ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आत्मसाक्षात्कारी जीव निर्वात जागी ठेवलेल्या दीपाच्या स्थिर आणि दैदिप्यमान ज्योतीसारखा सदैव तेजाने तळपत असतो."
प्रकरण तेरा
मुक्ती स्तूप
माझ्यामध्ये विश्वास भरून उरला. मुख्य पुरोहित, एस.व्ही. आणि मी, आम्ही पुढे चालत होतो. एस. व्हीं. नी स्वामींच्या पादुका घेतल्या होत्या, मागोमाग कलश घेतलेले सर्वजण येत होते. समोर बसलेले वादक नादस्वरम आणि मेलम ही मंगलवाद्ये वाजवत होते. मनाशी दृढ संकल्प करून मी निर्धाराने निघाले. मी स्वतः शक्ती आहे. माझी शक्ती पूर्णत्वाने स्तूपामध्ये यावी म्हणून मी धावा केला. मी तीन पायऱ्या चढले. नंतर मला चढणे मला अवघड जाऊ लागले. मी कलश एस. व्ही. कडे देऊन नागमोडी लाकडी जिना चढू लागले. मी वरती पोहोचल्यावर पुरोहितांनी गरुड मंत्र उच्चारला. मी त्या चांदणीच्या समोरच उभी होते आणि आकाशात स्वामींना शोधात होते. दोन मोठे काळे गरुड पक्षी स्तूपाच्या आणि यज्ञशालेच्या वरती घिरट्या घालत होते. ज्यादिवशी स्तुपावर चांदणी बसवली, त्यादिशी हेच गरुडपक्षी स्तूपाभोवती घिरट्या घालत होते. ते ब्रम्हाम्बिका शक्तीचे प्रतीक आहेत. श्री शैलममधील शक्तीचे नाव ब्रम्हाम्बिका आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा