ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जीवनामध्ये कितीही दुःख, क्लेश वा अडचणी आल्या तरी प्रभूचरण धरून ठेवणे हे जीवनाचे एकमेव ध्येय असायला हवे. "
प्रकरण अकरा
वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम
सकाळी आम्ही दिल्लीहून मथुरा वृंदावनला जायला निघालो. मुक्ती निलयमचे सर्वजण येऊन आम्हाला सामील झाले. संध्याकाळी आम्ही बाँके बिहारी मंदिरात गेलो.
त्या मंदिराच्या अरुंद गल्लीतून जात असताना माझ्या मनात विचार घोळत होते,' स्वामी मला इथं का बरं घेऊन आले आहेत ? ते काय करणार आहेत ? ' तेवढ्यात अचानक बाजूच्या छोट्याश्या गल्लीतून एक लग्नाची वरात आमच्या समोर आली. बँड वाजत होता. त्याच्यामागे नटून थटून आलेल्या लोकांचा एक घोळका हातामध्ये रंगीबेरंगी छत्र्या घेऊन नृत्य करत होता. त्यांच्या आनंदमय गीतांचे आवाज आमच्या कानावर पडले. " हे प्रिय राधे, कृष्ण तुला बोलावतो आहे." वधूवर मात्र कुठे दिसत नव्हते. आम्हीही आनंदाने त्यांच्या मागोमाग गेलो. मंदिरासमोरच पोहोचलो आणि काय आश्चर्य ! हे मंदिर आहे का लग्नमंडप ?
प्रत्येक प्रवेशद्वाराच्या खांबांना केळीची पाने बांधण्यात आली होती. प्रत्येक दारावर आंब्याची डहाळी लावण्यात आली होती. विविधरंगी सुवासिक पुष्पमालांचा सुगंध आसमंतात भरून राहिला होता.
लग्नाच्या आदल्या दिवशी जसे संध्याकाळी वधूला कार्यालययात घेऊन येतात, अगदी तेच दृश्य होते. मला वाटले : लहानपणापासून उराशी बाळगलेले, परमेश्वराशी लग्न करण्याचे स्वप्न आता सत्यात उतरते आहे. माझ्या हृदयाचे गुपित या मंदिरामध्ये सर्वांना नाट्यरूपात पहायला मिळणार आहे.
माझ्याबरोबर आलेल्या सर्व भक्तांना नवल वाटले. मंदिराच्या आतील दृश्य पाहून तर आम्ही भारावून गेलो. असंख्य पुष्पमालांनी सुशोभित केलेला मंदिराचा अंतर्भाग विविध रंगांनी झगमगत होता. जिकडे पहावे तिकडे फुलेच फुले ! मंदिराचे पुजारी सर्वांच्या अंगावर तीर्थ शिंपडत होते. विवाहाची किती सुंदर तयारी !
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा