गुरुवार, ७ जानेवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

             " जीवन कसे जगावे ? हे आपल्या हातात आहे. परमेश्वराच्या नव्हे.

पुष्प ४६ पुढे सुरु 

                   स्पर्श करणे याचा अर्थ केवळ हाताने नव्हे तर मन व इंद्रियांनी स्पर्श करणे हेही त्यात आले . मनाला हे भावते त्या सर्वांचा स्पर्श संवेदनेत समावेश होतो. 
स्पर्श संवेदना :
                  एक उदाहरण. आपण एखादी गोष्ट पाहिली की मन त्यावर विचार करते, " किती सुंदर !" एक मनुष्य एका घरावरून जात असता, आवारात एक गाडी पाहतो, त्या घरासमोरचा बगीचा पाहतो ; त्याला सर्व आवडते. ह्या सर्व गोष्टींना तो डोळ्यांनी स्पर्श करतो. हा नेत्र स्पर्श आहे. एखादी व्यक्ती एका मुलीविषयीचे बोलणे ऐकते. त्याला तिच्या विषयी अधिक जाणून घ्यावेसे वाटते. तसेच एखादा एका कंपनीविषयी ऐकतो, त्याच्या मनात ती कंपनी विकत घेण्याची इच्छा निर्माण होते. यां सर्व गोष्टी कानांना स्पर्श करतात. नासिका स्पर्शाविषयी म्हणजे उपभोगाविषयी आपण नंतर पाहू. ह्या सर्व गोष्टी वासना बनून संस्काररूपाने त्यांचे आपल्या मनावर खोल ठसे उमटतात. आपल्याला जे काही खावेसे वाटते ते सर्व जिव्हेचे संवेदन आहे. आपण दुसऱ्यांशी कठोर शब्दांत बोलतो, वादविवाद करतो, उणेदुणे काढतो. सर्व जिव्हा स्पर्शानर्गत येते. ही आहे स्पर्श संवेदना. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा