ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तुम्ही तुमचे सर्व भाव ईश्वराभिमुख केले पाहिजे ज्यामुळे तुम्हाला चांगल्या फलांची प्राप्ती होईल. केवळ हेच तुम्हाला मुक्ती प्रदान करेल. "
प्रकरण पाच
प्रेम साई अवतार
राधाकृष्णाच्या प्रेमामध्ये देहभावाचा मागमूसही नव्हता. तसेही ते कोणत्याही प्रकारे सामान्य सांसारिक जीवनाशी संबंधित नव्हते. त्यांचे दिव्य प्रेम आहे. परमेश्वरावरील विशुद्ध प्रेम दर्शवण्यासाठीच ते पुन्हा आले आहेत. राधाकृष्णाचे प्रेम मधुर भक्तीच्याही पलीकडे आहे. ही परम योग स्थिती आहे. द्वापारयुगामध्ये हे ऐक्य भावविश्वाच्या स्तरावरच थांबले. आता ह्या भावविश्वाने रूप धारण केले आहे आणि संसाररूपी महासागरातून लोकांची सुटका करणार आहे. ह्या ऐक्यामुळेच सत्ययुग येणार आहे. नवनिर्मितीमधील सर्वांना राधाकृष्णाचे प्रेम वेढून टाकेल.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा