ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जर आपले मन परमेश्वरावरील प्रेमाने परिपूर्ण असेल तर क्रोध, द्वेष, मत्सर यासारखे भाव आपल्याला स्पर्श करत नाहीत."
प्रकरण तेरा
मुक्ती स्तूप
गेल्या तीन दिवसांपासून देश विदेशातून लोक यायला लागले आहेत. त्यातही काही विदेशी भक्त तर आधीच या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आलेले आहेत. मुक्ती स्तूपाची प्राणप्रतिष्ठा २ सप्टेंबर २००६ रोजी करण्याचे योजिले आहे. शेवटच्या नाडीमध्ये पूजा कशी करावी हे सांगितले आहे. एवढेच नाही तर प्रत्येक यज्ञकुंडासाठी कोणती वेगवेगळी फुले वापरावीत याचाही उल्लेख आहे. यज्ञासाठी नऊ नवशक्ती कुंड आणि सहा मुरुगन कुंड स्थापण्यात आली. एक कुंड महालक्ष्मीसाठी उभारले गेले. सोळा यज्ञकुंडांमध्ये वेदिक विधी करण्यात येणार होते.
२ सप्टेंबर २००६
पहाटे ५:३० वाजताच उत्सवाची धामधूम सुरु झाली. स्वामींनी ह्या दिवशी नेसण्यासाठी दिलेली निळ्या रंगाची साडी मी परिधान केली. प्रार्थना गृहातून स्वामींच्या पादुका नेताना माझे अनावर अश्रू गालांवरून ओघळत होते. आम्ही बाहेर आलो.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा