गुरुवार, २८ जून, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " जन्मजात आपल्यामध्ये अमर्याद शक्ती असते. त्यायोगे मनुष्य पंचतत्वांनाही नियंत्रणात ठेऊ शकतो."

भाग चौथा 

हृद्गत ......... 

             मी आक्रोश करून भगवानांना म्हणत होते, " हे कान्हा, हे साईश्वरा, मी स्वतःला कशी मुक्त करू ? का मन मानेल त्या मार्गाने जाऊन अधोगतीला जाऊ ? का मनावर विजय मिळवून मुक्ती प्राप्त करू ? कान्हा, तुम्ही काय करणार आहात ? हा माझ्या तत्वाचा प्रश्न आहे आणि हा तुमच्या चांगुलपणाचाही प्रश्न आहे. तुच्या दिव्य नामाप्रीत्यर्थ मी तुम्हाला विचारते आहे. कृपा करून मला मार्ग दाखवा. माझे मन तुम्ही तुमच्याकडे वळवा, नाहीतर तुम्ही माझा जीव परत घ्या. मला ते हरीण व्हायचं आहे, ज्याचा एक केस जरी जमिनीवर पडला तर ते प्राण सोडतं. मला माझ्या मनाच्या मागे धावून जीवन व्यर्थ घालवायचे नाही. "
             " साई मां, तुमच्या या लेकराला वाचवा. कान्हा माझे जीवन तुमच्या हातात आहे." असे म्हणत मी किती आक्रोश केला ! 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा