि प्रत्येक गोष्टीवर प्रेम करू लागतो तेव्हा त्यातील प्राणिक उर्जा आपल्यामध्ये प्रवाहित होते आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या मुलभूत दिव्य शक्तीचा आपल्याला लाभ होतो. "

पुष्प ४७ पुढे सुरु 

दुपारचे ध्यान 
स्वामी - का अशी रडते आहेस ? 
वसंता - मला असे अनुभव नाहीत. त्यांना केवढा आनंद मिळालाय ! 
स्वामी - तुझ्यासारखा अनुभव कोणालाही नाही. त्यांचे केवळ बाह्य अनुभव आहेत तर तुझे अंतर्गत. 
वसंता - स्वामी मला अनुभवच नाही. ह्या लिखाणाचा काय उपयोग ? तुम्ही सुद्धा अजून आला नाहीत. 
स्वामी - मी नक्की येईन. 
वसंता - स्वामी आमचं सर्वाचं बोलण चाललं होतं की डेंटिस्टना बोलवावे की ENT डॉक्टरांना. 
स्वामी - डॉक्टरांना बोलावू नका. सर्व ठीक होईल. 
वसंता - आम्ही डॉ. विजय कुमार किंवा डॉ. रामस्वामींना भेटू का ? 
स्वामी - दोघ सारखेच आहेत. त्यांनी लिहून दिलेले औषध घे. 
वसंता - स्वामी तुम्ही सांगता का कोणते डॉक्टर व कोणते औषध ? तुम्ही येईपर्यंत माझ्या देहाच्या व्याधींवर उपाय म्हणून काहीतरी लिहून द्या. चंदनाच्या पावडरचे मी काय करू ? 
स्वामी - रात्री आणि दिवसा तुझ्या अंगाला लाव. 
वसंता - स्वामी, लिलिच्या फुलांचा अर्थ काय ? 
स्वामी - समस्त सत्य युग म्हणजे केवळ आपला विवाह. 
वसंता - आता मला समजले स्वामी. 
ध्यान समाप्त 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम

रविवार, १७ जानेवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

      " आपले भाव पूर्णतः परमेश्वरावर केन्द्रीत असायला हवे. 
आपण जे काही बोलतो, 
आपण जे काही खातो,
आपण जे काही विचार करतो, 
आपण जेथे जातो,
जर आपली दृष्टी परमेश्वरावर केन्द्रीत असेल तर जग आपल्याला स्पर्श करणार नाही."

वसंतामृतमाला 
पुष्प ४७ 
एकाच दिवशी अंतविधी आणि विवाह

                    मला बरे वाटत नव्हते. माझ्या डोक्यात पुन्हा पुटकुळ्या आल्या होत्या, व केसही गळत होते. आता काय करावे ? कोणत्या डॉक्टरांना दाखवावे ? आज स्वामींनी ५ लिलीच्या फुलांचा गुच्छ दिला. त्या फुलांना प्रत्येकी ५ पाकळ्या होत्या. त्यांनी एक हळदीची डबीही दिली परंतु डबीत चंदनाची पावडर होती. दुपारी मी सनातन सारथीचा जून महिन्याचा अंक वाचला. त्यामध्ये अनेक भक्तांनी त्यांच्या अनुभवांविषयी लिहिले होते. वाचन झाल्यावर मला रडू येऊ लागले, " मला असे अनुभव का आले नाहीत ? " सर्वांनी माझे सांत्वन केले.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम




     
   
 

गुरुवार, १४ जानेवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " जेव्हा आपण अखंड ईश चिंतनात असतो तेव्हा तेथे देह भावाला थारा नसतो. प्रेम आपला देह बनून जातो."

पुष्प ४६ पुढे सुरु 

                    ११ जून रोजी सकाळी अमरने माझे, ' साई गीता प्रवचनम् ' हे पुस्तक आणले. त्यातील ' कर्मयोग ' अध्यायातील काही ओळींना स्वामींनी कंस केला होता. 
                   " झोपून उठल्यावर सकाळी मी प्रार्थना करते की माझे हात सदैव देणारे असावेत. इतरांकडून घेणारे नसावेत. माझ्या पायांचा जमिनीला स्पर्श होण्याअगोदर मी जमिनीला स्पर्श करते व पृथ्वीमातेने तिची सहनशीलता मला द्यावी अशी तिच्याकडे प्रार्थना करते ." 
                    आपले हात, पाय आणि सर्व कर्मेंद्रियांचा आपण अशा पद्धतीने वापर केला पाहिजे. स्वामी येतील, मला बोलावतील, आम्ही एकमेकांशी बोलू, एकमेकांना पाहून स्पर्श करू, मग कलियुग सत्ययुगात परिवर्तित होईल. 

जय साईराम

व्ही. एस. 

रविवार, १० जानेवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " मन आणि इंद्रिये ईश्वराभिमुख करण्यासाठी कठोर साधना करणे अनिवार्य आहे."

पुष्प ४६ पुढे सुरु 

                  पंचेंद्रियांद्वारे निर्माण होणाऱ्या सर्व इच्छा  म्हणजे स्पर्शसंवेदना होय. पंचेंद्रिये मनाशी जोडलेली असतातपंचेंद्रियांनी स्पर्श केल्यावर मनात ज्या घडामोडी होतात त्याला स्पर्श संवेदना म्हणतात. मानवाने पंचेंद्रियांवर ताबा मिळविल्यानंतर त्याला सर्वोच्च गरुड लोक प्राप्त होतो. 
                  उर्ध्व भुवने उदराच्या वरच्या भागात असतात तर अधोभुवने पातळ लोकाचा  भाग असतात. ही  आपल्या बाह्य कृतींशी संबंधित असतात. त्यांवरही आपण अंकुश ठेवला पाहिजे. स्वामींचे व माझे भाव सर्वांमध्ये प्रवेशकरून त्यांच्या १४ भूवनांमध्ये कार्यरत झाले की  सर्व काही बदलेल.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

                                     जय साईराम  

गुरुवार, ७ जानेवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

             " जीवन कसे जगावे ? हे आपल्या हातात आहे. परमेश्वराच्या नव्हे.

पुष्प ४६ पुढे सुरु 

                   स्पर्श करणे याचा अर्थ केवळ हाताने नव्हे तर मन व इंद्रियांनी स्पर्श करणे हेही त्यात आले . मनाला हे भावते त्या सर्वांचा स्पर्श संवेदनेत समावेश होतो. 
स्पर्श संवेदना :
                  एक उदाहरण. आपण एखादी गोष्ट पाहिली की मन त्यावर विचार करते, " किती सुंदर !" एक मनुष्य एका घरावरून जात असता, आवारात एक गाडी पाहतो, त्या घरासमोरचा बगीचा पाहतो ; त्याला सर्व आवडते. ह्या सर्व गोष्टींना तो डोळ्यांनी स्पर्श करतो. हा नेत्र स्पर्श आहे. एखादी व्यक्ती एका मुलीविषयीचे बोलणे ऐकते. त्याला तिच्या विषयी अधिक जाणून घ्यावेसे वाटते. तसेच एखादा एका कंपनीविषयी ऐकतो, त्याच्या मनात ती कंपनी विकत घेण्याची इच्छा निर्माण होते. यां सर्व गोष्टी कानांना स्पर्श करतात. नासिका स्पर्शाविषयी म्हणजे उपभोगाविषयी आपण नंतर पाहू. ह्या सर्व गोष्टी वासना बनून संस्काररूपाने त्यांचे आपल्या मनावर खोल ठसे उमटतात. आपल्याला जे काही खावेसे वाटते ते सर्व जिव्हेचे संवेदन आहे. आपण दुसऱ्यांशी कठोर शब्दांत बोलतो, वादविवाद करतो, उणेदुणे काढतो. सर्व जिव्हा स्पर्शानर्गत येते. ही आहे स्पर्श संवेदना. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम
      

रविवार, ३ जानेवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

              " जर तुम्ही प्रत्येक गोष्ट परमेश्वराशी जोडली तर तुम्ही परमेश्वरच होऊन जाल. "

पुष्प ४६ पुढे सुरु 

                    यानंतर पाहू किन्नर लोक. हे संगीताचे विश्व आहे. किन्नर आणि किंपुरुष सदैव गायनात मग्न असतात. ते विविध वाद्येही वाजवतात. म्हणून कानांची तुलना किन्नर लोकाशी केली आहे. आपण मधुर संगीत ऐकले पाहिजे. परंतु मानव नेहमी भौतिक जगातील सिनेसंगीत वा वायफळ गप्पा ऐकतो. आपण सतत सत्संग ऐकून त्यात रमायला हवे. संत महात्म्यांची वचणे ऐका. चांगले ग्रंथ वाचा. स्वामींची पुस्तके सुमार्गदर्शक आहेत. त्यांच्या पुस्तकांत भगवत्  गीता, रामायण, महाभारत आणि भागवत या सर्व ग्रंथांचे सार आहे. ही पुस्तके आपण जरूर वाचायला हवीत. स्वामींच्या पुस्तकांत वेद आणि उपनिषदांचे सार आहे. आपल्याला मार्ग दाखविण्याकरिता परमेश्वर येथे अवतरला. म्हणून कानांचा वापर आपण अशा रीतीने केला पाहिजे. 
                     त्वचेशी संबंधित किंपुरुष हा अंतिमलोक आहे. त्वचा स्पर्श संवेदनेचे प्रतिक आहे. मानवी देह त्वचेचा आवरणाने झाकला आहे. परमेश्वराने हाडे, मांस, रक्त मज्जातंतू व स्नायू यांची प्रमाणबध्द मांडणी करून मानवी देहाची रचना केली व त्यावर त्वचेचे आवरण घातले. त्वचेशिवाय रूप नाही. त्वचा देहाचा आधार आहे. स्पर्श संवेदना हे त्वचेचे अजून एक उद्दिष्ट आहे. माणूस जगातील प्रत्येक गोष्टीला स्पर्श करतो. त्याचा जन्माचे कारण हे आहे.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम