रविवार, ३ जानेवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

              " जर तुम्ही प्रत्येक गोष्ट परमेश्वराशी जोडली तर तुम्ही परमेश्वरच होऊन जाल. "

पुष्प ४६ पुढे सुरु 

                    यानंतर पाहू किन्नर लोक. हे संगीताचे विश्व आहे. किन्नर आणि किंपुरुष सदैव गायनात मग्न असतात. ते विविध वाद्येही वाजवतात. म्हणून कानांची तुलना किन्नर लोकाशी केली आहे. आपण मधुर संगीत ऐकले पाहिजे. परंतु मानव नेहमी भौतिक जगातील सिनेसंगीत वा वायफळ गप्पा ऐकतो. आपण सतत सत्संग ऐकून त्यात रमायला हवे. संत महात्म्यांची वचणे ऐका. चांगले ग्रंथ वाचा. स्वामींची पुस्तके सुमार्गदर्शक आहेत. त्यांच्या पुस्तकांत भगवत्  गीता, रामायण, महाभारत आणि भागवत या सर्व ग्रंथांचे सार आहे. ही पुस्तके आपण जरूर वाचायला हवीत. स्वामींच्या पुस्तकांत वेद आणि उपनिषदांचे सार आहे. आपल्याला मार्ग दाखविण्याकरिता परमेश्वर येथे अवतरला. म्हणून कानांचा वापर आपण अशा रीतीने केला पाहिजे. 
                     त्वचेशी संबंधित किंपुरुष हा अंतिमलोक आहे. त्वचा स्पर्श संवेदनेचे प्रतिक आहे. मानवी देह त्वचेचा आवरणाने झाकला आहे. परमेश्वराने हाडे, मांस, रक्त मज्जातंतू व स्नायू यांची प्रमाणबध्द मांडणी करून मानवी देहाची रचना केली व त्यावर त्वचेचे आवरण घातले. त्वचेशिवाय रूप नाही. त्वचा देहाचा आधार आहे. स्पर्श संवेदना हे त्वचेचे अजून एक उद्दिष्ट आहे. माणूस जगातील प्रत्येक गोष्टीला स्पर्श करतो. त्याचा जन्माचे कारण हे आहे.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम  
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा