मंगळवार, २३ जानेवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

       २३ ऑक्टोबर २०१७ रोजी श्री वसंतसाई अम्मांनी ८० व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त जानेवारी २०१८ पासून दर महिन्याच्या २३ तारखेला श्री वसंतसाईंच्या ज्ञानभांडारातून वेचक मोत्यांची मालिका वाचकांसाठी सादर केली जाईल
                त्या मालिकेसाठी २३ तारीख का निवडली ? ह्याचे स्पष्टीकरण श्री वसंतसाईंच्या शब्दात खाली देत आहे :-
                " आपल्या शरीरातील जननपेशींचा अपवाद वगळता प्रत्येक पेशीमध्ये ४६ गुणसूत्रे असतात. बीजांडामध्ये पुरुष आणि स्त्री ह्यांच्या जननपेशींमध्ये प्रत्येकी २३ गुणसूत्रे असतात. बीजांडामध्ये पुरुषांच्या २३ गुणसूत्रांचा स्त्रीच्या २३ गुणसूत्रांबरोबर संयोग होतो व त्याची ४६ गुणसूत्रांसमवेत वाढ होते . स्वामींचा आणि माझा दोघांचा जन्म दिनांक २३ आहे. ह्याचा गर्भितार्थ काय ?  "
                 हे स्वामींच्या आणि माझ्या मधील गुणसूत्रांचा संबंध दर्शवण्यासाठी आहे. विराट पुरुष विभाजित होऊन आम्ही दोघे अवतरलो आहोत. पुरुषांची २३ गुणसूत्रे पुरुष तत्वाचे प्रतिनिधित्व करतात. स्त्रीची २३ गुणसूत्रे प्रकृती तत्वाचे प्रतिनिधित्व करतात. जेव्हा आमच्या दोघांच्या गुणसूत्रांचा भावनिक स्तरांवर संयोग होतो तेव्हा ४६ गुणसूत्रांद्वारे नवनिर्मिती होते. 
                निर्मितीच्या सुरूवातीस विराट पुरुषाचा उद्भव होतो. तो परमेश्वराच्या स्त्री आणि पुरुष तत्वाचे अंग असून ते आलिंगन अवस्थेत असते. त्यापासून स्त्री आणि पुरुष अशी व्यक्तिमत्व वेगळी होतात  व निर्मितीस प्रारंभ होतो. आम्ही दोघांनीही नवनिर्मितीसाठी, सत्ययुगासाठी जन्म घेतला आहे. 

मोती पहिला 

वसंता - स्वामी, तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर माणसे का निर्माण केलीत आणि त्यांना इच्छा आणि मोह ह्यांच्या दलदलीत अडकण्यास का भाग पाडलेत ? प्रत्येक जीव दुःख भोगतो आहे ! 
स्वामी - प्रत्येक जीव त्याच्या इच्छापूर्तीसाठी जगामध्ये भ्रंमती करत असतो. मी त्यांना, ' तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खेळा ' असे सांगून त्यांच्या खेळाचे अवलोकन करतो. सरतेशेवटी जीव दमून भागून व कंटाळून एक दिवस परमेश्वरचा धावा करतो. त्यावेळी मी धावत जाऊन त्याला मदत करतो. 
वसंता - तुम्हाला ह्यातून काय लाभ होतो, स्वामी ? 
स्वामी - हा माझा खेळ आहे. 
वसंता - हा काय खेळ ? तुम्हाला कंटाळा येत नाही का, स्वामी ? 
स्वामी - जेव्हा मला कंटाळा येतो तेव्हा मी प्रलय घडवून समस्त जगाचा नाश करतो व योगनिद्रेत जातो. 
वसंता - मनुष्याला योगनिद्रा प्राप्त करणे शक्य आहे का ? 
स्वामी - जर तुम्ही झोपेमध्ये परमेश्वराच्या विचारांमध्ये बुडून गेला असाल तर तुमच्या झोपेचे योगामध्ये रूपांतर होऊ शकते. प्रत्येक कर्माचे योगामध्ये रूपांतर होऊ शकते. वाचणे, बसणे, चालणे, खाणे, झोपणे आणि काम करणे सर्वांचा योग होऊ शकतो. असे केल्याने जीवन योग बनून जाते. तुझे जीवन योग आहे . प्रत्येक क्षण परमेश्वराच्या विचारात घालवल्यास तो योग बनतो. 
वसंता - स्वामी ! सर्वांना ज्ञानाची भूक व आध्यात्मिक तृष्णा असते. तथापि ते समजूनही मनुष्य परमेश्वराकडे आपल्या स्वास्थ, संपत्ती, संतती, नौकरी, विवाह आणि इतर भौतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रार्थना करतो. बहुतांशी लोक परमेश्वराकडे व्यक्तिगत समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रार्थना करताना दिसतात. परमेश्वर प्राप्तीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करणाऱ्यांची संख्या आजकाल खूपच कमी आहे. 
स्वामी - तुझ्या सारखे परमेश्वरासाठी परमेश्वराची प्रार्थना करणारे खूप कमी आहेत. " मला तुम्ही हवेत, मला फक्त तुम्ही हवेत " ही तुझी प्रार्थना आहे. ही अनन्य प्रेमभक्ती आहे. परमेश्वराशिवाय अन्य काही नको अशी अवस्था. असे लोकं केवळ त्याचा ध्यास घेऊन त्याच्यासाठी अश्रू ढाळून त्याची कृपा प्राप्त करतात. अशा भक्तांची भक्ती हेच केवळ परमेश्वराचे अन्न आहे. त्याचा आधार आहे. 
वसंता - अर्जुनाने, स्थितप्रज्ञाची लक्षणे विचारल्यावर, ' जो सदैव ज्ञानामध्ये स्थित असतो तो स्थितप्रज्ञ ' असे आपण त्याला सांगितले. त्याचप्रमाणे आपण मला प्रेमभक्तीची लक्षणे सांगा ना. ज्यांच्या अंतर्यामी प्रेम आहे ते कसे बोलतील, कसे आचरण करतील ? ते कसे असतील ? 
स्वामी - त्यांना एक क्षणही परमेश्वराचे विस्मरण होणार नाही. ते केवळ परमेश्वराविषयी बोलतील. त्याच्या विषयीच श्रवण करतील. परमेश्वराच्या विचाराशिवाय ते एक क्षणभरही जगू शकणार नाहीत. त्यांच्या सर्व कर्मांचा केंद्रबिंदू परमेश्वरच असेल. अन्नग्रहण व निद्रा ह्या क्रियाही ते परमेश्वराप्रीत्यर्थ करतील. प्रत्येक कर्म परमेश्वराच्या विचारात केल्याने त्यांचे जीवन एक यज्ञ बनून जाईल. परमेश्वर त्यांचा एकमेव सागासोयरा असेल. ते कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या मार्गावरून कधीही ढळणार नाहीत वा त्यांच्या ध्येयापासून त्यांची दृष्टी हटणार नाही. ह्या जगातील कोणतीही गोष्ट त्यांना आकर्षित करू शकणार नाही. ते त्यांचे वेगळे विश्व निर्माण करून परमेश्वरासोबत जीवन जगतील. ते त्यांच्या पंचेंद्रियांद्वारे केवळ परमात्म्यालाच पाहतील. त्यांची इंद्रिये बाह्य जगतात भ्रमंती करणार नाहीत. त्यांना पंचमहाभूतांद्वारे दिव्य संदेश मिळतील. टी. व्ही. , रेडिओ, पुस्तके, वर्तमानपत्र ह्या सर्व गोष्टींमध्ये ते केवळ परमेश्वरालाच पाहतील. त्यांना नानाविध मार्गांनी परमेश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती होईल. त्यांच्या मनात उत्पन्न झालेल्या प्रत्येक प्रश्नाचे तात्काळ उत्तर मिळेल.  
... 
श्री वसंतासाईंच्या ' Liberation Here Itself Right Now Part -1' ह्या पुस्तकातून


जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा