ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराशी तादात्म्य पावलेले मन परमेश्वरच होऊन जाते."
प्रकरण अकरा
वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम
आजचा दिवस माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा सुवर्णदिन ! मी सकाळी लवकरच स्नान केले आणि स्वामींनी सुचवलेली गुलाबी रंगाची साडी नेसले.
ध्यान पहाटे ४ वाजता
दिव्य दृश्य
मी स्वर्गलोकामध्ये होते. स्त्रियांनी मला रत्नालंकार व बांगड्या घालून सजवले. माझ्या हातावर मेंदी काढली. पार्वतीने मला हार घातला आणि सभागृहाकडे नेले. नवरा मुलगा भगवान श्रीकृष्ण माझ्यासमोर बसले. ब्रम्हदेव स्वतः यज्ञविधी करत होते. मी राधेच्या देहात होते आणि माझे भाव वसंताचे होते . विवाहविधी पार पडले. होमाग्नीमधून अग्निदेवांनी मंगळसूत्र आणून एका तबकमध्ये ठेवले, ते सर्वांना दाखवून त्यांचे आशीर्वादही घेतले. ब्रम्हदेवाने ते तबक हातात घेतले व वेदिक मंत्रांचे उच्चारण केले. वसुदेव, देवकी तसेच राधेचे मातापिताही या सोहळ्यास उपस्थित होते. कन्यादानाचा विधी झाला. श्रीकृष्णाने राधेच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. वधूवरांनी एकमेकांना हार घालून पवित्र अग्नीभोवती फेरे घेतले. ब्रम्हदेव म्हणाले, " द्वापारयुगामध्ये त्यांचा विवाह झाला नाही. आता ऋषी, मुनी, संत, देवगण यांच्या समक्ष हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. भूतलावरील लोकांसह जे कोणी इथे हजर आहेत ते या विवाहाचे साक्षीदार आहेत. श्रीकृष्ण हा सर्वांमधील आत्मा आहे व राधा कृष्णाचा आत्मा आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा