रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 
 
            " भगवंताशी ऐक्य म्हणजे योग. अखंड (२४ तास ) नामस्मरणाने हा योग साध्य होतो."

प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 

                 स्वामींनी मला विश्वाचे वैकुंठामध्ये परिवर्तन करण्याच्या कार्यात सहभागी करून घेतल्यापासून, माझ्या हृदयातून प्रेमामृत ओसंडत आहे. सर्वांना मुक्ती मिळण्याची हमी हीच माझी तृष्णा आहे. या भव्यदिव्य कार्यासाठी अशा साधना आवश्यक आहेत. 
                 मुक्ती निलयम आश्रमाच्या पायावर विश्वामध्ये परिवर्तन घडून सत्ययुगाची पहाट होणार आहे. 
                 आश्रमासाठी जमीन खरेदी करताना आगाऊ रक्कम देण्याअगोदर स्वामींची अनुमती व आशीर्वाद घेण्यासाठी वेदिकेवर एक पत्र ठेवण्यात आले होते. त्याच्यावर पदचिन्ह उमटले. स्वामी म्हणाले, "आगाऊ रक्कम द्या. मी माझे पहिले पाऊल जमिनीवर टाकले आहे. "
                  जागेचे पैसे २२ जून २००२ ह्या दिवशी दिले. आठ आठवड्यानंतर आम्ही भूमीपूजा केली. आरतीच्या वेळेस स्वामी साक्षात होऊन माझ्या समोर उभे राहिले. " स्वामी !स्वामी !" हाका मारत मी अश्रूंमध्ये बुडाले. कार्यक्रमास आलेल्या सर्वांना मी सांगितले, "स्वामी इथे प्रत्यक्ष सदेह उभे आहेत." स्वामी जिथे उभे होते ती जागा, आरती झाल्यांनतर मी सर्वांना दाखवली. मऊशार मातीमध्ये स्वामींची पदचिन्हे स्पष्टपणे उमटली होती ! आम्ही सर्वांनी वाकून नमस्कार केला. आश्रमाच्या मातीवरील स्वामींनी ठेवलेल्या पहिल्या पावलांची आठवण म्हणून स्वामींच्या पदुकांसाठी एक वेदिका बांधावी असे आम्ही ठरवले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा