ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" निरंतर ईशचिंतन हीच खरी भक्ती."
प्रकरण बारा
पंढरपूर
ऑक्टोबर २००२ साली मुक्ती निलयमच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी आम्ही ' शुद्ध सत्व ' इमारतीमध्ये यज्ञ केला. यज्ञात समिधा अर्पण करताना प्रत्येकवेळी मी म्हणत होते," स्वामी, तुम्ही पूर्णाहुती म्हणून माझा स्वीकार करून जगाला मुक्ती द्या. " आम्ही जेव्हा यज्ञात पूर्णाहुती दिली तेव्हा मी स्वतःस अग्नीला अर्पण करण्याचा प्रयत्न केला. परंतु एस. व्हीं. नी मला मागे ओढले. त्या वेळी माझा हात भाजला होता.
ऑस्ट्रेलियाच्या लुईसने माझे आणि स्वामींचे एकेक चित्र काढून मला दिले होते. आम्ही ते त्या दिवशी वेदिकेवर ठेवले होते. दुसऱ्या दिवशी त्यातील स्वामींच्या आणि माझ्या चित्रावर भाजल्याच्या खुणा आम्हाला दिसल्या. ध्यानात स्वामी म्हणाले," जे जे काही तुझ्या बाबतीत घडेल ते सर्व माझ्याही बाबतीत घडेल. आपण दोघं एक आहोत. "
एकदा गीता माझ्या हातात काचेच्या बांगड्या भरत असताना माझ्या हाताला बांगडीची काच लागली आणि रक्त आले. रक्ताचा रंग भगवा होता. त्यादिवशी संध्याकाळी माझ्या कॉटवरील स्वामींच्या फोटोतील बोटांवर कापल्याच्या खुणा दिसल्या, तसेच कॉटवर आणि उशीवर रक्ताचे काही थेंबही दिसले.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा