ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराचे साम्राज्य तुमच्या प्रतिक्षेत असताना ऐहिक साम्राज्याची इच्छा कशाला ? "
प्रकरण बारा
पंढरपूर
त्यानंतर स्वामी कोडाईकॅनलहून व्हाईटफिल्डला गेले. मी स्वामींना विचारले, " स्वामी, मी व्हाईटफिल्डला येऊ का ? " स्वामी म्हणाले," नको. तू येऊ नकोस." स्वामी ४ जूनपर्यंत दर्शन देणार नसल्याचे बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितले. त्यांनतर आम्हाला एक फोन आला, की स्वामींचे ऑपरेशन झाले आहे. त्यांनतर बऱ्याच जणांकडून ही बातमी खरी असल्याचे समजले. प्रत्येक फोनगणिक दुःखाचे कढ अनावर होऊन मी आक्रोश करत होते. स्वामींनी नंतर मला सांगितले," जगाच्या कर्मांचा संहार करण्यासाठी मी हे सोसतो आहे."
माझ्या अश्रूंना अंत नव्हता. काही दिवसानंतर मुक्ती निलयममधील, पुरुषभर उंचीचा स्वामींचा फोटो खाली पडला. कृष्णाच्या मूर्तीचा मुकुटू तुटला व त्याच्या हनुवटीलाही भेग पडली. मी एक महिना सतत रडत होते. त्यावेळी आम्ही स्वामींच्या फोटोवर रक्ताश्रू पाहिले.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा