गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" आपल्या भक्तिची गुणवत्ता म्हणजे आपल्या मनोदशेचे थेट प्रतिबिंबच होय."

भाग चौथा 

हृद्गत ......... 

जगामध्ये चार गोष्टी आहेत -
१) माझे प्रभू, माझे भगवान, माझे वडील 
२) विश्वशक्ती, माझी आई, साईमाता 
३) त्यांचे एकुलते एक लाडके मूल, मी 
४) हे विश्व, त्यांनी माझ्यासाठी बनवलेलं खेळणं 
               इथे अनेक बाहुल्या आहेत, सर्कशीतले विदूषक, विविध पशुपक्षी, सुंदर बगीचे, सरोवरे, जलाशये आहेत. प्रत्येक बाहुली निराळी, एक रागीट तर दुसरी संत ... यांच्याशी खेळत असताना माझ्या मनात अनेक भावना उमलतात. ह्या सृष्टीची सर्व संपत्ती माझी आहे. विश्वातील प्रत्येक वस्तू माझी आहे; असे असताना त्यातील मोजक्याच मी माझ्यासाठी का ठेवते ? जे काही वडिलांचे आहे ते सर्व मुलांचेही आहे. हो की नाही ? माझ्याकडे ही सर्व समृद्धी आहे, परंतु अजूनही मला माझ्या मातापित्यांच्या स्वभावाचा वारसा आला नाही. वंशाचा नाश करण्यासाठी आलेली मी कुऱ्हाड तर नव्हे ? परमेश्वरा, कृपा करून तुझ्या या अज्ञानी मुलीमध्ये सुधारणा घडव. तिला चारित्र्यसंपन्न बनव. युवराजामध्ये राजाचे गुण असायला नकोत का ?

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम ..... 

रविवार, २६ ऑगस्ट, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " प्रेमाद्वारे त्यागाची जोपासना होते त्यागाद्वारे प्रेम फोफावते. "

भाग चौथा 

हृद्गत ......... 

              ..... असे म्हटले आहे, की साधकाने आपले जगाबरोबरचे बंध कमी करायला हवेत; असे असूनही मला सर्वांशी मैत्री करावीशी वाटते. सर्वांमध्ये भगवानांचाच अंश आहे. 
              ... आपण दुसऱ्यांच्या ऋणात का रहायचे ? त्याऐवजी दुसऱ्यांना आपण ऋणी का बनवू नये ? त्यांनी आपल्याकडे मदत मागो वा न मागो, त्यांना आपण करणारी मदत आवडो वा न आवडो; परंतु आपण जर शक्य तेवढ्या सर्व मार्गांनी त्यांना मदत करत राहिलो, तर एक दिवस जगातील सर्वजण आपल्या ऋणामध्ये राहतील. इथे मी ' मदत ' हा शब्द मुद्दाम वापरला आहे. कारण मदतीच्या बदल्यात काहीतरी मिळावे अशी आपली अपेक्षा असते. इतरांनी आपल्या ऋणात रहावे असे आपल्याला का वाटते ? कारण आपल्याला इतरांकडून मदतीची अपेक्षा असते किंवा किमान त्यांच्याकडून आपल्याला कोणताही त्रास होऊ नये, असे आपल्याला वाटते. निरपेक्ष भावाने केलेल्या संदर्भातच आपण सेवा हा शब्द वापरू शकतो. तुम्हाला जर ' सेवा ' करणे शक्य नसेल तर किमान मदत करा. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

मोती आठवा 
 
काकभुशंडी नाडीग्रंथ 

तारीख : ११ मार्च २०००
स्थळ : वैदीश्वरन कोविल, तामिळनाडू 
श्री वसंतसाईंचे नाडीग्रंथवाचन 
              श्री आदिशक्तीच्या कमलचरणी, श्री काकभुशंडी महर्षी प्रणाम करून आदिशक्तीची भाकीते पुढे विदित करीत आहेत. त्यांच्या हातावरील रेखा मातिपूर्ण शिवभूषण रेखा म्हणून ओळखली जाते. त्यामध्ये एक छोटासा तीळ असेल. 
त्यांचा जन्म बहुधान्य वर्ष, अश्विन महिन्यातील ७ व्या दिवशी रविवारी, चित्रा नक्षत्र, दानूर लग्नावर झाला. 
त्यांच्या जन्म पांड्यनाडु येथे रेड्डीयार वर्गातील सुसंस्कृत कुटुंबात झाला. 
              त्यांना ६२ वे वर्ष चालू असताना, आज ११ मार्च २००० रोजी श्री काकभुशंडी महर्षींनी भूर्जपत्रावर लिहिलेले भाकीत वाचण्यासाठी त्या इथे येतील असा दैवी संकेत आहे. 
             त्या दीर्घायुषी असतील. त्यांचे आयुष्य ७५ वर्षांहून अधिक असेल. त्यांचे पती आणि अपत्येही दीर्घायुषी असतील. वडिलांचा व्यवसाय असेल. त्यांची अपत्ये शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित नोकरी व्यवसाय करतील. 
             " गृहस्थाश्रमी संन्यासिनी !" ही त्यांची जीवनातील वर्तमान स्थिती आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या असेच जीवन व्यतीत करत असतील. त्या गृहस्थाश्रमी असूनही प्रत्यक्षात संन्यस्त जीवनाचे आचरण करत असतील.  
              त्यांना लोक ' अम्मा या नावाने हाक मारतील. वसंताम्मा हे त्यांचे नाव असूनही काही शिष्य त्यांना ' अम्मा ' म्हणतील. 
               ६३,६४,६५ या वयात त्या परदेश गमन करतील आणि तेथील लोकांशी त्यांचे संबंध प्रस्थापित होतील. जगातील सर्व दिशांना त्यांची दिगंत कीर्ती पसरेल. सगळ्या जातीचे, धर्माचे, वंशाचे लोकं व्हरांड्यात त्यांची प्रतिक्षा करत थांबतील. अम्मा एक महान गुरूंप्रमाणे जीवन जगातील. 
             ६५-६६ या वयात त्या ज्योतीस्वरूपाप्रमाणे व्यापक होतील. त्यांना सर्व कलाकौशल्ये अवगत होतील, जी इतर कोणालाही अवगत नसतील. त्यांना मंत्र, मांत्रिक, औषद, ध्यान, परकाया प्रवेश अशा सिद्धी प्राप्त होतील. त्या पदयात्राही करतील. त्यांचे हजारो भक्त असतील. अष्टसिद्धिंवर त्यांचे स्वामित्व असेल. अष्टादिक्पालांच्या कृपेमुळे त्यांचे निवासस्थान कमलपीठ बनेल. असंख्य भक्त त्यांना भेट देतील. त्यांना अनेक सिद्धपुरुषांचे दर्शन घडेल. 
              ६७-६८ या वयात त्यांची आध्यात्मिक सेवा कळसाप्रत पोहोचेल. त्या अनेकांच्या गुरु होतील. महान ऋषीमुनी त्यांना आशीर्वाद देतील. त्या उत्तरेकडे बराच प्रवास करतील. 
६९-७० या वयात त्यांना काही शारीरिक व्याधी होण्याची शक्यता आहे. तथापि श्री शुक ब्रह्यर्षी आणि काकभुशंडी महर्षी यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतील. त्यांनी शांतीपाठ केल्यास सर्व समस्यांचा नाश होईल. 
               ७०-७२-७३ या वयात महान गोष्टी घडण्याची शक्यता. त्यांचे नाव वसंतम्मा आहे. त्यांच्या पतीचे नाव मनोहरन आहे. त्यांच्या पित्याचे नाव मधुरकवी आणि आईचे वेदवल्ली आहे. 
               ७४-७५ हा परमसौभाग्याचा काल आहे. त्यांचे महानिर्वाण सर्वसामान्यांप्रमाणे नसेल. त्यांना मोक्षप्राप्ती होईल. त्यांना प्राप्त असलेल्या अष्टमहासिद्धींचा वापर त्या मानवाच्या कल्याणासाठी करतील. त्या कला, मंत्र, ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांचा प्रसार करतील. त्यांच्या सिद्धी वाढतच जातील. त्या सौख्य आणि कौटुंबिक बंधांचा त्याग करून जगद्जननीचे पद प्राप्त करतील. त्या अनेक रूपं धारण करतील त्यांना अगणित भक्त असतील. त्यांच्या नामाचा महिमा सर्वत्र पसरेल. त्यांच्या महानिर्वाणानंतर त्यांचे निवासस्थान तीर्थक्षेत्र बनेल. तेथे भक्तांचा महापूर लोटेल. काकभुशंडींचे हे भाकीत त्रिवार सत्य होईल. 
              त्यांचे आयुर्मान ८० वर्षापर्यंत असेल. त्या शिवशक्ती आणि राधाकृष्ण त्यांच्या ऐक्याचे मूर्तिमंत स्वरूप असतील. त्या ज्योती स्वरूप बनून श्री सत्यसाईबाबांमध्ये विलीन होतील. त्यांचे स्थान समाधीस्थानाप्रमाणे अत्यंत पवित्र मानले जाईल. 

संदर्भ -  ' पवित्र नाडीग्रंथ वाचन ' या वसंतसाईंच्या पुस्तकातून

जय साईराम
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग करा आणि पाहा त्यातून तुम्हाला केवढा आनंद मिळतो." 
 
भाग चौथा 

हृद्गत ......... 

              ... माझी एक इच्छा आहे, मी जशी तुमच्यासाठी तळमळते आहे; जसे माझे हृदय तुमच्यासाठी द्रवते आहे, तसेच प्रेम मला तुमच्याकडून मिळायला हवे. माझ्या प्रेमासाठी तुम्हीही आर्जवं केली पाहिजे. तुम्हीही माझ्यासाठी प्रेमाने व्याकूळ झाले पाहिजेत. मी एखाद्या भिकारणीसारखी तुमच्या प्रेमासाठी वणवण भटकते आहे. मार्ग शोधण्यासाठी मी अनेकांचे पाय धरले. मार्गदर्शन करावे म्हणून किती संतमहात्म्यांना पत्रं लिहिली. माझ्यासारखाच तुम्हीही संघर्ष केला पाहिजे. अशा प्रेमाने तुम्ही बेहोष झाले पाहिजे. आज जसं माझा ताप पाहून तुम्ही आंनद घेताय, तसा मीसुद्धा तुमच्या विरहाग्नीचा आनंद अनुभवला पाहिजे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, १९ ऑगस्ट, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
 
सुविचार 

            " अमरत्व केवळ त्यागाद्वारे प्राप्त होते. जेव्हा आपण परमेश्वरासाठी आपल्या भौतिक जीवनाचा त्याग करतो तेव्हा आपल्या कर्मांच्या परिणामांचा नाश होतो. "

भाग चौथा 

हृद्गत ......... 

             ..... माझे जीवन सर्वसामान्यांहून वेगळे आहे. जसे वय वाढते तसे सर्वजण वयस्कर होत जातात. परंतु मी दिवसागणिक छोटे बाळ होते आहे. माझे जीवन असाधारण आहे साई, मी तुमचे लेकरू आहे, बाळ आहे. 
             .... मी माझे सर्वस्व तुम्हाला अर्पण केले आहे. आता अजून तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे की ज्यासाठी तुम्ही मला संघर्ष करायला लावत आहात ? 
             .... मी जे मागेन ते तुम्ही मला का देत आहात ? माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी जे चांगले असेल, तेच तुम्ही मला द्या. मी जर हट्टाने, अज्ञानातून नको ती गोष्ट मागितली तर कृपया मला कोणती गोष्ट मागावी हे समजावून सांगा. कान्हा, मी तुमचं भोळंभाबडं लेकरू आहे. जे चांगलं असेल, माझ्या हिताचं असेल तेच मला द्या.

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" केवळ त्याग मार्गाद्वारे परमशांती प्राप्त होते. "

भाग चौथा 

हृद्गत .........

              ..... मृत्यूसमयीही बुद्धी तल्लख असली पाहिजे. तुमचे नाम घेत घेतच मला मृत्यू आला पाहिजे. 
              ..... ह्या जगात वेगवेगळ्या नावांतून व रूपामधून आनंद दृष्टीस पडतो. माझे मन केवळ शब्दांमध्ये आनंद शोधते. जगावेगळेच मन आहे माझे ! त्याला सतत लिहायला आवडते, कविता, पत्र, विचार आणि चिंतन अशा कोणत्याही स्वरूपात लिहायला आवडते. शब्दांमधून ' अभिव्यक्ती ' हे माझे जीवनच बनून गेले आहे. 
              ..... परमेश्वरास ' स्त्री ' अथवा ' पुरुष ' समजून माणसे त्याच्यापासून कशी काय दूर राहतात ? साई, मी मांजरीचे पिल्लू आहे आणि तू माझी आई आहेस. पिल्लू आईला हक्काने स्पर्श करू शकत नाही का ? मला तुझ्या कुशीत शिरून आनंदाश्रूंना वाट मोकळी करून द्यायची आहे. कान्हा, मी तुझाच आश्रय घेणार. स्त्री पुरुष हे नाते जगासाठी आहे. देवासाठी कसं काय ? मला तर आश्चर्यच वाटतं. प्रत्येक ठिकाणी भेद का ? लोक केवळ याच दृष्टिकोनातून का पाहतात ? का हा माझाच दृष्टिदोष आहे ? जर सगळे सारखेच आहेत तर मी एकटीच का बरं वेगळी ? 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

" माया सत्याला दडवून ठेवते. एकोहम् बहुस्यामी हे सत्य जाणा. "

भाग चौथा 

हृद्गत ......... 

              ... अवतार भूतलावर असताना जन्मलेले सर्व जीव परमेश्वराचे लाडके आहेत. स्वामी म्हणतात की, आम्हाला पूर्वीच्या युगांसारखे तप करण्याची गरज नाही. अखंड नामस्मरण करणेच पुरेसे आहे, तेवढेही आपण करू शकत नाही ! त्याला आपली कर्मे कारणीभूत आहेत. तथापि आपण कलियुगात जन्मलो हे आपले सद् भाग्यच आहे. गेल्या तीन युगांत जन्मलेल्या लोकांना ध्येयप्राप्तीसाठी महत् प्रयास करावे लागले. त्यांच्या पंचेंद्रियांनी उपवास केले - आपली पंचेंद्रिये मेजवान्या झोडताहेत. 
             ..... बऱ्याचदा जेव्हा मला नातेवाईकांना भेटायला जाणे भाग पडे तेव्हा मला त्यांच्याशी काय बोलावे, त्यांच्यात कसे मिसळावे हे समजत नसे. तिथे काय बोलायचे असा प्रश्न पडल्यामुळे मी तेथील एखादे पुस्तक घेऊन वाचत बसे. लोकांना कदाचित असं वाटत असेल, की मला न्यूनगंड आहे किंवा मी अबोल आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " मनुष्यामध्ये असणारी अतृप्त इच्छांची शक्ती त्याचा बंधाचे मूळकारण आहे. "

भाग चौथा 

हृद्गत ......... 

               .... कावंदनप्रमाणे काळ आपलाही घास घेण्याच्या प्रतिक्षेत आहे. तरीही लोक एकमेकांशी भांडतात, झगडतात, स्पर्धा करतात. अहंकारी वृत्ती बाळगतात. पैशासाठी वाट्टेल ते करतात आणि आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतात. मन क्षणभंगुर गोष्टींसाठी, प्रामाणिकपणा, सचोटी यांचा त्याग करते !
               .... नोकरी मिळवणे व नौकरी करणे, हे मानवी जीवनातील सर्वात महत्वाचे ध्येय आहे का ? नरजन्माचा हा हेतू आहे का ? मानवाने प्राप्त करावी अशी ही सर्वोच्च स्थिती आहे का? हे मना, तुला या गोष्टीचं इतकं महत्व का वाटतं ? शिक्षण, चारित्र्य घडवण्यासाठी , महात्मा बनवण्यासाठी असते ; हे शिक्षण जेव्हा ' महात्मा ' ह्या अवस्थेसाठी अडथळा ठरते, तेव्हा नौकरीच काय - पण देहाचाही त्याग केला पाहिजे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात.....

जय साईराम

रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" भौतिक जग मिथ्या आहे."

भाग चौथा 

हृद्गत ........ 

               हे भगवान, मी रोज प्रार्थना करते की माझ्या मनात कोणाविषयी वैरभाव नसावा. स्वामी, शत्रूचा मित्र आणि मित्राचा शत्रू कसा काय बनू शकतो ? कोणाशीही शत्रूत्व नसावे. तसेच शत्रूलासुद्धा मित्र बनवावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यांनतर दोन मित्र विनाकारण एकमेकांचे शत्रू होतात. असं का ? याचा अर्थ असा आहे का की गीतेने सांगितलेलं ह्या जगात प्रत्यक्षात उतरवता येणार नाही. मला ह्याचा खुलासा कोण करेल ?
               ....जगातील सर्वजण या ना त्या गोष्टीच्या मागे धावत आहेत. काहीजणं झपाट्याने पुढे जातात तर काही मागे रेंगाळतात. ही स्पर्धा वैयक्तिक आहे. एकेरी मार्ग. थोड्या कालावधीसाठी मुले व कुटुंबीय यामध्ये सहभागी होतात. तेही दुरावतात. काय विचित्र लीला भगवंताची !

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, २ ऑगस्ट, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" जेव्हा मनाला बाह्य जगताची जाणीव असते तेव्हा ते मायेमध्ये अडकते. "

भाग चौथा 

हृद्गत......... 

             उंट काटेरी झुडुपाची पाने खातो आणि स्वतःच्याच रक्ताचा आस्वाद घेण्यात आनंद मानतो त्याचप्रमाणे मनास आपले दुःखच प्रिय असते. जग दुःखदायक आहे हे माहीत असूनही मन त्याच्यामागे धावते. 
              ज्याक्षणी तुम्ही 'मी ' म्हणता तेव्हा तुम्ही सर्वात मामुली गोष्टीबद्दल बोलता. ' मी ' अत्यंत क्षुल्लक गोष्ट आहे, धुळीसमान आहे. क्षुद्रातील क्षुद्र आणि अत्यंत तिरस्करणीय आहे ..... 
              गीतेत असं म्हंटल आहे, 'तो, ज्याच्यामुळे जग विचलित नाही व तो जो जगामुळे विचलित नाही. ह्या वाक्याचा दुसरा भाग शक्य आहे, पण पहिल्या भागाचं काय ? जीजस, ख्रिस्त, परमेश्वराचा पुत्र अवतार पुरुष होते तरीदेखील त्यांचा विश्वासघात करायला जूडास एस्कॅरियट होता. महात्मा गांधींनी अवघं आयुष्य सत्याची प्रयोगशाळा बनवले होते. त्यांना गोळी घालायला गोडसे होता. म्हणून मला असा प्रश्न पडला आहे की या जगात कोणी आहे का, की ज्याच्यामुळे जगाला मस्ताप होत नाही ? या जगात जीवन जगताना हे कसं शक्य आहे ? 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम