गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" केवळ त्याग मार्गाद्वारे परमशांती प्राप्त होते. "

भाग चौथा 

हृद्गत .........

              ..... मृत्यूसमयीही बुद्धी तल्लख असली पाहिजे. तुमचे नाम घेत घेतच मला मृत्यू आला पाहिजे. 
              ..... ह्या जगात वेगवेगळ्या नावांतून व रूपामधून आनंद दृष्टीस पडतो. माझे मन केवळ शब्दांमध्ये आनंद शोधते. जगावेगळेच मन आहे माझे ! त्याला सतत लिहायला आवडते, कविता, पत्र, विचार आणि चिंतन अशा कोणत्याही स्वरूपात लिहायला आवडते. शब्दांमधून ' अभिव्यक्ती ' हे माझे जीवनच बनून गेले आहे. 
              ..... परमेश्वरास ' स्त्री ' अथवा ' पुरुष ' समजून माणसे त्याच्यापासून कशी काय दूर राहतात ? साई, मी मांजरीचे पिल्लू आहे आणि तू माझी आई आहेस. पिल्लू आईला हक्काने स्पर्श करू शकत नाही का ? मला तुझ्या कुशीत शिरून आनंदाश्रूंना वाट मोकळी करून द्यायची आहे. कान्हा, मी तुझाच आश्रय घेणार. स्त्री पुरुष हे नाते जगासाठी आहे. देवासाठी कसं काय ? मला तर आश्चर्यच वाटतं. प्रत्येक ठिकाणी भेद का ? लोक केवळ याच दृष्टिकोनातून का पाहतात ? का हा माझाच दृष्टिदोष आहे ? जर सगळे सारखेच आहेत तर मी एकटीच का बरं वेगळी ? 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा