ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
मोती आठवा
काकभुशंडी नाडीग्रंथ
तारीख : ११ मार्च २०००
स्थळ : वैदीश्वरन कोविल, तामिळनाडू
श्री वसंतसाईंचे नाडीग्रंथवाचन
श्री आदिशक्तीच्या कमलचरणी, श्री काकभुशंडी महर्षी प्रणाम करून आदिशक्तीची भाकीते पुढे विदित करीत आहेत. त्यांच्या हातावरील रेखा मातिपूर्ण शिवभूषण रेखा म्हणून ओळखली जाते. त्यामध्ये एक छोटासा तीळ असेल.
त्यांचा जन्म बहुधान्य वर्ष, अश्विन महिन्यातील ७ व्या दिवशी रविवारी, चित्रा नक्षत्र, दानूर लग्नावर झाला.
त्यांच्या जन्म पांड्यनाडु येथे रेड्डीयार वर्गातील सुसंस्कृत कुटुंबात झाला.
त्यांना ६२ वे वर्ष चालू असताना, आज ११ मार्च २००० रोजी श्री काकभुशंडी महर्षींनी भूर्जपत्रावर लिहिलेले भाकीत वाचण्यासाठी त्या इथे येतील असा दैवी संकेत आहे.
त्या दीर्घायुषी असतील. त्यांचे आयुष्य ७५ वर्षांहून अधिक असेल. त्यांचे पती आणि अपत्येही दीर्घायुषी असतील. वडिलांचा व्यवसाय असेल. त्यांची अपत्ये शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित नोकरी व्यवसाय करतील.
" गृहस्थाश्रमी संन्यासिनी !" ही त्यांची जीवनातील वर्तमान स्थिती आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या असेच जीवन व्यतीत करत असतील. त्या गृहस्थाश्रमी असूनही प्रत्यक्षात संन्यस्त जीवनाचे आचरण करत असतील.
त्यांना लोक ' अम्मा या नावाने हाक मारतील. वसंताम्मा हे त्यांचे नाव असूनही काही शिष्य त्यांना ' अम्मा ' म्हणतील.
६३,६४,६५ या वयात त्या परदेश गमन करतील आणि तेथील लोकांशी त्यांचे संबंध प्रस्थापित होतील. जगातील सर्व दिशांना त्यांची दिगंत कीर्ती पसरेल. सगळ्या जातीचे, धर्माचे, वंशाचे लोकं व्हरांड्यात त्यांची प्रतिक्षा करत थांबतील. अम्मा एक महान गुरूंप्रमाणे जीवन जगातील.
६५-६६ या वयात त्या ज्योतीस्वरूपाप्रमाणे व्यापक होतील. त्यांना सर्व कलाकौशल्ये अवगत होतील, जी इतर कोणालाही अवगत नसतील. त्यांना मंत्र, मांत्रिक, औषद, ध्यान, परकाया प्रवेश अशा सिद्धी प्राप्त होतील. त्या पदयात्राही करतील. त्यांचे हजारो भक्त असतील. अष्टसिद्धिंवर त्यांचे स्वामित्व असेल. अष्टादिक्पालांच्या कृपेमुळे त्यांचे निवासस्थान कमलपीठ बनेल. असंख्य भक्त त्यांना भेट देतील. त्यांना अनेक सिद्धपुरुषांचे दर्शन घडेल.
६७-६८ या वयात त्यांची आध्यात्मिक सेवा कळसाप्रत पोहोचेल. त्या अनेकांच्या गुरु होतील. महान ऋषीमुनी त्यांना आशीर्वाद देतील. त्या उत्तरेकडे बराच प्रवास करतील.
६९-७० या वयात त्यांना काही शारीरिक व्याधी होण्याची शक्यता आहे. तथापि श्री शुक ब्रह्यर्षी आणि काकभुशंडी महर्षी यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतील. त्यांनी शांतीपाठ केल्यास सर्व समस्यांचा नाश होईल.
७०-७२-७३ या वयात महान गोष्टी घडण्याची शक्यता. त्यांचे नाव वसंतम्मा आहे. त्यांच्या पतीचे नाव मनोहरन आहे. त्यांच्या पित्याचे नाव मधुरकवी आणि आईचे वेदवल्ली आहे.
७४-७५ हा परमसौभाग्याचा काल आहे. त्यांचे महानिर्वाण सर्वसामान्यांप्रमाणे नसेल. त्यांना मोक्षप्राप्ती होईल. त्यांना प्राप्त असलेल्या अष्टमहासिद्धींचा वापर त्या मानवाच्या कल्याणासाठी करतील. त्या कला, मंत्र, ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांचा प्रसार करतील. त्यांच्या सिद्धी वाढतच जातील. त्या सौख्य आणि कौटुंबिक बंधांचा त्याग करून जगद्जननीचे पद प्राप्त करतील. त्या अनेक रूपं धारण करतील त्यांना अगणित भक्त असतील. त्यांच्या नामाचा महिमा सर्वत्र पसरेल. त्यांच्या महानिर्वाणानंतर त्यांचे निवासस्थान तीर्थक्षेत्र बनेल. तेथे भक्तांचा महापूर लोटेल. काकभुशंडींचे हे भाकीत त्रिवार सत्य होईल.
त्यांचे आयुर्मान ८० वर्षापर्यंत असेल. त्या शिवशक्ती आणि राधाकृष्ण त्यांच्या ऐक्याचे मूर्तिमंत स्वरूप असतील. त्या ज्योती स्वरूप बनून श्री सत्यसाईबाबांमध्ये विलीन होतील. त्यांचे स्थान समाधीस्थानाप्रमाणे अत्यंत पवित्र मानले जाईल.
संदर्भ - ' पवित्र नाडीग्रंथ वाचन ' या वसंतसाईंच्या पुस्तकातून
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा