रविवार, २८ जानेवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

           " विनयशीलता, निरहंकारी मन आणि अढळ श्रद्धा  या गुणांसहित मार्गक्रमण करणाऱ्यास निश्चित यशप्राप्ती होते."

प्रकरण तेरा

मुक्ती स्तूप

                प्रथम मुरुगन भगवानांचे सहा कलश आणले गेले. मी स्तूपावर त्या पवित्र जलाचा अभिषेक करण्यास सुरुवात केली.
                " या पवित्र जलामध्ये येण्यासाठी मी माझ्या सर्व शक्तींचा धावा करत आहे. वैश्विक मुक्तीसाठी मी माझ्या तपातून प्राप्त झालेल्या सर्व शक्तींचा धावा करत आहे. आता हा स्तूप वैश्विक मुक्तीसाठी कार्य करो. स्वामी, तुम्ही आला नाहीत. तुम्ही मला मंगळसूत्र दिले नाहीत. तुम्ही मला मंगळसूत्र दिले नाहीत. स्वामी, या ना, तुम्ही या ना ! " माझे मन आक्रंदत होते..... डोळ्यात अश्रूधारा. अचानक मला स्वामींचा आवाज ऐकू आला. 
स्वामी - तू माझे रूप कोठे शोधत आहेस ? ही सर्व माझीच रूपे आहेत, नाही का ? वाळूच्या कणापासून ते आकाशापर्यंत प्रत्येक गोष्टीत तू मला पाहातेस, मग याहून आणखी वेगळ्या रूपाचा तू का शोध घेत आहेस ?
वसंता - स्वामी, मला क्षमा करा. या चांदणीजवळ उभी राहून, उंचावरून माझ्या सभोवताली असणाऱ्या प्रत्येक गोष्टीत मी तुमचे वैश्विक रूप पहाते आहे. प्रत्येकजण स्वामींचेच रूप आहे. सर्वव्यापक स्वामी ! 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम 

गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

          " आत्मसाक्षात्कारी जीव निर्वात जागी ठेवलेल्या दीपाच्या स्थिर आणि दैदिप्यमान ज्योतीसारखा सदैव तेजाने तळपत असतो."

प्रकरण तेरा

मुक्ती स्तूप

              माझ्यामध्ये विश्वास भरून उरला. मुख्य पुरोहित, एस.व्ही. आणि मी, आम्ही पुढे चालत होतो. एस. व्हीं. नी स्वामींच्या पादुका घेतल्या होत्या, मागोमाग कलश घेतलेले सर्वजण येत होते. समोर बसलेले वादक नादस्वरम आणि मेलम ही मंगलवाद्ये वाजवत होते. मनाशी दृढ संकल्प करून मी निर्धाराने निघाले. मी स्वतः शक्ती आहे. माझी शक्ती पूर्णत्वाने स्तूपामध्ये यावी म्हणून मी धावा केला. मी तीन पायऱ्या चढले. नंतर मला चढणे मला अवघड जाऊ लागले. मी कलश एस. व्ही. कडे देऊन नागमोडी लाकडी जिना चढू लागले. मी वरती पोहोचल्यावर पुरोहितांनी गरुड मंत्र उच्चारला. मी त्या चांदणीच्या समोरच उभी होते आणि आकाशात स्वामींना शोधात होते. दोन मोठे काळे गरुड पक्षी स्तूपाच्या आणि यज्ञशालेच्या वरती घिरट्या घालत होते. ज्यादिवशी स्तुपावर चांदणी बसवली, त्यादिशी हेच गरुडपक्षी स्तूपाभोवती घिरट्या घालत होते. ते ब्रम्हाम्बिका शक्तीचे प्रतीक आहेत. श्री शैलममधील शक्तीचे नाव ब्रम्हाम्बिका आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

मंगळवार, २३ जानेवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

       २३ ऑक्टोबर २०१७ रोजी श्री वसंतसाई अम्मांनी ८० व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त जानेवारी २०१८ पासून दर महिन्याच्या २३ तारखेला श्री वसंतसाईंच्या ज्ञानभांडारातून वेचक मोत्यांची मालिका वाचकांसाठी सादर केली जाईल
                त्या मालिकेसाठी २३ तारीख का निवडली ? ह्याचे स्पष्टीकरण श्री वसंतसाईंच्या शब्दात खाली देत आहे :-
                " आपल्या शरीरातील जननपेशींचा अपवाद वगळता प्रत्येक पेशीमध्ये ४६ गुणसूत्रे असतात. बीजांडामध्ये पुरुष आणि स्त्री ह्यांच्या जननपेशींमध्ये प्रत्येकी २३ गुणसूत्रे असतात. बीजांडामध्ये पुरुषांच्या २३ गुणसूत्रांचा स्त्रीच्या २३ गुणसूत्रांबरोबर संयोग होतो व त्याची ४६ गुणसूत्रांसमवेत वाढ होते . स्वामींचा आणि माझा दोघांचा जन्म दिनांक २३ आहे. ह्याचा गर्भितार्थ काय ?  "
                 हे स्वामींच्या आणि माझ्या मधील गुणसूत्रांचा संबंध दर्शवण्यासाठी आहे. विराट पुरुष विभाजित होऊन आम्ही दोघे अवतरलो आहोत. पुरुषांची २३ गुणसूत्रे पुरुष तत्वाचे प्रतिनिधित्व करतात. स्त्रीची २३ गुणसूत्रे प्रकृती तत्वाचे प्रतिनिधित्व करतात. जेव्हा आमच्या दोघांच्या गुणसूत्रांचा भावनिक स्तरांवर संयोग होतो तेव्हा ४६ गुणसूत्रांद्वारे नवनिर्मिती होते. 
                निर्मितीच्या सुरूवातीस विराट पुरुषाचा उद्भव होतो. तो परमेश्वराच्या स्त्री आणि पुरुष तत्वाचे अंग असून ते आलिंगन अवस्थेत असते. त्यापासून स्त्री आणि पुरुष अशी व्यक्तिमत्व वेगळी होतात  व निर्मितीस प्रारंभ होतो. आम्ही दोघांनीही नवनिर्मितीसाठी, सत्ययुगासाठी जन्म घेतला आहे. 

मोती पहिला 

वसंता - स्वामी, तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर माणसे का निर्माण केलीत आणि त्यांना इच्छा आणि मोह ह्यांच्या दलदलीत अडकण्यास का भाग पाडलेत ? प्रत्येक जीव दुःख भोगतो आहे ! 
स्वामी - प्रत्येक जीव त्याच्या इच्छापूर्तीसाठी जगामध्ये भ्रंमती करत असतो. मी त्यांना, ' तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खेळा ' असे सांगून त्यांच्या खेळाचे अवलोकन करतो. सरतेशेवटी जीव दमून भागून व कंटाळून एक दिवस परमेश्वरचा धावा करतो. त्यावेळी मी धावत जाऊन त्याला मदत करतो. 
वसंता - तुम्हाला ह्यातून काय लाभ होतो, स्वामी ? 
स्वामी - हा माझा खेळ आहे. 
वसंता - हा काय खेळ ? तुम्हाला कंटाळा येत नाही का, स्वामी ? 
स्वामी - जेव्हा मला कंटाळा येतो तेव्हा मी प्रलय घडवून समस्त जगाचा नाश करतो व योगनिद्रेत जातो. 
वसंता - मनुष्याला योगनिद्रा प्राप्त करणे शक्य आहे का ? 
स्वामी - जर तुम्ही झोपेमध्ये परमेश्वराच्या विचारांमध्ये बुडून गेला असाल तर तुमच्या झोपेचे योगामध्ये रूपांतर होऊ शकते. प्रत्येक कर्माचे योगामध्ये रूपांतर होऊ शकते. वाचणे, बसणे, चालणे, खाणे, झोपणे आणि काम करणे सर्वांचा योग होऊ शकतो. असे केल्याने जीवन योग बनून जाते. तुझे जीवन योग आहे . प्रत्येक क्षण परमेश्वराच्या विचारात घालवल्यास तो योग बनतो. 
वसंता - स्वामी ! सर्वांना ज्ञानाची भूक व आध्यात्मिक तृष्णा असते. तथापि ते समजूनही मनुष्य परमेश्वराकडे आपल्या स्वास्थ, संपत्ती, संतती, नौकरी, विवाह आणि इतर भौतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रार्थना करतो. बहुतांशी लोक परमेश्वराकडे व्यक्तिगत समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रार्थना करताना दिसतात. परमेश्वर प्राप्तीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करणाऱ्यांची संख्या आजकाल खूपच कमी आहे. 
स्वामी - तुझ्या सारखे परमेश्वरासाठी परमेश्वराची प्रार्थना करणारे खूप कमी आहेत. " मला तुम्ही हवेत, मला फक्त तुम्ही हवेत " ही तुझी प्रार्थना आहे. ही अनन्य प्रेमभक्ती आहे. परमेश्वराशिवाय अन्य काही नको अशी अवस्था. असे लोकं केवळ त्याचा ध्यास घेऊन त्याच्यासाठी अश्रू ढाळून त्याची कृपा प्राप्त करतात. अशा भक्तांची भक्ती हेच केवळ परमेश्वराचे अन्न आहे. त्याचा आधार आहे. 
वसंता - अर्जुनाने, स्थितप्रज्ञाची लक्षणे विचारल्यावर, ' जो सदैव ज्ञानामध्ये स्थित असतो तो स्थितप्रज्ञ ' असे आपण त्याला सांगितले. त्याचप्रमाणे आपण मला प्रेमभक्तीची लक्षणे सांगा ना. ज्यांच्या अंतर्यामी प्रेम आहे ते कसे बोलतील, कसे आचरण करतील ? ते कसे असतील ? 
स्वामी - त्यांना एक क्षणही परमेश्वराचे विस्मरण होणार नाही. ते केवळ परमेश्वराविषयी बोलतील. त्याच्या विषयीच श्रवण करतील. परमेश्वराच्या विचाराशिवाय ते एक क्षणभरही जगू शकणार नाहीत. त्यांच्या सर्व कर्मांचा केंद्रबिंदू परमेश्वरच असेल. अन्नग्रहण व निद्रा ह्या क्रियाही ते परमेश्वराप्रीत्यर्थ करतील. प्रत्येक कर्म परमेश्वराच्या विचारात केल्याने त्यांचे जीवन एक यज्ञ बनून जाईल. परमेश्वर त्यांचा एकमेव सागासोयरा असेल. ते कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या मार्गावरून कधीही ढळणार नाहीत वा त्यांच्या ध्येयापासून त्यांची दृष्टी हटणार नाही. ह्या जगातील कोणतीही गोष्ट त्यांना आकर्षित करू शकणार नाही. ते त्यांचे वेगळे विश्व निर्माण करून परमेश्वरासोबत जीवन जगतील. ते त्यांच्या पंचेंद्रियांद्वारे केवळ परमात्म्यालाच पाहतील. त्यांची इंद्रिये बाह्य जगतात भ्रमंती करणार नाहीत. त्यांना पंचमहाभूतांद्वारे दिव्य संदेश मिळतील. टी. व्ही. , रेडिओ, पुस्तके, वर्तमानपत्र ह्या सर्व गोष्टींमध्ये ते केवळ परमेश्वरालाच पाहतील. त्यांना नानाविध मार्गांनी परमेश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती होईल. त्यांच्या मनात उत्पन्न झालेल्या प्रत्येक प्रश्नाचे तात्काळ उत्तर मिळेल.  
... 
श्री वसंतासाईंच्या ' Liberation Here Itself Right Now Part -1' ह्या पुस्तकातून


जय साईराम  

रविवार, २१ जानेवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" परमेश्वरास प्राप्त करून घेणे हा मनुष्याचा सर्वोच्च धर्म आहे."

प्रकरण तेरा 

मुक्तु स्तूप 

              आरतीनंतर आम्ही मुक्ती स्तूपापाशी पूर्णाहुती देण्यासाठी जाऊ लागलो. सर्व पुरोहित आपापल्या डोक्यावर कलश ठेवून रांगेत उभे होते. त्यांनी मला मुख्य कलश थोडा वेळ धरून त्यानंतर एस. व्ही. कडे देण्यास सांगितले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" बंध वा मुक्ती, दोन्हींसाठी केवळ भाव जबाबदार असतात."

प्रकरण तेरा 

मुक्ती स्तूप 

              अशातऱ्हेने मी स्वामींची अखंड प्रार्थना करत होते. सरतेशेवटी पुरोहितांनी प्रत्येक यज्ञकुंडात पूर्णाहुती दिली. ती का पूर्णाहुती होती ? मी तर स्वतःलाच आरतीमध्ये समर्पित केले. हे प्रभू साईश्वरा, माझा पूर्णाहुती म्हणून स्वीकार करून वैश्विक मुक्ती प्रदान करा. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

शनिवार, १३ जानेवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" जन्म म्हणजे काय ? मागील जन्माचा पुढे चालू राहणार भाग."

प्रकरण तेरा 

मुक्ती स्तूप 

             " पहा ! आम्ही यज्ञशाळेपाशी पोहोचलो, स्वामींच्या पादुका खुर्चीवर ठेवल्या, त्याक्षणी माझ्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. एक भाव माझ्या अंतरंगातून उसळी मारून वर आला, त्याने माझ्या निःशब्दतेला शब्द दिला," स्वामी !"..... मला बाकी कसलीही जाणीव उरली नव्हती. माझ्या सभोवताली काय चालले आहे; माझ्या जवळ कोण आहे, याची मला संज्ञा नव्हती. 
              कळकळीच्या प्रार्थनांसहित यज्ञविधी सुरु झाले. मी पुरोहितांच्या सांगण्यानुसार विधी करत होते. वैश्विक मुक्ती मागताना माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या लाटांवर लाटा वहात होत्या. मनाच्या एका कोपऱ्यात विचार डोकावत होते. " यज्ञकुंडातून मंगळसूत्र येईल का ? कसे येईल ? स्वामींनी तर मला आजच मंगळसूत्र देण्याचे वचन दिले आहे.
             मग मी विचार केला," नको, नको. मला दुसरे काही नको."


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम    

गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " परमेश्वर प्राप्तीची इच्छा तुम्हाला मुक्त करते. भौतिक कामना तुमच्यासाठी बंधने निर्माण करते." 

प्रकरण तेरा 

मुक्ती स्तूप 

                लोकांचा खूप मोठा जमाव आमची प्रतिक्षा करत होता. साश्रू नयनांनी मी पावले टाकत होते. माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा तो क्षण ! वैश्विक मुक्तीसाठी मी संपूर्ण आयुष्यभर खडतर तप केले. माझ्या तपाची परिपूर्ती करणारा हा आजचा मंगल दिन ! भगवान श्री सत्य साई बाबांच्या अवतारकार्यास कलाटणी देणारी ही ऐतिहासिक घटना भारतमातेच्या ह्या शांत आणि दुर्गम कोपऱ्यात घडत आहे. ह्या दोन दिवसांमध्ये मला कोणीही स्पर्श करू नये असे पुरोहितांनी सांगितले. माझ्या बरोबर फक्त एस. व्ही. होते. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम    

रविवार, ७ जानेवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " जर आपले मन परमेश्वरावरील प्रेमाने परिपूर्ण असेल तर क्रोध, द्वेष, मत्सर यासारखे भाव आपल्याला स्पर्श करत नाहीत." 

प्रकरण तेरा 

मुक्ती स्तूप 

मुक्ती स्तूपाचे उद्घाटन 
                गेल्या तीन दिवसांपासून देश विदेशातून लोक यायला लागले आहेत. त्यातही काही विदेशी भक्त तर आधीच या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आलेले आहेत. मुक्ती स्तूपाची प्राणप्रतिष्ठा २ सप्टेंबर २००६ रोजी करण्याचे योजिले आहे. शेवटच्या नाडीमध्ये पूजा कशी करावी हे सांगितले आहे. एवढेच नाही तर प्रत्येक  यज्ञकुंडासाठी कोणती वेगवेगळी फुले वापरावीत याचाही उल्लेख आहे. यज्ञासाठी नऊ नवशक्ती कुंड आणि सहा मुरुगन कुंड स्थापण्यात आली. एक कुंड महालक्ष्मीसाठी उभारले गेले. सोळा यज्ञकुंडांमध्ये वेदिक विधी करण्यात येणार होते. 
२ सप्टेंबर २००६ 
                 पहाटे ५:३० वाजताच उत्सवाची धामधूम सुरु झाली. स्वामींनी ह्या दिवशी नेसण्यासाठी दिलेली निळ्या रंगाची साडी मी परिधान केली. प्रार्थना गृहातून स्वामींच्या पादुका नेताना माझे अनावर अश्रू गालांवरून ओघळत होते. आम्ही बाहेर आलो. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, ४ जानेवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
 
सुविचार
 
           " पंचेंद्रियांद्वारे मिळालेल्या सुखसोयींविषयी निरिच्छा दर्शवून पंचेंद्रियांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते."
 
प्रकरण तेरा

मुक्ती स्तूप 
 
                मी म्हणाले, " स्तूपाच्या पायामध्ये, राधेचे १९ दैवी गुण, जगातील पवित्र स्थानांमधले पवित्र जल, माती व वाळू आहे. हे सर्व एकजीव बनले आहे. आता जगामध्ये देश, धर्म, जात, वंश असा कोणताही भेदभाव उरला नाही. इथे फक्त एकच पृथ्वी आहे. एकच दिव्य रेती आहे, सत्ययुगाची दिव्य रेती.
               दोन वर्षे अपार मेहनतीचे दगडकाम चालू होते. त्यांनतर १२ फेब्रुवारी २००६ रोजी स्तंभांचे दगडबांधणीचे काम सुरु झाले. महिन्यानंतर दगडामध्ये कोरलेले सहस्त्र दलाचे कमल आणि वरती चांदणी असलेला स्तंभ तयार तयार झाला. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम