गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " आसक्तीविना प्रेम दिव्य आहे. हे दिव्यप्रेम म्हणजेच परमेश्वर. "

पुष्प ४७ पुढे सुरु

                     हे आम्ही इंटरनेटवर वाचले. आमच्या बाबतीत लिलि जिझसच्या पुनरूत्थानाचे प्रतिक नसून स्वामींच्या पुनरुत्थानाचे घोतक आहेत. स्वामींनी देह त्याग केला व ते आता पुन्हा नवीन देह धारण करून येत आहेत. माझी श्रद्धा, निर्मलता आणि पावित्र्य याद्वारे ते परत येतील. माझा देह अक्षत आहे. स्वामी म्हणाले माझ्या तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर माझे कौमार्य परतले. अशा तऱ्हेने मी माझे तारुण्य आणि निरागसता जपली. माझे सदाचरण, शुचिर्भूतता आणि सत्याचे तेज यांचे लिलि प्रतिनिधित्व करते. या सत्याचे तेज सहस्त्र दली कमल अशा माझ्या सहस्त्रारात फाकले. 
                     फूल नैसर्गिक सौंदर्य सुचित करते. आत्मा म्हणजे मनुष्याचे नैसर्गिक सौंदर्य होय. सर्वांनी आपले आत्मिक सौंदर्य जाणले पाहिजे. हे खरे सौंदर्य आहे. ही माझी तृष्णा आहे. ६ व्या विवाहदिनाचे प्रतिक असे हे फुल स्वामींनी मला ६० व्या विवाहदिनी भेट दिले. माझ्याशी वयाच्या १६ व्या वर्षी विवाह करून माझ्या ७६ व्या वर्षी स्वामीनी हे सत्य जगासमोर प्रकट केले. स्वर्गामध्ये स्वामींसमवेत मी स्वर्गीय आनंद अनुभवला ते अनुभव मी शुद्ध विचारांनी आणि प्रभावीपणे लिहिते. स्वामी सांगतात आणि मी लिहिते . हे भाव स्तूपाद्वारे बाह्यगामी होत तारका स्पंदने बनून सर्वांमध्ये प्रवेश करतात. भगवान सत्य साईंचे सत्य आणि वसंताचे प्रेम यांच्या संयोगाने सर्व ज्ञानी होतात. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा